'पावसाळा' हा ऋतू झाडांच्या वाढीसाठी उपयुक्त मानला जातो. उन्हाळ्यातील प्रखर सूर्यप्रकाशामुळे कमकुवत व सुकून गेलेली रोप पावसाळ्यात पुन्हा बहरतात. पावसाळ्यात (How To Protect Plants From Fungus In Rainy Season) झाडांची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. वेळीच योग्य (5 Gardening Hacks) काळजी न घेतल्यास रोपांना बुरशी लागून ती सडू शकतात. या ऋतूमध्ये वातावरणातील वाढलेला ओलावा (How Do You Stop Fungus From Growing on Plants During Rainy Season) आणि सूर्यप्रकाशाची कमतरता यामुळे रोपांना बुरशी लागण्याचा धोका सर्वाधिक असतो. एकदा का बुरशी (Prevent & Control Fungal On Plants) लागली, की रोपांची वाढ थांबते, पाने पिवळी पडतात आणि झाडं सडण्याची शक्यता वाढते. त्यामुळे पावसाळ्यात रोपांची विशेष काळजी घेणं गरजेचे असते.
पावसाळ्यात बरेचदा जास्त ओलावा आणि सूर्यप्रकाशाची कमतरता यामुळे रोपांना बुरशी लागते. बुरशी लागल्यावर, पानांवर पांढरी बुरशी दिसायला लागते. काहीवेळा ही बुरशी मातीपर्यंत पोहोचून रोपाचे आरोग्य खराब करते. हा ऋतू रोपांसाठी चांगला असला तरी, या दिवसांत रोपांची नीट काळजी घेतली नाही, तर ती खराब होऊ शकतात. अशा परिस्थितीत, घरातीलच काही पदार्थांच्या मदतीने रोपांवरील बुरशी दूर करता येऊ शकते. पावसाळ्यात रोपांवर येणारी बुरशी दूर करण्यासाठी नेमकं आपण कोणत्या पदार्थांचा वापर करु शकतो ते पाहूयात.
पावसाळ्यात रोपांना बुरशी लागू नये म्हणून खास उपाय...
१. दूध :- थोडेसे दूध स्प्रे बॉटलमध्ये भरून ते रोपांवर स्प्रे केल्यास, दुधातील प्रोटिन्सचा पानांवर एक संरक्षणात्मक थर तयार होतो. जो बुरशी वाढू देत नाही. यासाठी स्प्रे बॉटलमध्ये पाणी आणि दूध एकत्र मिसळा आणि दर ७ दिवसांनी एकदा झाडांवर स्प्रे करा. यामुळे पावसाळ्यात रोपांवर येणारी बुरशीची समस्या कमी होण्यास मदत होते.
२. अॅप्पल सायडर व्हिनेगर :- अॅप्पल सायडर व्हिनेगरमध्ये आम्लीय गुणधर्म असतात, ज्यामुळे झाडांवर बुरशी वाढू शकत नाही. यासाठी थोडं व्हिनेगर पाण्यात मिसळा आणि बुरशी आलेल्या रोपांवर स्प्रे करा. यामुळे पावसाळ्यात ओलाव्याने रोपांवर बुरशी येण्याचं प्रमाण कमी होत. परंतु अॅप्पल सायडर व्हिनेगर जास्त प्रमाणात रोपांवर स्प्रे करू नका, कारण व्हिनेगरच्या अति वापरामुळे रोप कोमेजून खराब होण्याची शक्यता असते.
घराच्या भिंतीत किंवा पाईपवर पिंपळाचं रोप उगवलंय? १ भन्नाट ट्रिक - त्रास होईल कमी...
३. दालचिनी :- दालचिनीत नैसर्गिक अँटी-फंगल गुणधर्म असतात, जे रोपांवरची बुरशी दूर करण्यात मदत करतात. यासाठी दालचिनीची पावडर रोपांच्या मातीमध्ये मिसळा. तसेच, पाण्यात दालचिनी मिसळून द्रावण तयार करून रोपांवर फवारणी केल्यास बुरशी वाढण्याच्या समस्येवर नियंत्रण ठेवता येते.
ऐन पावसाळ्यात तुळशीला बुरशी आली, कीडही पडलं? कुंडीतल्या मातीत घाला फ्रिजमधील २ पदार्थ, बघा जादू...
४. कडुलिंबाच्या पानांचे तेल :- पावसाळ्यात रोपांना किडे आणि बुरशीपासून वाचवण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचे तेल अत्यंत फायदेशीर मानलं जातं. हे एक नैसर्गिक फंगीसाइड आहे. यासाठी लिक्विड सोपं, कडुलिंबाच्या पानांच तेल आणि पाणी एकत्र मिसळून स्प्रे तयार करा आणि झाडांवर फवारणी करा.
५. रोपांसाठी असा करा घरगुती अँटी - फंगल स्प्रे...
स्वयंपाक घरात उपलब्ध असणाऱ्या लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या आणि आल्याचा तुकडा याच्या मदतीने आपण घरीच ऑर्गेनिक फंगीसाइड द्रावण तयार करू शकता. लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या आणि आल्याचा तुकडा या सर्व गोष्टी समान प्रमाणात घेऊन त्याची मिक्सरमध्ये वाटून चांगली पेस्ट तयार करा. त्यानंतर हे मिश्रण पाण्यात घालून गाळून स्प्रे म्हणून झाडांवर फवारणी करा. आठवड्यातून दोनदा स्प्रे केल्यास लवकरच फरक दिसून येईल.