गार्डनिंगची आवड बऱ्याच जणांना असते. काही जणांना फुलझाडं आवडतात तर काही जणांना डोळ्यांना आकर्षक दिसणारी शो ची वेगवेगळी रोपं लावायला आवडते. किचन गार्डनिंग हा ट्रेण्डही खूप वाढला आहे. यामध्ये आपल्याला स्वयंपाक घरात नेहमीच लागणारी रोपं काही जणं हौशीने आपल्या बागेत लावतात. त्यापैकी एक म्हणजे हिरव्या मिरच्या. रोजच्या स्वयंपाकात एखादी तरी हिरवी मिरची असतेच.. त्यामुळेच आता तुमच्याकडच्या छोट्याशा कुंडीमध्ये मिरचीचं रोप लावून पाहा (how to grow green chilli plant at home?). अगदी महिनाभरातच त्या रोपाला भरपूर मिरच्या लागतील. काही महिन्यांनी तर मिरच्या विकत घेण्याची गरजच उरणार नाही.(4 remedies for the fast growth of green chili plant)
कुंडीमध्ये मिरचीचं रोप कसं लावावं?
१. मिरचीचं रोप तुम्हाला लावायचं असेल तर त्यासाठी थोड्या मध्यम आकाराची कुंडी निवडा. ज्या कुंडीचा व्यास साधारण १० ते १२ इंचाचा असेल अशी कुंडी अगदी परफेक्ट आहे.
त्वचेला नेहमीच तरुण- सुंदर ठेवणाऱ्या ५ साध्या, सोप्या गोष्टी! फेशियल, क्लिनअपची गरजच नाही
२. मिरचीच्या रोपाला हलकी आणि भुसभुशीत माती गरजेची असते. यासाठी शेणखत, कंपोस्ट खत, रेती आणि माती हे सगळं समप्रमाणात घ्या आणि मग अशी माती कुंडीमध्ये भरा.
३. मिरचीचं रोप तुम्ही नर्सरीतून विकत आणून लावू शकता किंवा मग घरातल्या मिरच्यांच्या बिया काढून त्या कुंडीमध्ये खोचा. कुंडीमध्ये खूप पाणी घालू नका पण कुंडीतली माती नेहमीच ओलसर राहील याची मात्र काळजी घ्या.
लाकडी पोळपाट- लाटणं काळपट हिरवं होऊन चिकट झालं? १ उपाय- पोळपाट लाटणं होईल स्वच्छ
४. मिरचीच्या रोपाची कुंडी ४ ते ५ तास उन्हामध्ये ठेवा. कारण मिरचीच्या रोपाला भरपूर उन्हाची गरज असते. मिरचीचं रोप लावल्यानंतर त्याला १५ दिवसांनी थोडं खत द्या. योग्य खत मिळाल्यावर रोपाची जोमाने वाढ होते.