lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Gardening > मधुमालतीची काळजी घेताना लक्षात ठेवा ३ गोष्टी- उन्हाळ्यात फुलांनी बहरून जाईल वेल

मधुमालतीची काळजी घेताना लक्षात ठेवा ३ गोष्टी- उन्हाळ्यात फुलांनी बहरून जाईल वेल

How to Take Care Of Madhumalati Plant: मधुमालतीला बहर येण्याचा काळ म्हणजे उन्हाळा. म्हणूनच तुमच्या घरच्या मधुमालतीची आतापासूनच काळजी घ्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2024 11:43 AM2024-02-24T11:43:16+5:302024-02-24T11:44:30+5:30

How to Take Care Of Madhumalati Plant: मधुमालतीला बहर येण्याचा काळ म्हणजे उन्हाळा. म्हणूनच तुमच्या घरच्या मधुमालतीची आतापासूनच काळजी घ्या...

Gardening Tips for Madhumalti, How to take care of madhumalati plant, 3 important tips for getting more flower from madhumalati plant? | मधुमालतीची काळजी घेताना लक्षात ठेवा ३ गोष्टी- उन्हाळ्यात फुलांनी बहरून जाईल वेल

मधुमालतीची काळजी घेताना लक्षात ठेवा ३ गोष्टी- उन्हाळ्यात फुलांनी बहरून जाईल वेल

Highlightsमधुमालतीच्या झाडाला किमान ५ ते ६ तास चांगले ऊन मिळाले पाहिजे. तरच त्या वेलीची वाढ भरभरून होईल.

उन्हाळा हा सुगंधी फुलांचा बहरण्याचा काळ असतो. मधुमालतीचा वेल देखील तसाच. एरवी वर्षभर मधुमालतीला थोडी- थोडी फुलं येतच असतात. पण भरपूर फुलं येण्याचा तिचा खरा हंगाम म्हणजे उन्हाळा. उन्हाळ्याच्या दिवसांत मधुमालतीचा वेल कसा पांढऱ्या, गुलाबी रंगांनी फुलून जातो. शिवाय तिचा सुगंधही काही औरच असतो (How to take care of madhumalati plant). उन्हाळ्यात तुमच्या घरच्या मधुमालतीला असा भरभरून बहर आणायचा असेल तर आतापासूनच तिची विशेष काळजी घ्या. (3 important tips for getting more flower from madhumalati plant?)

मधुमालतीला भरपूर बहर येण्यासाठी काय उपाय करावा?

 

१. खत कधी द्यावे

एप्रिल- मे महिन्यात जेव्हा कडक ऊन पडतं, तेव्हा मधुमालती भरभरून फुलते. त्यामुळे आता तिच्या सिझनला सुरुवात होण्यासाठी एक ते दिड महिन्याचा कालावधी राहिला आहे.

फुलकोबी चिरल्यानंतर किती वेळाने शिजवावी? आहारतज्ज्ञ म्हणतात, फ्लॉवर चिरुन लगेच फोडणीला घातली तर...

त्यामुळे येत्या सिझनला ती भरपूर बहरण्यासाठी तिला आतापासूनच खत द्यायला सुरुवात करा. पंधरा ते वीस दिवसांचा गॅप देऊन तिला एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत दोनदा खत दिले गेले तर अधिक चांगले. नायट्रोजन आणि पोटॅशियम या दोन खतांची मधुमालतीला गरज असते. 

 

२. कोणते खत द्यावे

चहा झाल्यानंतर उकळलेल्या चहा पावडरचं पाणी आणि केळ्यांची सालं रात्रभर भिजत घातलेलं पाणी या दोन्ही गोष्टी मधुमालतीसाठी उत्तम खत ठरू शकतात. तसेच थोडे गांडूळ खतदेखील द्यावे. मधुमालतीच्या झाडाला पाण्याचा उत्तम निचरा होणारी माती लागत असते. त्यामुळे कुंडीतल्या वरच्या भागातली माती उकरून त्यात थोडी वाळू, खत टाकून ती भुसभुशीत करून घ्या.

कशाला हवा विकतचा लिप बाम? गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरीच करा नॅचरल लिप कलर- स्वस्तात मस्त

३. योग्य ऊन

मधुमालतीच्या झाडाला किमान ५ ते ६ तास चांगले ऊन मिळाले पाहिजे. तरच त्या वेलीची वाढ भरभरून होईल. त्यामुळे वेल कुंडीत लावलेली असेल तर तिला चांगले ऊन मिळतेय की नाही, याची एकदा काळजी घ्या.  

 

 

Web Title: Gardening Tips for Madhumalti, How to take care of madhumalati plant, 3 important tips for getting more flower from madhumalati plant?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.