उन्हाळ्याला आता चांगलीच सुरुवात झाली आहे. या अशा वातावरणात आपल्यालाही जीव नकोसा होऊन जातो, मग कुंडीतल्या रोपांची काय बात.. काही रोपांना उन्हाळा चांगला मानवणारा असला तरी हल्ली उन्हाचा पारा खूप वाढलेला आहे. एवढं तळपतं ऊन कित्येक रोपांना सहन होत नाही. त्यामुळे ते सुकायला लागतात. रोपं सुकली की त्यांना कळ्या, फुलंही चांगली येत नाहीत. म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसांत आठवड्यातून एकदा पुढे सांगितलेला उपाय करा (how to make liquid fertilizers for plants?). हा उपाय तुम्ही नियमितपणे केला तर ऐन उन्हाळ्यातही बघा तुमची बाग कशी हिरवीगार आणि फुलांनी बहरलेली राहील..(home hacks for blooming flowering plants)
उन्हाळ्यातही रोपांना भरपूर फुलं येण्यासाठी घरगुती खत
रोपांना भरपूर फुलं येण्यासाठी आणि त्यांना हिरवेगार ठेवण्यासाठी आपल्याला जो घरगुती उपाय करायचा आहे, त्यासाठी आपल्याला सगळे स्वयंपाक घरातलेच पदार्थ वापरायचे आहेत.
पांढऱ्या केसांना मेहेंदी- कलर लावायला वेळच नाही? 'हा' उपाय करा- १ मिनिटांत केस होतील काळे
आपला रोजचा स्वयंपाक करताना कांदे, बटाटे आपण घेतोच. कांद्याची टरफलं, बटाट्याची सालं एकत्र जमा करा आणि ती २ ते ३ दिवस पाण्यात चांगली भिजू द्या. तुमच्याकडे साधारण १ ते २ लीटर पाणी असेल तर त्यात साधारण ६० ते ८० ग्रॅम एवढा गूळ बारीक करून घाला.
२- ३ दिवसांत पाणी फर्मेंट होईल आणि त्याला फेस आल्यासारखं दिसेल. हे पाणी व्यवस्थित हलवा आणि नंतर गाळून घ्या. गाळून घेतलेलं पाणी जेवढं असेल त्याच्या तिप्पट त्यामध्ये साधं पाणी घाला. आता हे पाणी रोपांना द्या. हे जर तुम्ही नियमितपणे रोपांना दिलं तर रोपं नेहमीच छान टवटवीत राहतील.
निरोगी दीर्घायुष्यासाठी ५ सोपे नियम, आयुर्वेद सांगताे 'या' पद्धतीने दिवसभर कामं करा- आजारपणच विसरा..
बटाट्यामध्ये असणारं पोटॅशियम आणि इतर घटक, कांद्यामध्ये असणारं सल्फर रोपांची चांगली वाढ होण्यासाठी मदत करतात, तर गुळामुळे मातीचा कस वाढतो.
