Join us

भरपूर लिंबू येण्यासाठी रोपाला घाला 'हे' खत, काही दिवसांतच टोपली भरभरून लिंबू येतील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2025 15:06 IST

Gardening Tips For Lemon Plant: लिंबाचं रोप तर लावलं आहे, पण त्याला लिंबू येतच नाहीत, असंच तुमचंही झालं असेल तर हे खत काही दिवस घालून पाहा..(how to get maximum lemon from plant?)

ठळक मुद्देरोपाला भरभरून लिंबू येण्यासाठी त्याला पोटॅशियमची खूप गरज असते.

लिंबू बऱ्याचदा स्वयंपाकात वापरलं जातं. काही पदार्थ असे असतात की ज्यामध्ये लिंबाशिवाय मजा येतच नाही. त्यामुळे कुंडीत का असेना पण एखादं लिंबाचं रोप लावावं, असा अनेकांचा प्रयत्न असतोच. शिवाय आता उन्हाळाही जवळ येत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत तर लिंबू सरबत, लिंबू शिकंजी यांना खूप मागणी असते. त्यामुळे आतापासूनच तुमच्या लिंबाच्या रोपाची थोडी काळजी घ्या, जेणेकरून उन्हाळ्यात तुम्हाला भरभरून लिंबू मिळतील (how to get maximum lemon from plant?). त्यासाठी लिंबाच्या रोपाची कशी काळजी घ्यावी (tips and tricks to grow lots of lemons on plant) आणि त्याला कोणतं खत द्यावं हे आता पाहूया..(best fertilizer for lemon plant)

 

लिंबाच्या रोपाची कशी काळजी घ्यावी?

१. लिंबाचं रोप कधीही खूप लहान आकाराच्या कुंडीमध्ये लावू नका. कारण त्याला वाढायला जेवढी जास्त जागा मिळते तेवढी जास्त फळं त्याला येतात. त्यामुळे लिंबाचं रोप लावण्यासाठी नेहमी १८ इंच किंवा त्यापेक्षा मोठा आकार असणारी कुंडी घ्या.

लग्नात मराठमोळा लूक करण्यासाठी कानात ठसठशीत बुगडी हवीच! बुगड्यांचे एक से एक देखणे डिझाईन्स

२. लिंबाचं रोप नेहमी अशाच जागी लावावं जिथे त्याला भरपूर सुर्यप्रकाश मिळेल. सुर्यप्रकाश योग्य प्रमाणात मिळाला नाही तर त्या रोपाची वाढही होत नाही आणि त्याला फळंही येत नाहीत.

३. लिंबाच्या रोपाला खूप जास्त पाणी घालू नका. माती ओलसर राहण्याएवढं पाणी त्याच्यासाठी पुरेसं आहे.

४. लिंबाचं रोप ज्या मातीमध्ये लावलं आहे ती माती भुसभुशीत असणं गरजेचं आहे. 

 

लिंबाच्या रोपाला कोणतं खत घालावं?

१. रोपाला भरभरून लिंबू येण्यासाठी त्याला पोटॅशियमची खूप गरज असते. तुमच्या शहरातल्या नर्सरीमध्ये पोटॅश खत मिळत असेल तर ते खत लिंबासाठी योग्य आहे. हे खत कुंडीतल्या मातीत पसरवून टाका आणि नंतर त्यावरून थोडं शेणखताचं पाणी द्या. दिड- दोन महिन्यातून एकदा हा उपाय करा.

रात्री झोपण्यापुर्वी प्या 'हा' वेटलॉस टी- १५ दिवसांत पोटावरची चरबी कमी होऊन दिसाल शिडशिडीत

२. केळीच्या सालींमध्येही भरपूर प्रमाणात पोटॅशियम असतं. केळीच्या सालीचे अगदी बारीक तुकडे करा आणि ते कुंडीतल्या मातीत घुसवून ठेवा. किंवा केळीची सालं पाण्यात ८ ते १० तास भिजत ठेवा आणि त्यानंतर ते पाणी गाळून घेऊन लिंबाच्या रोपाला द्या. १५ दिवसांतून एकदा हा उपाय करू शकता. 

 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सफळेपाणीखते