Lokmat Sakhi >Gardening > उन्हाळ्यात राेपं सुकू नयेत म्हणून १ सोपा उपाय, रोपं जळणार नाहीत- बाग राहील हिरवीगार

उन्हाळ्यात राेपं सुकू नयेत म्हणून १ सोपा उपाय, रोपं जळणार नाहीत- बाग राहील हिरवीगार

How To Take Care Of Plants In Summer: कडक उन्हातही तुमच्या बागेला हिरवीगार ठेवण्यासाठी हा १० रुपयांचा एक सोपा उपाय करून पाहा.. (Gardening tips for hot summer)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2024 02:53 PM2024-03-27T14:53:12+5:302024-03-27T14:54:02+5:30

How To Take Care Of Plants In Summer: कडक उन्हातही तुमच्या बागेला हिरवीगार ठेवण्यासाठी हा १० रुपयांचा एक सोपा उपाय करून पाहा.. (Gardening tips for hot summer)

How to take care of plants in summer, remedies to keep your garden green in hot sunny days, Gardening tips for hot summer, use of fitkari for plants | उन्हाळ्यात राेपं सुकू नयेत म्हणून १ सोपा उपाय, रोपं जळणार नाहीत- बाग राहील हिरवीगार

उन्हाळ्यात राेपं सुकू नयेत म्हणून १ सोपा उपाय, रोपं जळणार नाहीत- बाग राहील हिरवीगार

Highlightsतुरटीमुळे मातीची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते, मातीचा कस वाढतो. त्यामुळे झाडं टवटवीत होतात आणि फुलं देखील भरपूर येतात.

मार्च महिना संपत आला आहे. त्यामुळे सध्या सगळीकडेच उन्हाचा पारा वाढला आहे. थोडं जरी उन्हात गेलं तरी अगदी नकोसं होऊन जातं. या उन्हामुळे आपल्याला जसा त्रास होतो, तसाच त्रास आपल्या बागेतल्या रोपांनाही होतोच. म्हणूनच उन्हाळ्यात आपण झाडांसाठी विशेष व्यवस्था करत असलो तरी बऱ्याचदा उन्हाचा तडाखा सहन न झाल्याने बागेतली रोपं सुकू लागतात (remedies to keep your garden green in hot sunny days). काही नाजूक रोपं तर जळून जातात. असं होऊ नये म्हणून हा एक स्वस्तात मस्त उपाय करून पाहा (Gardening tips for hot summer). हा उपाय केल्याने अगदी कडक उन्हाळ्यातही तुमची बाग हिरवीगार आणि टवटवीत राहील. (How to take care of plants in summer)

 

उन्हाळ्यातही तुमच्या बागेला सदाबहार ठेवायचं असेल तर बाजारातून १० रुपयांची तुरटी विकत घेऊन या. कारण तुरटीमध्ये असे अनेक गुणधर्म आहेत, ज्यामुळे रोपांची वाढ चांगली होते आणि ते हिरवीगार राहण्यास मदत होते.

पोळपाट- लाटणं न घेता ५ मिनिटांत करा ५० पुऱ्या, बघा झटपट पुऱ्या करण्याचा व्हायरल व्हिडिओ

शिवाय रोपांना मुंग्या लागल्या असतील, झाडावर किड किंवा मावा पडला असेल, झाडांना फुलं येत नसतील किंवा खूप कमी येत असतील तर त्यासाठी तुरटीचा हा उपाय करून बघाच. तुरटीमुळे मातीची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते, मातीचा कस वाढतो. त्यामुळे झाडं टवटवीत होतात आणि फुलं देखील भरपूर येतात. 

 

झाडांसाठी कसा करायचा तुरटीचा वापर?

१. २०० ग्रॅम तुरटीची पावडर ५०० ग्रॅम पाण्यात विरघळून घ्या. हे पाणी उन्हाळ्यात १५ दिवसांतून एकदा झाडांवर थोडे- थाेडे शिंपडा आणि मातीमध्येही टाका.

केसांच्या आरोग्यासाठी ३ पदार्थ खा! केस गळणं कमी होईल- म्हातारपणातही केस काळेच राहतील

२. दुसरा उपाय अगदीच सोपा आहे. यासाठी तुरटीचा छोटा तुकडा घ्या आणि तो कुंडीतल्या मातीमध्ये दाबून टाका. असं केल्याने पाण्यासोबत तुरटी विरघळत जाऊन मातीमध्ये मिसळत जाईल. यामुळे झाडांची चांगली वाढ होईल. 

 

Web Title: How to take care of plants in summer, remedies to keep your garden green in hot sunny days, Gardening tips for hot summer, use of fitkari for plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.