दिवाळीनंतर येणारा सण म्हणजे तुळशीचं लग्न...आपल्याकडे तुळशीच्या लग्नाला खूप मोठे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. कार्तिक महिन्यातील तुळशीच्या लग्नाचा सण मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. तुळशीच्या विवाह समारंभासाठी, प्रत्येकाला आपल्या कुंडीतील तुळस हिरवीगार, पानांनी बहरलेली आणि घनदाट वाढ झालेली असावी असे वाटते. पण, थंडीच्या दिवसांत अनेकदा तुळस सुकते, तिची पाने गळतात किंवा तुळशीच्या रोपाच्या पानांचे प्रमाण कमी होऊन फक्त काड्याच जास्त दिसतात(how to protect tulsi plant before tulsi vivah).
रोपाची पानं पिवळी पडतात, कोमेजतात किंवा वाढ मंदावते अशा एक ना अनेक समस्यांमुळे रोप फारच कोमेजलेलं दिसू लागते. परंतु तुळशीच्या लग्नाच्या शुभ मुहूर्तापूर्वी, तुळशीच्या रोपाला आवश्यक ते पोषण मिळून, रोप हिरवेगार-बहरलेले दिसावे यासाठी थोडी विशेष काळजी घ्यावी लागते. पाण्याचे योग्य प्रमाण सूर्यप्रकाश, खत आणि काही घरगुती उपायांच्या मदतीने आपण तुळशीचं रोप पानांनी बहरलेलं आणि ताजंतवानं ठेवू शकता. तुळशीच्या लग्नापूर्वी कुंडातील रोपाला बहर यावा आणि पाने हिरवीगार, ताजी टवटवीत (how to make tulsi plant green & healthy) दिसावीत यासाठी कोणते खास सिक्रेट उपाय करता येतील ते पाहूयात.
तुळशीच्या लग्नापर्यंत कुंडीतली तुळस होईल हिरवीगार-टवटवीत...
१. योग्य सूर्यप्रकाश आणि आर्द्रता :- तुळशीचे रोप हिरवेगार ठेवण्यासाठी सूर्यप्रकाश आणि ओलावा यांचा योग्य समतोल साधणे सर्वात महत्त्वाचे असते. हिवाळ्याच्या सुरुवातीला तुळशीचे रोप दिवसा चांगला सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा. वातावरणातील तापमान कमी होत असताना रोपाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक असते. रोपाला ऊन दाखवल्यानंतर, त्यावर साध्या पाण्याचा हलका शिडकावा द्यावा. मातीत जास्त पाणी घालायचे नाही, तर फक्त पाने आणि खोडावर हलकेसे पाणी फवारून ओलावा टिकवून ठेवावा.
२. मातीत राख मिसळा :- तुळशीच्या रोपाची योग्य पद्धतीने वाढ होण्यासाठी आपण कुंडातील मातीत लाकडाची किंवा शेणाच्या गोवऱ्या जाळून त्यांची जी राख तयार होते ती घालू शकतो. ही राख तुळशीच्या रोपासाठी एक नैसर्गिक खत म्हणून काम करते. कारण या राखेमध्ये पोटॅशसारखे अनेक आवश्यक पोषक घटक असतात, जे रोपाची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. रोपावर पाण्याचा स्प्रे केल्यानंतर, ही राख तुळशीच्या रोपाच्या पानांवर आणि खोडावर हलकेच भुरभुरवून घाला तसेच थोडी राख आपण कुंडीतील मातीत देखील मिसळू शकतो.
हिवाळ्यात घशाची खवखव- सर्दी - खोकल्यावर नागवेलीच्या पानांचा रामबाण उपाय - एकदाच करा मिळेल आराम...
३. राख रोपासाठी आहे फायदेशीर :- थंडीच्या दिवसांत तुळशीचे रोप सुकण्याचे मुख्य कारण म्हणजे थंड तापमान आणि मातीमध्ये जास्त काळ टिकून राहिलेला ओलावा. राखेमध्ये असलेले घटक रोपाला आतून मजबूती देतात. ही राख तुळशीच्या रोपाचे कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण करते आणि पाने गळण्यापासून रोखते. मातीमध्ये थोडीशी राख मिसळल्याने मातीची संरचना सुधारते आणि फंगस किंवा मूळ कुजण्याचा धोका कमी होतो.
कोमेजून गेलेलं रोपही होईल हिरवेगार, येतील भरभरुन लिंबू! फक्त १० रुपयांचा पांढरा खडा करेल जादू...
४. राखेचा उपाय तुळशीच्या रोपासाठी फायदेशीर :- थंडी सुरू होताच तुळशीच्या रोपावर काहीवेळा सफेद, कापसासारख्या मिलीबगचा हल्ला होतो, ज्यामुळे रोप वेगाने सुकण्यास सुरुवात होते. अशा परिस्थितीत, राखेचा अल्कलाईन (Alkaline) गुणधर्म मिलीबग सारख्या कीटकांना बिलकुल आवडत नाही. जेव्हा आपण रोपावर राख शिंपडता, तेव्हा ती या चिपचिपीत कीटकांना चिकटून राहते आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. दर आठवड्याला राखेचा शिडकावा केल्याने कीटकांचा धोका पूर्णपणे कमी होईल. या खास ट्रिकमुळे तुळशीचे रोप, तुळशीच्या लग्नापर्यंत खूपच सुंदररित्या बहरुन हिरवेगार होईल. कीटक आणि इतर रोगांपासून मुक्त झाल्यामुळे, तुळशीचे रोप आपली संपूर्ण ऊर्जा नवीन पाने वाढवण्यात वापरते, ज्यामुळे त्याची वाढ जलद गतीने होते.



