आपल्या बागेत किंवा छोट्याशा बाल्कनीमध्ये हौशीने लावलेल्या रोपांची व्यवस्थित काळजी घ्यावीच लागते. महिन्यातून एकदा तरी त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावंच लागतं. त्यात जर आपण कमी पडलो आणि नुसतंच त्यांना रोज पाणी देत बसलो, तर रोपांची म्हणावी तशी वाढ होत नाही. त्यांना भरपूर फुलंही येत नाहीत. कधी कधी तर आपल्या दुर्लक्षामुळे रोपांवर रोग पडतो आणि त्यात ते रोप जळूनही जातं. गुलाबाच्या रोपाच्या बाबतीतही अनेकांना हाच अनुभव येतो. म्हणूनच गुलाबाचं रोप जळून जाऊ नये म्हणून त्यावर रोग पडलेला दिसताच थोडी अधिक काळजी घ्या आणि पुढे सांगितलेले काही उपाय लगेचच करा (Gardening Tips For Rose Plant). बघा काही दिवसांतच पुन्हा तुमचा गुलाब जोमाने बहरून आलेला दिसेल..(how to remove ants, white bugs, powdery mildew on rose plant?)
गुलाबाच्या रोपावर रोग, किड पडल्यास काय काळजी घ्यावी?
१. सगळ्यात आधी तर रोपाची व्यवस्थित पाहणी करा. ज्या पानांना छिद्रं पडलेली असतील किंवा राेपाच्या ज्या भागावर रोग पडल्यासारखा दिसत असेल तो भाग लगेचच कापून टाका. गुलाबाची छटाई केल्यास किड निघून जाते आणि आजुबाजुला पसरून रोपांचं जास्त नुकसान होत नाही. यानंतर रोपावर पाणी मारा आणि संपूर्ण रोप स्वच्छ धुवून घ्या.
लग्नात घालायला मोत्याचा साज! तन्मणी, चिंचपेटीचे सुंदर प्रकार, पारंपरिक दागिन्यांमध्ये करा थाट...
२. आपल्याला माहितीच आहे की हळदीमध्ये ॲण्टीबॅक्टेरियल आणि ॲण्टीफंगल गुणधर्म असतात. त्यामुळे हळदीचं पाणी करा आणि ते पाणी संपूर्ण रोपावर शिंपडा तसेच थोडं पाणी मातीतही घाला.
३. नीम ऑईल देखील रोपांवर पडलेला रोग घालविण्यासाठी खूप उपयुक्त ठरते. नीम ऑईल एक स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि ते रोपावर शिंपडून घ्या. रोग निघून जाईल. दोन ते तीन दिवसांतून एकदा हा उपाय कराच.
ताकातला पालक म्हणजे अस्सल पारंपरिक चव, करा ताकातली पालकाची भाजी-नेहमीपेक्षा जास्त खमंग आणि पौष्टिक
४. मुंग्या मारण्यासाठी असणारा खडूही गुलाबावरची किड घालविण्यासाठी उपयुक्त ठरतो. तो खडू पाण्यात विरघळून घ्या. त्यानंतर हे पाणी रोपावर शिंपडा. तसेच खडूची थोडी पावडर करून ती कुंडीमधल्या मातीमध्ये मिसळा. गुलाबावरची किड, मुंग्या निघून जाण्यास मदत होईल.
