Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Gardening > कोमेजून गेलेलं रोपही होईल हिरवेगार, येतील भरभरुन लिंबू! फक्त १० रुपयांचा पांढरा खडा करेल जादू...

कोमेजून गेलेलं रोपही होईल हिरवेगार, येतील भरभरुन लिंबू! फक्त १० रुपयांचा पांढरा खडा करेल जादू...

home gardening hacks for lemon plant : how to make lime tree grow faster : lemon plant not flowering remedies : organic ways to grow lime tree : लिंबाच्या रोपाची वाढ सुधारण्यासाठी आणि त्याला लिंबू येण्यासाठी तुरटीचा नेमका कसा उपयोग करायचा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2025 17:28 IST2025-10-27T17:14:49+5:302025-10-27T17:28:17+5:30

home gardening hacks for lemon plant : how to make lime tree grow faster : lemon plant not flowering remedies : organic ways to grow lime tree : लिंबाच्या रोपाची वाढ सुधारण्यासाठी आणि त्याला लिंबू येण्यासाठी तुरटीचा नेमका कसा उपयोग करायचा...

home gardening hacks for lemon plant how to make lime tree grow faster lemon plant not flowering remedies organic ways to grow lime tree | कोमेजून गेलेलं रोपही होईल हिरवेगार, येतील भरभरुन लिंबू! फक्त १० रुपयांचा पांढरा खडा करेल जादू...

कोमेजून गेलेलं रोपही होईल हिरवेगार, येतील भरभरुन लिंबू! फक्त १० रुपयांचा पांढरा खडा करेल जादू...

आपल्यापैकी बरेचजण घराच्या गार्डनमध्ये किंवा बाल्कनीत वेगवेगळ्या प्रकारची रोपं मोठया हौसेने लावतात. ही रोपं लावल्यानंतर त्यांची तितकीच देखभाल व काळजी देखील घ्यावी लागते. घराच्या बाल्कनी, गार्डनमध्ये विविध प्रकारची फळंझाडं, फुलझाडांमध्ये काही कॉमन झाडं आसतात, लिंबाचे रोप हे त्यापैकीच एक. घराच्या (organic ways to grow lime tree) बागेत लावलेलं लिंबाचं रोप वरुन हिरवंगार दिसत असलं तरी त्याला लिंबू येत नाहीत, अशी तक्रार अनेकजण करतात. लिंबाच्या छोट्या रोपाची योग्य वाढ होत नसेल किंवा अपेक्षित प्रमाणांत लिंबू लागत नसतील, तर नक्कीच आपल्याला वाईट वाटून हिरमोड होतो(how to make lime tree grow faster).

लिंबाचं रोप लावणं सोपं आहे, पण त्याला भरभरून लिंबू लागायला योग्य पोषण आणि देखभाल करण्याची गरज असते. अनेकदा भरपूर मेहनत घेऊनही रोपाची वाढ खुंटते किंवा लिंबू येत नाहीत. पण काळजी करू नका! स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणारा आणि अगदी स्वस्त असलेला एक पदार्थ तुमच्या या समस्येवर जादूई उपाय ठरू शकतो तो म्हणजे तुरटी! तुरटी लिंबाच्या रोपासाठी नैसर्गिक टॉनिकचं काम करते. तुरटीमुळे जमिनीचं pH संतुलन सुधारतं, मुळांची वाढ वेगाने होते आणि फुलं-फळं येण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते. तुरटीमध्ये असे काही नैसर्गिक गुणधर्म असतात, जे लिंबाच्या रोपाला आवश्यक पोषक तत्वे पुरवून त्याची वाढ वेगाने करतात आणि लिंबू येण्याच्या प्रक्रियेला चालना देतात. लिंबाच्या रोपाची वाढ सुधारण्यासाठी आणि त्याला लिंबू येण्यासाठी तुरटीचा नेमका कसा (lemon plant not flowering remedies) उपयोग करायचा, त्याचे योग्य प्रमाण आणि पद्धत काय आहे ते पाहूयात... 

