Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Gardening > घरीच कमी जागेत लावा काजूचं रोप; रोप वाढवण्याच्या ५ स्टेप्स, रोपाला भरपूर काजू लागतील

घरीच कमी जागेत लावा काजूचं रोप; रोप वाढवण्याच्या ५ स्टेप्स, रोपाला भरपूर काजू लागतील

How To Grow Cashew Plant At Home : काजूचं रोप घरी लावणं सोपं आहे त्यासाठी फार काही करावं लागत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 01:15 IST2025-10-25T01:06:52+5:302025-10-25T01:15:38+5:30

How To Grow Cashew Plant At Home : काजूचं रोप घरी लावणं सोपं आहे त्यासाठी फार काही करावं लागत नाही.

How To Grow Cashew Plant At Home : Step by Step Method To Grow Cashew Plant At Home | घरीच कमी जागेत लावा काजूचं रोप; रोप वाढवण्याच्या ५ स्टेप्स, रोपाला भरपूर काजू लागतील

घरीच कमी जागेत लावा काजूचं रोप; रोप वाढवण्याच्या ५ स्टेप्स, रोपाला भरपूर काजू लागतील

काजू (Cashew Plant) हे उष्ण हवामानातील पीक असून ते मुख्यतः महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर घेतले जाते. परंतु, योग्य काळजी घेतल्यास आणि पुरेसा सूर्यप्रकाश उपलब्ध असल्यास तुम्ही घरच्या बागेत किंवा मोठ्या कुंडीत काजूचे रोप लावण्याचा प्रयत्न करू शकता. काजूचं रोप घरी लावणं सोपं आहे त्यासाठी फार काही करावं लागत नाही. (How To Grow Cashew Plant At Home)

रोपाची निवड

काजूची लागवड करताना, बियांऐवजी कलमाचा (Grafted Sapling) वापर करणे अधिक फायदेशीर ठरते. बियांपासून लावलेल्या रोपाला फळ येण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि उत्पन्न कमी मिळते. 'वेंगुर्ला ४' किंवा 'वेंगुर्ला ७' यांसारख्या सुधारित जातीच्या कलमांची निवड करा. कलम योग्य निवडल्यास झाडाची वाढ चांगली होते आणि लवकर फळे मिळण्याची शक्यता वाढते.

 योग्य वेळ आणि ठिका

काजूचे रोप लावण्यासाठी पावसाळ्याची सुरुवात (जून-जुलै) हा सर्वोत्तम काळ आहे. या रोपाला उष्ण आणि दमट हवामान अनुकूल असते, तसेच स्वच्छ व भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक आहे (दिवसातून किमान ६ ते ८ तास). रोप अशाच ठिकाणी लावा.

 माती आणि कुंडी

काजूसाठी लालसर, जांभा दगडापासून तयार झालेली आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी माती उत्तम. कुंडीत लावायचे असल्यास, पाण्याचा निचरा होण्यासाठी छिद्रे असलेली आणि मोठी (१८ ते २४ इंच) कुंडी वापरा. मातीमध्ये पालापाचोळ्याचे खत किंवा शेणखत मिसळून माती तयार करा.

गुलाबाची पानं पिवळी होतात-फुलंच येत नाही? १ खास ट्रिक, लालबुंद गुलाबांनी बहरेल रोप

रोपण प्रक्रिया

कुंडीत किंवा जमिनीत रोपाच्या मुळांच्या आकाराचा खड्डा खणा. रोपाचे कलम पिशवीतून काळजीपूर्वक काढून खड्ड्यात ठेवा आणि मातीने व्यवस्थित झाका. सुरुवातीला रोपाच्या बाजूने लाकडी आधार द्या, जेणेकरून ते सरळ उभे राहील. नंतर रोपाला ताबडतोब पाणी द्या.

पोहे चिकट होतात तर कधी वातड लागतात? ७ टिप्स, मऊ-मोकळे चवदार पोहे होतील घरीच

रोपाची काळजी

रोपाला नियमितपणे पाणी द्या, पण मातीत पाणी साचू देऊ नका. रोपाची उंची सुमारे १ मीटर झाल्यावर त्याचा शेंडा काढून टाका, जेणेकरून त्याला जास्त फांद्या फुटतील. सुरवातीच्या काही वर्षांत रोगांपासून संरक्षण करण्यासाठी योग्य ती कीटकनाशके फवारा. दरवर्षी रोपाला कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत दिल्यास फुलं येण्यास आणि फळं होण्यास मदत होते.

Web Title : घर पर काजू उगाएँ: भरपूर फसल के लिए सरल उपाय।

Web Summary : उचित देखभाल से घर पर काजू उगाना आसान है। वेंगुर्ला 4 या 7 जैसे ग्राफ्टेड पौधे का उपयोग करें। मानसून के दौरान अच्छी जल निकासी वाली मिट्टी में पर्याप्त धूप में लगाएं। नियमित रूप से पानी दें, ऊपर से काटें और बेहतर उपज के लिए खाद का प्रयोग करें।

Web Title : Grow cashew at home: Simple steps for a bountiful harvest.

Web Summary : Growing cashew at home is easy with proper care. Use grafted saplings like Vengurla 4 or 7. Plant during monsoon in well-drained soil with ample sunlight. Water regularly, prune the top, and use manure for better yield.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.