Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Gardening > लहानशा कुंडीतही कमळ लावण्याची पाहा सोपी युक्ती, करा ५ गोष्टी-कमळ फुलतील सुंदर

लहानशा कुंडीतही कमळ लावण्याची पाहा सोपी युक्ती, करा ५ गोष्टी-कमळ फुलतील सुंदर

How To Plant Lotus In Home Balcony : कमळ हे पूर्णपणे पाण्यातील रोप असल्यामुळे कुंडी निवडताना ती पाणी साठवणारी असावी.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 16:39 IST2026-03-03T13:19:48+5:302026-03-03T16:39:28+5:30

How To Plant Lotus In Home Balcony : कमळ हे पूर्णपणे पाण्यातील रोप असल्यामुळे कुंडी निवडताना ती पाणी साठवणारी असावी.

How To Grow Lotus plant At Home : How To Grow Lotus plant In Balcony | लहानशा कुंडीतही कमळ लावण्याची पाहा सोपी युक्ती, करा ५ गोष्टी-कमळ फुलतील सुंदर

लहानशा कुंडीतही कमळ लावण्याची पाहा सोपी युक्ती, करा ५ गोष्टी-कमळ फुलतील सुंदर

आपल्या घरात फुलांची रोपं असावीत असं प्रत्येकालाच वाटतं. कमळाचे रोप लावण्याण्याची पद्धत एकदम सोपी आहे. बाल्कनीत कमळाची लागवड करणं ही अतिशय सुंदर आणि आनंददायी कल्पना आहे. कमळ हे पूर्णपणे पाण्यातील रोप असल्यामुळे कुंडी निवडताना ती पाणी साठवणारी असावी. (How To Grow Lotus plant At Home)

 बाल्कनीत कमळ लावण्यासाठी खास स्टेप्स

1) मोठी कुंडी, प्लास्टीक टब किंवा सिमेंटचा टब वापरू शकता. या भांड्याला खाली छिद्र नसावे. कुंडीचा व्यास जास्त असावा आणि खोली किमान १२ ते १८ इंच असावी.

2) कमळासाठी जर  तुम्ही बागेतील साधी माती वापरत असाल तर ती चाळून घ्या. त्यात थोडं शेणखत किंवा गांडूळ खत मिसळा. कुंडीत माती भरताना ती काठोकाठ भरू नका. कुंडीच्या अर्ध्यापर्यंत माती भरा.

 3) कमळाचे रोप नर्सरीतून विकत आणताना लहान रोप घ्या. मातीमध्ये थोडा खड्डा करून मूळ हलक्या हातानं दाबा. जेणेकरून ते वर तरंगणार नाही.  रोपाच्या खालच्या भागावरून थोडी माती झाकून  टाका. 

 4) आता कुंडीत हळूहळू पाणी ओता. पाणी भरताना माती ढवळली जाणार नाही याची काळजी घ्या. पाण्यानं कुंडी पूर्ण भरा. कमळाच्या रोपाला दिवसातील किमान ५ ते ६ तास प्रखर सुर्यप्रकाश मिळणं आवश्यक असतं. जर बाल्कनीत सावली असेल तर कमळ फुलणार नाही. त्यामुळे तुमच्या बाल्कनीत जिथे सर्वात जास्त ऊन येतं तिथे कुंडी ठेवा.

5) बाष्पीभवनामुळे पाणी कमी झाल्यास नियमितपणे वरून पाणी ओतून पाणी पातळी टिकवून ठेवा. पाण्यात डास होऊ नयेत म्हणून  तुम्ही कुंडीत  गप्पी मासे सोडू शकता किंवा आठवड्यातून एकदा पाणी बदलून घ्या. महिन्याभरात एकदा पाण्यात विरघळणारे पोटॅशयक्त खत किंवा कमळासाठी मिळणारे विशेष पॉन्ड टॅब्लेट्स वापरू शकता. कुंडीत साचलेले पाणी दर १५ ते २० दिवसांनी थोडं बदला. ज्यामुळे शेवाळ जमा होत नाही. पाण्यावरची वाळलेली पानं वेळोवेळी कात्रीनं कापून घ्या.

Web Title : घर पर कमल उगाएँ: बालकनी में फूलने के लिए 5 चरण

Web Summary : इन पाँच चरणों का पालन करके आसानी से घर पर कमल उगाएँ। पानी रोकने वाले बर्तन का उपयोग करें, मिट्टी को खाद के साथ मिलाएं और पर्याप्त धूप सुनिश्चित करें। पानी का स्तर बनाए रखें, मच्छरों को नियंत्रित करें और सुंदर फूलों के लिए मृत पत्तियों को छाँटें।

Web Title : Grow Lotus at Home: 5 Steps for Balcony Blooms

Web Summary : Easily grow lotus at home using these five steps. Use a water-retaining pot, mix soil with fertilizer, and ensure ample sunlight. Maintain water levels, control mosquitoes, and trim dead leaves for beautiful blooms.