१० रुपयांची तुरटी करेल कमाल, लिंबाच्या रोपाला येईल बहर... 

फक्त १० रुपयांच्या तुरटीचे तयार केलेले मिश्रण लिंबाच्या रोपाला फक्त कीटकांपासूनच वाचवत नाही, तर रोपाला जास्त लिंबू येण्यास आणि रोपाची चांगली वाढ होण्यास देखील मदत करते. लिंबाच्या रोपासाठी तुरटीचे मिश्रण तयार करण्यासाठी ताक, तुरटी आणि शाम्पू इतक्या तीन गोष्टींची गरज लागणार आहे. 

घरभर डास- माशा घोंगावतात, चावतात? घरीच करा १ जादुई दिवा - फक्त वात पेटवा आणि पाहा कमाल...  
 

नेमका उपाय काय आहे ? 

सर्वप्रथम ५० मिली ताक एक लीटर पाण्यामध्ये मिसळा. आता त्यात तुरटीचा एक तुकडा २ मिनिटांसाठी घाला आणि त्यानंतर लगेच बाहेर काढून घ्या. एक रुपयाचा शॅम्पूचा पाऊच त्यात मिसळताच, हे मिश्रण वापरण्यासाठी तयार होईल.

तयार केलेलं मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून स्टोअर करा. आता संध्याकाळच्या वेळी किंवा जेव्हा कडक ऊन नसेल तेव्हा सकाळच्या वेळी संपूर्ण रोपावर त्याचा शिडकावा द्या. पानांच्या वरच्या आणि खालच्या बाजूस विशेष लक्ष देत, रोपाला या मिश्रणाने पूर्णपणे भिजवून घ्या. रोपाच्या खोडावर आणि फांद्यांवर देखील स्प्रे करा. तुरटीमध्ये असलेले ॲल्युमिनियम आणि सल्फेट हे क्लोरोफिल तयार करण्यासाठी आणि रोपाची ऊर्जा फुलांकडे वळवण्यासाठी आवश्यक असते. हे मिश्रण  रोपाची वाढ आणि फळांच्या वाढीस चालना देण्यास देखील मदत करतो. 

थंडीतही तुळस राहील हिरवीगार, टवटवीत! कुंडीजवळ करा हे '५' घरगुती उपाय, रोपटे सुकणार नाही... 

लिंबाच्या रोपावर हा तुरटीचा घरगुती उपाय केल्यास, रोपावरील कीटक निघून गेल्यानंतर रोपातील पोषक तत्वांचे संतुलन होऊन रोप फळ देण्यासाठी अनुकूल होते. जर रोपावर कीटक खूप जास्त दिसत असतील तर या स्प्रे ची फवारणी दर ७ ते १० दिवसांनी पुन्हा करू शकता. या स्वस्त आणि सोप्या पद्धतीने थोड्याच दिवसांत तुम्हाला दिसेल की फुले गळून पडणे थांबते आणि त्या फुलांच्या जागी पिवळे धम्मक लिंबू येऊ लागतात.

Web Title : हरे-भरे नींबू: दस रुपये के नुस्खे से अपने पेड़ को बदलें!

Web Summary : फिटकरी के घोल से नींबू के पेड़ को पुनर्जीवित करें। फिटकरी, छाछ और शैम्पू मिलाएं। विकास को बढ़ावा देने, कीटों से लड़ने और भरपूर नींबू प्राप्त करने के लिए पौधे पर स्प्रे करें। आसान, किफायती बागवानी!

Web Title : Green Lemons Galore: Transform Your Tree with a Ten-Rupee Trick!

Web Summary : Rejuvenate lemon trees using a simple alum solution. Mix alum, buttermilk, and shampoo. Spray on the plant to boost growth, fight pests, and yield abundant lemons. Easy, affordable gardening!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.