Join us

घरच्या कुंडीतही लावता येईल अळू, मातीत मिसळा किचनमधलं एक खास पाणी; भरभर वाढतील पानं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2024 15:23 IST

How To Grow Taro Plant At Home | Growing Colocasia In Pots : ना खर्च-ना जास्त मेहनत, घरच्या कुंडीत अळूची पानं वाढवण्याची एक सोपी ट्रिक..

महाराष्ट्रीयन थाळीत अळूवडीला (Aluche Paan) विशेष महत्व आहे. सण असो किंवा विशेष दिवस, घरात अळूवडी हमखास केली जाते. हिवाळ्यात अळूवडीची पानं मोठ्या प्रमाणात मिळतात. अळूच्या पानांचा वापर करून आपण वडी, भाजी, भजी तयार करतो. अळूवडीचं नाव जरी ऐकलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. पण आजकल बाजारात विविध प्रकारची पानं मिळतात, जे खाण्यायोग्य नसतात.

काही पानांमुळे घशात खवखव होते ते वेगळंच. जर आपल्याला बाजारातील पानं विकत घेताना १० वेळा विचार करावा लागत असेल तर, घरातल्या कुंडीत अळूच्या पानांचे रोपटे लावा (Gardening Tips). अनेकांना असे वाटते की, अळूची पानं फक्त शेतातच उगवतात. पण असे नाही, आपण घरातही छोट्याशा कुंडीत सुंदर हिरवेगार अळूच्या पानांचे रोपटे लावू शकता(How To Grow Taro Plant At Home | Growing Colocasia In Pots).

अळूची पानं कुंडीत लावण्यासाठी ट्रिक

अळूची पानं कुंडीत लावण्यापूर्वी माती मोकळी करून घ्या. मातीच्या आत अळूचे कंद लावा. कुंडी निवडताना पसरट आकाराच्या कुंडीचा वापर करा. यामुळे योग्य रोपट्याची योग्य वाढ होईल. नियमित कुंडीत पाणी घाला. शिवाय महिन्यातून एकदा घरगुती खताचा वापर करा.

लेकीची माया अशी की आईला घरी आणण्यासाठी १६०० किलोमीटरचा प्रवास करत गेली.. आईसाठी काहीपण..

एका बाऊलमध्ये धुतलेल्या डाळ-तांदुळाचे पाणी घ्या. २ दिवसांसाठी पाणी साठवून ठेवा. या पाण्याचा वापर आपण खत म्हणून करू शकता. जशी पानांची वाढ होईल, तसे महिन्यातून दोनदा हे पाणी मातीत मिसळा.

हे पाणी अळूच्या पानांच्या वाढीसाठी मदत तर करतेच, शिवाय पानांवर हिरवा रंग चढतो. तयार पाणी आपण खत म्हणून मातीत मिसळू शकता. यातील पौष्टीक घटक पानांच्या वाढीस मदत करते.

लेकरु धाडकन पडलं पण आईचं लक्ष डान्स रिलवर, व्हायरल व्हिडिओ-असा कसा हा नाद?

अळूच्या पानांना नियमित पाणी घाला. पण आठवड्यातून किंवा महिन्यातून दोनदा खत म्हणून मुळांशी डाळ-तांदुळाचं पाणी घालून मातीत मिसळा. यामुळे पानांची योग्य वाढ होईल.  

टॅग्स :बागकाम टिप्ससोशल मीडियासोशल व्हायरल