Lokmat Sakhi >Gardening > लिंबाच्या बिया फेकू नका, रुजतील मातीच्या कुशीत! वर्षभर कुंडीतल्या रोपाला येतील पिवळेधमक लिंबू...

लिंबाच्या बिया फेकू नका, रुजतील मातीच्या कुशीत! वर्षभर कुंडीतल्या रोपाला येतील पिवळेधमक लिंबू...

Gardening Tips : How To Grow Lemon Plant In Pot : How to grow lemons in the balcony garden : How to grow lemon in your balcony or terrace : How To Grow Lemon Plant At Home : How To Grow And Care For A Lemon Tree From Seed : लिंबाचा रस काढून बिया फेकून देण्याऐवजी, 'या' पद्धतीने बाल्कनीत लावा लिंबाचे रोपं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2025 09:02 IST2025-04-12T08:56:53+5:302025-04-12T09:02:15+5:30

Gardening Tips : How To Grow Lemon Plant In Pot : How to grow lemons in the balcony garden : How to grow lemon in your balcony or terrace : How To Grow Lemon Plant At Home : How To Grow And Care For A Lemon Tree From Seed : लिंबाचा रस काढून बिया फेकून देण्याऐवजी, 'या' पद्धतीने बाल्कनीत लावा लिंबाचे रोपं...

How To Grow And Care For A Lemon Tree From Seed How to grow lemons in the balcony garden | लिंबाच्या बिया फेकू नका, रुजतील मातीच्या कुशीत! वर्षभर कुंडीतल्या रोपाला येतील पिवळेधमक लिंबू...

लिंबाच्या बिया फेकू नका, रुजतील मातीच्या कुशीत! वर्षभर कुंडीतल्या रोपाला येतील पिवळेधमक लिंबू...

दिवसेंदिवस जसजसा उन्हाळा वाढत जातो, तसे उष्णता आणि गरमीचा त्रास सतावतो. उन्हाळ्यांत थंडाव्यासाठी आपण सतत काही ना काही थंडगार खातो - पितो. या उन्हाळ्याच्या दिवसांत (How to grow lemons in the balcony garden) सगळ्यांच्याच घरोघरी हमखास लिंबाचे सरबत केले जाते. रणरणत्या उन्हांत लिंबू पाणी पिणे फायदेशीर असते. अनेकदा आपण रोजच्या आहारात लिंबाचा फार मोठ्या प्रमाणावर वापर करतो. लिंबाचा रस काढल्यानंतर शक्यतो आपण लिंबाच्या बिया (How To Grow And Care For A Lemon Tree From Seed) आणि पिळलेल्या लिंबाची फोड फेकून देतो.

लिंबात असणाऱ्या बिया या निरुपयोगी आहेत, त्यांचा काहीच उपयोग करता येऊ शकत नसल्याने बिया चक्क कचऱ्याच्या डब्यांत फेकून देतो. परंतु या बिया फेकून न देता कुंडीतील मातीत पेरल्या तर लिंबाच्या रोपाला रसाळ लिंब येतील. रोजच्या वापरासाठी आपण बाजारांतून लिंबू विकत आणतो किंवा काहीवेळा लिंबू रासायनिक खत, फवारणी करुन ( How to grow lemon in your balcony or terrace) पिकवले जातात. अशा परिस्थितीत, आपण चक्क वापरलेल्या लिंबाच्या बिया मातीत रुजवून घरच्याघरीच छान रसाळ, पिवळेधमक आणि केमिकल्स फ्री लिंबू अगदी सहज पिकवू शकतो. यासाठी लिंबाच्या बिया निरुपयोगी समजून फेकून न देता, या बियांचे रोपं कसे तयार करायचे ते पाहूयात(How To Grow Lemon Plant At Home).

लिंबाच्या बिया फेकू नका, मग करायचं काय ते पाहा... 

लिंबाच्या बिया फेकून न देता त्याचे रोपं कसे तयार करायचे याचा व्हिडीओ growing_gardening_beauty या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. यासाठी आपल्याला लिंबाच्या बिया, पाणी, कॉटनचा रुमाल, प्लॅस्टिकचा पारदर्शक डबा इतक्या गोष्टींची गरज लागणार आहे. 

कलिंगडाची सालं म्हणजे रोपांसाठी 'अमृतच'! फेकू नका, 'या' पद्धतीने करा रोपांसाठी वापर - रोपांना येईल बहर...

सगळ्यांत आधी रस काढून पिळलेल्या लिंबातील सगळ्या बिया बाजूला काढून त्या वेगळ्या करा. आता या सगळ्या बिया चांगल्या स्वच्छ धुवून घ्याव्यात. आता एक स्वच्छ कॉटनचा रुमाल घेऊन त्या रुमालात या बिया ठेवाव्यात. आता या रुमालावर पाणी शिंपडून तो संपूर्णपणे पाण्याने भिजवून घ्या. त्यानंतर या बिया रुमालाच्या बरोबर मधोमध ठेवून रुमालाची नेहमीप्रमाणे घडी घालून घ्यावी. आता हा रुमाल एका प्लॅस्टिकच्या पारदर्शक डब्यांत ठेवून द्यावा. त्यानंतर दररोज हा रुमाल थोडे पाणी शिंपडून ओला करून घ्यावा.

घराच्या भिंतींवर पाली फिरतात? दार - खिडक्यांजवळ लावा 'ही' ५ रोपं, पाली घराच्या आसपास फिरकणारही नाही...

साधारणपणे २ आठवड्यांनंतर आपण पाहू शकता की त्या बियांना लहानसे कोंब आलेले दिसतील. आता या कोंब आलेल्या बिया मातीने भरलेल्या कुंडीत व्यवस्थित रुजवाव्यात. रोपाला दररोज थोडे पाणी आणि सूर्यप्रकाश दाखवावा. थोड्याच दिवसांत या बियांचे सुंदर अशा रोपात रूपांतरीत झालेले तुम्हाला दिसेल. रोप जसजसे मोठे होईल तसे त्याला लिंबू येऊ लागतील. अशाप्रकारे आपण लिंबाच्या बिया फेकून न देता त्याचे रोप कुंडीत लावून घरच्याघरीच पिवळेधमक रसाळ लिंबू अगदी सहज पिकवू शकता.


Web Title: How To Grow And Care For A Lemon Tree From Seed How to grow lemons in the balcony garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.