मनी प्लांट हा अशा वेलींपैकी आहे जो लहानशा कुंडीतही चांगला वाढतो आणि मोठ्या कुंडीतही वाढतो. शिवाय काही काही ठिकाणी तर तो मातीचा वापर न करता नुसत्या पाण्यातही लावला जातो. एखादी चांगली काचेची बाटली असेल तर तिच्यात पाणी भरून त्यात मनी प्लांटची एखादी काडी ठेवली तरी हळूहळू ती चांगली वाढत जाते. पण काही घरांमध्ये मात्र चांगला मातीत लावूनही मनी प्लांट वाढत नाही. शिवाय आता उन्हाळ्याच्या दिवसांत तर त्याची पानंही कमी होऊन जातात (Gardening Tips For Money Plant). असं होऊ नये आणि ऐन उन्हाळ्यातही मनी प्लांट छान हिरवागार, टवटवीत राहावा यासाठी पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा.(home hacks for the fast growth of money plant)
मनी प्लांटची वाढ चांगली होण्यासाठी टिप्स
१. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मनी प्लांट ज्या कुंडीमध्ये लावला आहे त्या कुंडीतली माती कडक होऊ देऊ नका. मातीचा वरचा थर कडक झाला तर पाणी, ऑक्सिजन किंवा रोपांना दिलं जाणारं इतर कोणतंही खत मुळापर्यंत जात नाही आणि त्यामुळे मग रोपांची वाढ होत नाही. त्यामुळे कुंडीतली माती महिन्यातून एकदा हलकीशी उकरून मोकळी करत जा.
बडिशेपमधले खडे निवडणं अवघड जातं? २ सोपे उपाय, मेहनत न करता बडिशेप होईल स्वच्छ
२. मनी प्लांटची पानं नेहमीच छान हिरवीगार राहण्यासाठी महिन्यातून एकदा १ ग्लास पाण्यामध्ये १० मिली दूध घाला आणि ते मनी प्लांटला द्या. पानं चमकदार, मोठी होतील.
३. कांद्याची टरफलं आणि बटाट्याची सालं एका भांड्यात एकत्र करा. त्यात पाणी घालून ते २४ तास भिजत ठेवा. त्यानंतर ते गाळून घ्या.. त्यात त्याच्या दुप्पट साधं पाणी घाला आणि हे पाणी मनी प्लांटला द्या.
चेहऱ्याला लावा चमचाभर साबुदाणा, त्वचा होईल टाईट आणि सुरकुत्या गायब
कांदा- बटाट्यातून मिळणाऱ्या सल्फर, पोटॅशियममुळे मनी प्लांटची वाढ चांगली होते.
४. १ लीटर पाण्यात ५० ग्रॅम गूळ घाला आणि हे पाणी मनी प्लांटला द्या. कुंडीतली माती कसदार होते आणि मनी प्लांट चांगला वाढतो.
Web Summary : Grow a vibrant money plant even in summer with these tips. Maintain soil moisture, use diluted milk monthly, and fertilize with onion-potato water or jaggery solution for enhanced growth.
Web Summary : इन उपायों से गर्मी में भी मनी प्लांट को जीवंत रखें। मिट्टी की नमी बनाए रखें, महीने में एक बार पतला दूध डालें, और बेहतर विकास के लिए प्याज-आलू का पानी या गुड़ का घोल खाद के रूप में डालें।