Lokmat Sakhi >Gardening > महागडं ड्रॅगन फ्रुट विकत घेण्यापेक्षा आता रोपच लावा मोठ्या कुंडीत! बघा ट्रिक- ताजे ड्रॅगन फ्रूट खा भरपूर

महागडं ड्रॅगन फ्रुट विकत घेण्यापेक्षा आता रोपच लावा मोठ्या कुंडीत! बघा ट्रिक- ताजे ड्रॅगन फ्रूट खा भरपूर

Gardening Tips For Dragon Fruit Plant: ड्रॅगन फ्रुटचं रोप तुमच्या छोट्याशा टेरेस गार्डनमध्ये नक्कीच लावता येतं. बघा त्यासाठी नेमकं काय करायचं...(simple tips and tricks to plant dragon fruit in your terrace garden)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2025 16:38 IST2025-04-01T16:20:06+5:302025-04-01T16:38:54+5:30

Gardening Tips For Dragon Fruit Plant: ड्रॅगन फ्रुटचं रोप तुमच्या छोट्याशा टेरेस गार्डनमध्ये नक्कीच लावता येतं. बघा त्यासाठी नेमकं काय करायचं...(simple tips and tricks to plant dragon fruit in your terrace garden)

how to grow dragon fruit plant in terrace garden, simple tips and tricks to plant dragon fruit in your terrace garden | महागडं ड्रॅगन फ्रुट विकत घेण्यापेक्षा आता रोपच लावा मोठ्या कुंडीत! बघा ट्रिक- ताजे ड्रॅगन फ्रूट खा भरपूर

महागडं ड्रॅगन फ्रुट विकत घेण्यापेक्षा आता रोपच लावा मोठ्या कुंडीत! बघा ट्रिक- ताजे ड्रॅगन फ्रूट खा भरपूर

Highlightsत्याच्यासाठी जी कुंडी निवडाल तिचा व्यास कमीतकमी १५ इंच तरी असावा. तसेच ती पुरेशी खोलही असावी.

ड्रॅगन फ्रुटचं प्रस्थ सध्या खूप जास्त वाढलं आहे. हे फळं अनेक जणांना खूप आवडतं आणि शिवाय ते पौष्टिक असल्यामुळे आरोग्यासाठीही चांगलं असतं. पण असं सगळं असलं तरी त्याची किंमत खूपच जास्त आहे. त्यामुळे वरचेवर एवढं महागडं फळं घेऊन खाणं सर्वसामान्यांना परवडणारं नाही. म्हणूनच आता आपल्या टेरेसमध्येच ड्रॅगन फ्रुटचं रोप कसं लावायचं याची ही सोपी पद्धत पाहून घ्या (how to grow dragon fruit plant in terrace garden?). तज्ज्ञ असं सांगतात की आकाराने मोठ्या असलेल्या कुंडीमध्ये तुम्ही ड्रॅगन फ्रुटचं रोप सहज लावू शकता (Gardening Tips For Dragon Fruit Plant). त्यासाठी नेमकं काय करायचं आणि त्या रोपाची कशी काळजी घ्यायची ते पाहुया...(simple tips and tricks to plant dragon fruit in your terrace garden)

 

कुंडीमध्ये ड्रॅगन फ्रुटचं रोप कसं लावावं?

१. सगळ्यात आधी तर ही गोष्ट लक्षात घ्या की ड्रॅगन फ्रुटच्या रोपाची चांगली वाढ होण्यासाठी त्याला मोठ्या आकाराच्या कुंडीची गरज असते. त्यामुळे त्याच्यासाठी जी कुंडी निवडाल तिचा व्यास कमीतकमी १५ इंच तरी असावा. तसेच ती पुरेशी खोलही असावी.

एक्सपर्ट सांगतात ९० टक्के लोक चुकीच्या पद्धतीने टरबूज खातात? पाहा तुमचंही चुकत नाही ना

२. ड्रॅगन फ्रुटच्या रोपाची वाढ उष्ण वातावरणात अधिक चांगली होते. त्यामुळे एप्रिलचा महिना त्या रोपाच्या लागवडीसाठी उत्तम आहे. त्यामुळे तुमच्या शहरातल्या नर्सरीतून किंवा ऑनलाईन नर्सरीमधून तुम्ही ते मागवू शकता. मध्यम आकाराचं रोप जर आणलं तर साधारण एखाद्या वर्षात त्याला फळं यायला सुरुवात होते. ही कुंडी मात्र ४ ते ५ तास ऊन येईल अशा ठिकाणी ठेवावी.

 

३. कुंडीमध्ये माती भरतानाही थोडी काळजी घ्यावी. यामध्ये गार्डन साॅईलचे म्हणजेच मातीचे प्रमाण ४० टक्के, कोकोपीट ३० टक्के, कंपोस्ट २० टक्के आणि वाळू १० टक्के या प्रमाणात घ्यावी. तसेच कुंडीतली माती नेहमीच चांगली ओलसर राहील एवढं पाणी त्याला घालावं. पण जर तुमच्याकडे सुर्यप्रकाश थोडा कमी असेल तर मात्र एक दिवसाआड पाणी घातले तरी चालते.

मुलांना भूकच लागत नाही? २ सोपे उपाय, व्यवस्थित पोटभर जेवतील- तब्येत सुधारेल

४. सुरुवातीच्या दिवसांत या रोपाला थोडा काठीचा आधार द्या आणि वेळोवेळी खत घालून त्यावर गरज पडल्यास किटकनाशके फवारा. अगदी एक- दिड वर्षातच तुमच्याकडे भरपूर ड्रॅगनफ्रुट येतील. 

 

Web Title: how to grow dragon fruit plant in terrace garden, simple tips and tricks to plant dragon fruit in your terrace garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.