हल्ली किचन गार्डनिंगचा ट्रेण्ड खूप वाढतो आहे. कारण लहानशा जागेतही खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावता येऊ शकतात, हे लोकांना आता समजलेलं आहे. शिवाय थोडी काळजीपुर्वक रोपं लावली आणि ती वाढवली तर घरच्याघरीच आपल्याला पुरेशा ताज्या भाज्या तयार होऊ शकतात. तुम्हालाही किचन गार्डनिंगची आवड असेल तर सिमला मिरचीचं रोपही लावून पाहा (simple tips and tricks to grow simla mirchi at home). खूप काळजी न घेताही हे रोप चांगलं वाढतं आणि त्याला भरपूर सिमला मिरची येऊ शकतात (how to grow capsicum or simla mirchi at home?). त्यासाठी रोप लावताना आणि ते वाढविताना नेमकी काय काळजी घ्यायची ते पाहा..(gardening tips for simla mirchi or capsicum in balcony)
घरी सिमला मिरचीचं रोप लावताना कोणती काळजी घ्यावी?
१. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कोणतं रोप किती वाढतं यावर ते रोप किती मोठ्या कुंडीत लावायचं हे ठरत असतं. सिमला मिरचीचं रोप खूप जास्त वाढत नाही. त्यामुळे लांबी आणि खोली साधारण १० ते १२ इंच असेल एवढी कुंडी त्यासाठी पुरेशी ठरते. त्या कुंडीच्या तळाशी ४ ते ५ छोटी छिद्रं पाडून घ्या जेणेकरून पाण्याचा व्यवस्थित निचरा होईल.
२. कोणत्याही फळभाज्या, पालेभाज्या लावण्यासाठी माती कसदार असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे जेव्हा सिमला मिरची लावण्यासाठी माती तयार कराल तेव्हा त्यात ६० टक्के माती, १० टक्के वाळू आणि २० टक्के गांडूळ खत किंवा शेणखत या प्रमाणात ती भरा. यामुळे मातीचा कस वाढेल आणि रोपाची चांगली वाढ होईल.
३. सिमला मिरचीचं बी लावण्यापेक्षा जर रोप लावलं तर ते अधिक वेगाने वाढतं. तुम्ही बी लावूनही सिमला मिरचीचं राेप उगवू शकता. कुंडीमध्ये बी किंवा रोप लावल्यानंतर ती अशा ठिकाणी ठेवा जिथे ५ ते ६ तास चांगलं ऊन येतं.
दुप्पट फुगून कापसासारखा मऊ होणारा गुजरात स्पेशल खमण ढोकळा! रेसिपी एकदा ट्राय करून पाहाच..
शिवाय रोपाला खूप पाणी घालू नका. मातीचा वरचा थर कोरडा झालेला दिसल्यावरच पाणी घाला. १० दिवसांतून एकदा या रोपाला थोडं जैविक खत घालत राहा. या पद्धतीने काळजी घेतल्यास काही दिवसांतच तुम्हाला घरी उगवलेल्या फ्रेश सिमला मिरची खायला मिळतील. ट्राय करून पाहा.
Web Summary : Grow capsicum at home with these simple gardening tips. Use a 10-12 inch pot with drainage. Nutrient-rich soil mix is key. Plant seedlings in a sunny spot, water sparingly, and fertilize occasionally for a bountiful harvest.
Web Summary : इन आसान गार्डनिंग टिप्स से घर पर शिमला मिर्च उगाएं। जल निकासी के साथ 10-12 इंच का गमला इस्तेमाल करें। पोषक तत्वों से भरपूर मिट्टी का मिश्रण ज़रूरी है। धूप वाली जगह पर पौधे लगाएं, कम पानी दें और समय-समय पर खाद डालें।