तुळशीच्या (Tulsi Plant) रोपाला फक्त धार्मिक महत्व नसते. यात औषधी गुणसुद्धा असतात. तुळस सुकू नये यासाठी काही घरगुती उपाय तुम्ही करू शकता. युट्यूब चॅनलवर सांगितलेले ४ अचूक उपाय करून तुम्ही रोप बहरलेलं ठेवू शकता. तुळशीचं रोप बहरलेलं ठेवण्यासाठी १० रूपयांचे खत परीणामकारक ठरू शकते. (How To Grow Tulsi Plant At Home)
हिवाळ्यात तुळशीचं रोप सुकू नये यासाठी सगळ्यात आधी तुळशीची जागा बदला. पावसाळा संपल्यानंतर हिवाळा सुरू होतो. दोन्ही वेळेसच्या तापमानात बदल होतो. पावसाळा पूर्ण संपल्यानंतर उन्हात रोप ठेवा. ज्यामुळे पानं हिरवीगार आणि हेल्दी राहतील.
तुळशीला हेल्दी ठेवण्यासाठी मुळांना व्यवस्थित श्वास घेता येणं फार महत्वाचे आहे. यासाठी माती सुकल्यानंतर व्यवस्थित खोदून काढा. एका छोट्या टुलच्या मतीनं माती हलक्या हातानं खोदून घ्या. यामुळे तुळशीच्या मुळांच नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. मुळांना हवा आणि सु्र्याची किरणं मिळायला हवीत. ज्यामुळे मातीत बुरशी येत नाही आणि रोपांची वाढ व्यवस्थित होते.
रोप बहरलेलं ठेवण्यासाठी मंजिरी लगेच काढून टाका. मंजिरी न काढल्यास पूर्ण ऊर्जा बिया तयार होण्यात जाते. ज्यामुळे पानांचा विकास थांबतो आणि रोप सुकू लागते. म्हणून वेळीच मंजिरी आणि सुकलेली पानं काढून टाका ज्यामुळे तुळशीला किड आणि बुरशी लागण्याचा धोका कमी होतो.
रोपांना बुरशी लागू नये यासाठी काय करावं?
हिवाळ्यात मॉईश्चर आल्यामुळे तुळशीवर काळी पानं येतात आणि छोटे किडे लागतात यासाठी गार्डनिंग एक्सपर्ट्सनी घरगुती उपाय सांगितले आहेत. १५ ते २० लवंग २५० मिली पाण्यात उकळवून घ्या. नंतर हे द्रावण थंड करून अर्धा लिटर साध्या पाण्यात मिसळा. हे द्रावण तुळशीच्या पानांवर शिंपडून घ्या.
१० रूपयांची पिवळी पावडर
तुळशीला पोषण देण्यासाठी एक साधा,नैसर्गिक उपाय म्हणजे मोहोरीच्या बियांचा वापर करू शकता. सगळ्यात आधी या बियांची पावडर बनवून घ्या. नंतर १ लिटर पाण्यात जवळपास १०० ग्राम पावडर मिसळा आणि ५ दिवसांसाठी तसंच ठेवा. ५ दिवसांनी हे द्रावण रोपांत घाला. दर २० दिवसांनी कोमट पाण्यात मिसळून मातीत घाला.
