काही मोठी शहरं सोडली तर उन्हाळ्याच्या दिवसांत खूप ठिकाणी तीव्र पाणीटंचाई असते. पिण्याच्या पाण्याचा खूप मोठा प्रश्न असतो. वापरायच्या पाण्यावरही खूप मर्यादा येतात. शिवाय भुजल पातळीही बरीच खाली गेलेली असते. त्यामुळे बोअरवेल असूनही पाणी येत नाही. अशावेळी मग कुंडीतल्या रोपांचं काय करायचं हा प्रश्न येतो. कारण उन्हामुळे आधीच रोपं सुकून गेलेली असतात. पावसाळा, हिवाळा यापेक्षा उन्हाळ्यात जास्त पाणी लागतं आणि त्याच काळात नेमकी पाणी टंचाई असते. म्हणूनच तर पुढे सांगितल्याप्रमाणे काही साधे सोपे उपाय करून पाहा. यामुळे कमी पाण्यातही रोपं छान फुलू शकतात.(Gardening Tips For Summer)
उन्हाळ्यात पाणी टंचाई असताना कमी पाण्यात रोपं जगविण्याची युक्ती
१. आपल्याला अशी सवय असते की स्वयंपाक करताना डाळ, तांदूळ, भाज्या, फळं धुतल्यानंतर आपण ते पाणी सरळ सिंकमध्ये टाकून देतो. यामुळे खूप पाणी वाया जातं. उन्हाळ्यात ही सवय थोडी बदला आणि हे सगळं पाणी एका बादलीमध्ये जमा करत चला. कारण हे पाणी आपण रोपांना देऊ शकतो.
नुसतं पाणी पिऊन किडनी स्टोनचा धोका टळत नाही; बघा कोणती गोष्ट ठरते सर्वात जास्त फायदेशीर
२. जेवण झाल्यानंतर, स्वयंपाक घरातलं काम झाल्यानंतर किंवा स्वयंपाक करतानाही महिलांना वारंवार हात धुवावे लागतात. अशावेळी नळाखाली हात धुवून ते पाणी सिंकमध्ये वाया घालविण्यापेक्षा बादली आणि एखादं भांडं वापरा. भांड्याने हातावर पाणी ओतून हात धुवा आणि ते पाणी एका बादलीमध्ये जमा करत चला. हे पाणीही रोपांना द्या.
३. उन्हाळ्याच्या दिवसांत रोपं थोडी सावलीमध्ये ठेवा. जिथे खूप जास्त ऊन येतं त्या ठिकाणी रोपं ठेवू नका. कारण अशा रोपांना जास्त पाणी लागतं.
४. सिंकमध्ये भांडी धुताना तळाशी एक टब ठेवा. भांडी धुतलेलं पाणी त्यात जमा होईल आणि ते रोपांना देता येईल.
'या' कारणामुळे संध्याकाळी भूक लागते आणि वजन वाढतच जातं, बघा नेमकं काय टाळायचं
५. घरात असणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या वापरात काढा. त्या बाटल्यांमध्ये पाणी भरा. बाटलीच्या झाकणाला छोटं छिद्रं पाडा. त्यात एक काडी खोचा आणि बाटली रोपांच्या मुळाशी उलटी करून ठेवा. थेंब थेंब पाणी गळत राहील आणि कुंडीतली माती कायम ओलसर राहील.
Web Summary : Facing water scarcity this summer? Collect water from washing food and hands. Place plants in shade. Use a drip system with plastic bottles to keep soil moist and plants thriving, even with limited water.
Web Summary : गर्मी में पानी की कमी से जूझ रहे हैं? भोजन और हाथ धोने से पानी इकट्ठा करें। पौधों को छाया में रखें। प्लास्टिक की बोतलों से ड्रिप सिस्टम का उपयोग करके मिट्टी को नम रखें और सीमित पानी में भी पौधों को पनपने दें।