Lokmat Sakhi >Gardening > कुंडीतली रोपंही देतील एकावेळी किलोभर टोमॅटो- ५ सोप्या टिप्स, टोमॅटो विकत घ्यावेच लागणार नाहीत

कुंडीतली रोपंही देतील एकावेळी किलोभर टोमॅटो- ५ सोप्या टिप्स, टोमॅटो विकत घ्यावेच लागणार नाहीत

5 Important Tips To Grow Tomato Plant In Terrace Garden: छोट्याशा जागेत अगदी बाल्कनीमध्येही तुम्ही टोमॅटोचं रोप लावू शकता. बघा त्यासाठी नेमकं काय करायचं....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2024 12:14 PM2024-05-14T12:14:02+5:302024-05-14T12:25:22+5:30

5 Important Tips To Grow Tomato Plant In Terrace Garden: छोट्याशा जागेत अगदी बाल्कनीमध्येही तुम्ही टोमॅटोचं रोप लावू शकता. बघा त्यासाठी नेमकं काय करायचं....

Gardening tips for tomato, how to grow tomato in pots, 5 important tips to grow tomato plant in terrace garden | कुंडीतली रोपंही देतील एकावेळी किलोभर टोमॅटो- ५ सोप्या टिप्स, टोमॅटो विकत घ्यावेच लागणार नाहीत

कुंडीतली रोपंही देतील एकावेळी किलोभर टोमॅटो- ५ सोप्या टिप्स, टोमॅटो विकत घ्यावेच लागणार नाहीत

Highlightsमोठी जागाच पाहिजे असं काही नाही. बाल्कनीत ठेवलेल्या मध्यम आकाराच्या कुंडीतही टोमॅटोचं रोप उत्तम वाढतं...

टोमॅटो ही अगदी आपल्याला रोजच्या स्वयंपाकात लागणारी भाजी किंवा फळ. टोमॅटो हाताशी असेल तर वरणाला मस्त चव येते. किंवा एखादी भाजी कमी पडत असेल तर तिच्यात टोमॅटो टाकून आपण सरळ भाजीचे प्रमाण वाढवून टाकू शकतो. कोशिंबीर किंवा कच्चा तोंडी लावण्यासाठीही टोमॅटो लागतोच. मसालेदार भाज्या करायच्या असतील तर त्या टोमॅटोशिवाय होतच नाहीत. त्यामुळे असा हा रोजच लागणारा टोमॅटो अगदी आपल्या दारातच लावला तर...  असा विचार तुमच्या मनात आला असेल तर लगेच या काही टिप्स पाहा आणि टोमॅटोचं रोप कुंडीत लावून टाका (Gardening tips for tomato). यासाठी मोठी जागाच पाहिजे असं काही नाही (how to grow tomato in pots). बाल्कनीत ठेवलेल्या मध्यम आकाराच्या कुंडीतही टोमॅटोचं रोप उत्तम वाढतं...(5 important tips to grow tomato plant in terrace garden)

 

कुंडीत कशा पद्धतीने लावायचं टोमॅटोचं रोप?

१. टोमॅटोचं रोप लावण्यासाठी अगदी लहान आकाराची कुंडी घेऊन उपयोग नाही. त्यामुळे त्यासाठी १० ते १२ इंच खोल आणि तेवढीच पसरट असणारी कुंडी निवडा. अशा मापाची कुंडी टोमॅटो लावण्यासाठी अगदी उत्तम ठरेल.

हृदयाचं आरोग्य उत्तम ठेवायचं तर वाचा रामदेव बाबांचा सल्ला, हार्ट ॲटॅकचा धोकाही कमी होईल

२. टोमॅटोच्या रोपाला पाणी खूप घट्ट धरून ठेवणारी माती नको असते. त्यामुळे त्यासाठी खत, माती आणि रेती हे तिन्ही सम प्रमाणात घ्या आणि व्यवस्थित कालवून एकत्र करून कुंडीत भरा. 

पॅकेटबंद ज्यूस खरंच ‘नॅचरल’ असते का? पोटाचा सुटलेला आकार-किडनीचे आजार लागतील मागे

३. कुंडी आणि माती या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे तयार असतील तर तुमच्या शहरातल्या नर्सरीतून टोमॅटोचं रोप आणा आणि ते कुंडीत लावून टाका. टोमॅटोच्या बियाही बाजारात मिळतात. पण बिया वापरून टोमॅटोचं रोप तयार करण्यासाठी खूप संयम ठेवावा लागेल.

 

४. टोमॅटोच्या रोपाला योग्य ऊन मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे ती कुंडी अशा ठिकाणी ठेवा जिथे ६ ते ८ तास चांगले ऊन येईल. रोप चांगलं वाढलं की मध्यभागी एक काठी रोवून त्या रोपाला आधार द्या.

डोसे करण्यासाठी डाळ- तांदूळ भिजवताना लक्षात ठेवा ५ टिप्स, डोसा होईल परफेक्ट जाळीदार

५. कांदा आणि लसूण यांची टरफलं १० ते १२ तास पाण्यात भिजत घालावी. त्यानंतर हे पाणी गाळून घ्यावं आणि टोमॅटोच्या रोपाला द्यावं. हे पाणी टोमॅटोसाठी उत्तम खत आहे. अशा पद्धतीने रोप लावलं आणि वेळोवेळी त्याला खत दिलं तर काही महिन्यांतच तुमच्याकडे अगदी एका वेळी किलोकिलोने टोमॅटो येतील. 
 

Web Title: Gardening tips for tomato, how to grow tomato in pots, 5 important tips to grow tomato plant in terrace garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.