Join us
Daily Top 2Weekly Top 5

नर्सरीमधील गुलाबाच्या रोपाला येतात तशी टपोरी फुलं हवीत? स्वयंपाकघरातील १ पदार्थ वरदान - फांदीवर फुलतील फुलंच फुलं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2026 10:05 IST

how to increase rose flowering naturally : how to get more flowers in rose plant : homemade fertilizer for roses : वर्षानुवर्षे फुलचं न येणाऱ्या गुलाबाच्या रोपालाही येईल लालचुटुक, गडद रंगांच्या फुलांचा बहर...

आपल्या घराच्या बाल्कनीत किंवा बागेत डोलणारं लालचुटुक गुलाबाचं रोप असावं, असं प्रत्येक हौशी गार्डनिंग करणाऱ्याला वाटतं. आपण मोठ्या आशेने आणि हौसेने गुलाबाचं रोप आणतो, त्याची निगा राखतो, पण काही काळाने रोपाची वाढ खुंटते किंवा त्याला फुलं येणं बंद होतं. अशावेळी आपला हिरमोड होणं स्वाभाविक आहे. खरंतर, गुलाबाचं रोप चांगलं वाढण्यासाठी आणि त्यावर भरपूर फुलं यावीत यासाठी मातीमध्ये योग्य पोषण मिळणं खूप गरजेचं असतं(how to increase rose flowering naturally).

बाजारात मिळणारी महागडी रासायनिक खतं वापरण्यापेक्षा आपल्या स्वयंपाकघरातील एका साध्या पदार्थांचा वापर करून आपण लालचुटुक गुलाबाच्या फुलांचा बहर आणू शकता.  स्वयंपाकघरातील तो पदार्थ म्हणजे 'वापरलेली चहा पावडर'. फेकून दिली जाणारी ही चहा पावडर गुलाबासाठी एखाद्या 'मॅजिक फर्टिलायझर'प्रमाणे काम करते. ही चहा पावडर (how to get more flowers in rose plant) कशी वापरावी आणि गुलाबाच्या रोपासाठी (homemade fertilizer for roses) त्याचे फायदे काय ते पाहूयात. 

गुलाबाच्या रोपाला येतील ढीगभर फुलं! वापरा 'ही' साधी ट्रिक... 

गुलाबाचं रोप हे थोडं 'नाजूक' असतं. त्याला योग्य सूर्यप्रकाश, पाणी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य पोषक तत्वांची गरज असते. अनेकदा मातीतील पोषक तत्वे संपली की रोपाला कळ्या येणं बंद होतं. अशा वेळी घरगुती आणि सेंद्रिय खत म्हणून चहा पावडर अत्यंत फायदेशीर ठरते. 

नवरा-बायकोचं नातं मजबूत आणि रोमॅण्टिक करणाऱ्या २ गोष्टी, नात्याची वीण होईल घट्ट कायमची...

गुलाबाच्या रोपासाठी चहा पावडरच का?

चहा पावडरमध्ये नायट्रोजनचे प्रमाण भरपूर असते, जे रोपाच्या पानांच्या वाढीसाठी आणि फांद्या मजबूत करण्यासाठी आवश्यक असते. याव्यतिरिक्त, चहा पावडरमध्ये असलेले 'टॅनिक ॲसिड' मातीचा पोत सुधारते आणि माती थोडी आम्लयुक्त (Acidic) बनवते. गुलाबाच्या रोपाला आम्लयुक्त माती अतिशय फायदेशीर ठरते, ज्यामुळे त्याला मोठ्या आकाराची आणि गडद रंगाची फुलं येतात. चहाच्या पानांमध्ये ४.४% नायट्रोजन, ०.२४% फॉस्फरस आणि ०.२५% पोटॅशियम असते. यामुळे चहा पावडर हा एनपीके (NPK) खताचा एक उत्तम सेंद्रिय (Organic) स्रोत बनतो, जो रोपांच्या जोमदार वाढीसाठी अत्यंत आवश्यक मानला जातो.

गुलाबाच्या रोपासाठी चहा पावडर नेमकी कशी वापरावी ?

सर्वप्रथम, आपण रोज वापरलेली चहा पावडर थेट कुंडीत टाकू नये. कारण त्यामध्ये साखर किंवा दूधाचे अंश असू शकतात, जे मातीमध्ये कीटक निर्माण करू शकतात. त्यामुळे वापरलेली चहा पावडर स्वच्छ पाण्याने चांगली धुवून घ्यावी. यामुळे त्यातील साखर आणि इतर घटक निघून जातात.

यानंतर ही चहा पावडर १-२ दिवस उन्हात सुकवून घ्यावी. सुकलेली पावडर कुंडीतल्या मातीत हलक्या हाताने मिसळावी. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हा उपाय केल्यास रोपाला हळूहळू पोषण मिळू लागते.

चहा पावडरमुळे मातीची रचना सुधारते आणि माती ओलसर ठेवण्याची क्षमता वाढते. यामुळे रोपाच्या मुळांना योग्य वातावरण मिळतं आणि नवीन कळ्या फुटण्यास मदत होते. परिणामी, गुलाबाच्या रोपावर सुंदर आणि ताजीतवानी फुलं उमलू लागतात.

उन्हाळ्यात कांदा महिनाभर टिकवण्याचे सिक्रेट! उकाड्यातही कांदा राहील फ्रेश - सडणार नाही आणि कोंबही फुटणार नाही... 

यासोबतच, रोपाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळणं आणि योग्य प्रमाणात पाणी देणंही तितकंच महत्त्वाचं आहे. खत घातलं तरी जर रोपाला सूर्यप्रकाश नसेल किंवा जास्त पाणी दिलं तर फुलं येण्यावर परिणाम होऊ शकतो.

नैसर्गिक आणि सोप्या पद्धतीने गुलाबाच्या रोपाला बहर आणायचा असेल, तर चहा पावडरचा हा उपाय नक्की करून पाहा. कमी खर्चात आणि घरच्या घरी मिळणाऱ्या या उपायामुळे तुमचं गुलाबाचं रोप नक्कीच फुलांनी बहरून जाईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Bloom roses like nursery plants: Kitchen ingredient is a boon!

Web Summary : Want abundant roses? Used tea powder is a magic fertilizer! It provides essential nutrients like nitrogen, improves soil, and promotes lush growth and vibrant blooms. Mix dried tea powder into the soil weekly for best results.
टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सहोम रेमेडी