Lokmat Sakhi >Gardening > उन्हामुळे रोपं सुकून पानं जळू लागली? ५ गोष्टी तातडीने करा- रोप पुन्हा हिरवेगार होईल

उन्हामुळे रोपं सुकून पानं जळू लागली? ५ गोष्टी तातडीने करा- रोप पुन्हा हिरवेगार होईल

Gardening Tips For Dry And Burn Leaves Of Plants: उन्हाळ्यात बऱ्याच जणांना रोपांच्या बाबतीत ही समस्या जाणवते. त्यासाठीच या काही टिप्स पाहा...(5 tips for plant care in summer)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2025 16:09 IST2025-04-24T16:08:41+5:302025-04-24T16:09:37+5:30

Gardening Tips For Dry And Burn Leaves Of Plants: उन्हाळ्यात बऱ्याच जणांना रोपांच्या बाबतीत ही समस्या जाणवते. त्यासाठीच या काही टिप्स पाहा...(5 tips for plant care in summer)

5 tips for plant care in summer, why does leaves of plants getting dry and burn | उन्हामुळे रोपं सुकून पानं जळू लागली? ५ गोष्टी तातडीने करा- रोप पुन्हा हिरवेगार होईल

उन्हामुळे रोपं सुकून पानं जळू लागली? ५ गोष्टी तातडीने करा- रोप पुन्हा हिरवेगार होईल

Highlightsअसं तुमच्याही रोपांच्या बाबतीत होत असेल तर तातडीने या काही गोष्टी करून घ्या...

उन्हाचा पारा सध्या सगळीकडेच खूप वाढला आहे. सुर्यदेव अक्षरश: आग ओकत आहे. अशा गरम वातावरणात दुपारच्या वेळी तर घराबाहेर डोकावून पाहायलाही नकोसे वाटते. घरात राहूनही उष्णतेमुळे दिवसभर तगमग होत असते. अशीच तगमग आपल्या बागेतल्या किंवा बाल्कनीमधल्या रोपांचीही सध्या होत आहे. उन्हाचा कडाका त्यांनाही सहन होईनासा झाला आहे (5 tips for plant care in summer). त्यामुळेच तर दररोज न चुकता पाणी घालूनही काही रोपं सुकत आहेत तर काही रोपांची पानं जळून गेल्यासारखी दिसत आहेत (Gardening Tips For Dry And Burn Leaves Of Plants). असं तुमच्याही रोपांच्या बाबतीत होत असेल तर तातडीने या काही गोष्टी करून घ्या...(why does leaves of plants getting dry and burn?)

 

रोपांची पाने जळत असतील तर काय उपाय करावे?

१. रोपांची पाने जळू लागली असतील तर उन्हाळ्याच्या दिवसांत रोपांना पाणी देण्याची वेळ थोडी बदलून पाहा. रोपांना सकाळी शक्य तेवढ्या लवकर पाणी द्या. कारण त्यानंतर वातावरणातली उष्णता खूप वाढते. 

ॲल्युमिनियम कढई, डबे कळकट झाले? फक्त २ गोष्टी वापरून धुवा- आरशासारखे चकचकीत होतील...

२. रोपांच्या मुळांपर्यंत पाणी पुरेशा प्रमाणात जात नसेल तरीही रोपं जळू शकतात. त्यामुळे कुंडीतली माती थोडी उकरून घ्या. ७ ते ८ तास सुर्यप्रकाशात ती कुंडी तशीच ठेवा आणि नंतर रोपाला पाणी द्या. यामुळे मुळापर्यंत ऑक्सिजन जातो.

३. पानं जळू लागली असतील तर याचा एक अर्थ असाही होतो की तुमच्या रोपाला कडक ऊन सोसवत नाहीये. त्यामुळे काही दिवस रोपाची जागा बदलून पाहा. त्याला थोडं कमी ऊन येईल अशा ठिकाणी हलवून पाहा.

 

रोपांना सावलीमध्ये हलवणं शक्य नसेल तर रोपांवर एक हिरवा पडदा लावून घ्या. जेणेकरून सुर्यप्रकाश थेट त्यांच्यापर्यंत येणार नाही आणि त्यांना उन्हाचा त्रास होणार नाही.

सुटीत मुलं सतत मोबाईल, टीव्ही पाहात बसतात? सोप्या ट्रिक्स- चांगली करमणूक होऊन स्क्रिन सुटेल...

४. रोपांची पानं जळू लागली आहेत म्हणून त्याला लगेच खत देऊ नका. अशा वेळी खत दिल्याने बऱ्याचदा रोपाचं जास्त नुकसान होऊ शकतं.

५. कडक उन्हाळ्याच्या दिवसांत रोपांची कटिंग करणंही टाळलं पाहिजे. कारण ते ज्या ठिकाणी कापले जातात तो भाग नाजुक होतो आणि त्याला उन्हाळा सहन न झाल्याने तो जळू शकतो.  

 

Web Title: 5 tips for plant care in summer, why does leaves of plants getting dry and burn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.