Lokmat Sakhi >Gardening > तुळशीचे रोप लावताच, काही दिवसांत कोमेजून जाते? रोज करताय ५ चुका - 'अशी' घ्या रोपाची काळजी...

तुळशीचे रोप लावताच, काही दिवसांत कोमेजून जाते? रोज करताय ५ चुका - 'अशी' घ्या रोपाची काळजी...

5 mistakes that can kill Tulsi plant : how to get new growth of holy basil : mistakes that kill Tulsi plant : Tulsi plant care mistakes : common Tulsi plant problems : reasons Tulsi plant not surviving : Tulsi plant drying reasons : गार्डनिंग एक्सपर्ट सांगतात तुळशीच्या रोपाची नेमकी काळजी कशी घ्यावी याची ट्रिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2025 12:05 IST2025-08-29T12:00:00+5:302025-08-29T12:05:01+5:30

5 mistakes that can kill Tulsi plant : how to get new growth of holy basil : mistakes that kill Tulsi plant : Tulsi plant care mistakes : common Tulsi plant problems : reasons Tulsi plant not surviving : Tulsi plant drying reasons : गार्डनिंग एक्सपर्ट सांगतात तुळशीच्या रोपाची नेमकी काळजी कशी घ्यावी याची ट्रिक...

5 mistakes that can kill Tulsi plant how to get new growth of holy basil mistakes that kill Tulsi plant Tulsi plant care mistakes common Tulsi plant problems reasons Tulsi plant not surviving Tulsi plant drying reasons | तुळशीचे रोप लावताच, काही दिवसांत कोमेजून जाते? रोज करताय ५ चुका - 'अशी' घ्या रोपाची काळजी...

तुळशीचे रोप लावताच, काही दिवसांत कोमेजून जाते? रोज करताय ५ चुका - 'अशी' घ्या रोपाची काळजी...

भारतीय परंपरेत आणि आयुर्वेदात तुळशीच्या पवित्र रोपाला फार मोठे स्थान आहे. आपल्या सगळ्यांच्याच घरात तुळशीचे एक ना एक छोटंसं रोपटं असतंच. घरात तुळशीचे रोप लावण्याचे अनेक फायदे आहेत. आपल्यापैकी बहुतेकांच्या घरात तुळशीचे रोप असेलच, परंतु तुळशीचे रोप लावल्यानंतर अनेकांना असा अनुभव (5 mistakes that can kill Tulsi plant) येतो की, रोप लावल्यानंतर काहीच दिवसांत कोमेजून जाते. अनेकदा तुळशीच्या रोपाची (how to get new growth of holy basil) वेळोवेळी योग्य काळजी घेऊन देखील तुळस सुकणे किंवा कोमेजून जाणे असा अनुभव अनेकांना येतो. आपण रोज तुळशीला पाणी घालतो, रोपाची पुरेशी काळजी घेतो, तरीही रोप कसे कोमेजून जाते असा प्रश्न अनेकांना पडतो( Tulsi plant drying reasons).

खरंतर, तुळशीची योग्य निगा राखली, तर तुळशीचे रोप वर्षानुवर्षे हिरवेगार राहू शकते. तुळशीच्या रोपाला पाणी देण्याची योग्य वेळ, मातीची निवड, खतांचा वापर आणि पुरेसा सूर्यप्रकाश याकडे थोडंसं लक्ष दिलं, तर तुळस निरोगी आणि तजेलदार राहते. तुळशीची योग्य काळजी कशी घ्यावी, कोणत्या गोष्टी टाळाव्यात (Tulsi plant care mistakes) आणि रोप नेहमी हिरवेगार (reasons Tulsi plant not surviving) ठेवण्यासाठी काय करावे, याबद्दलच्या काही खास टिप्स पाहूयात. काही सोप्या टिप्स फॉलो केल्यास तुळस नेहमी टवटवीत आणि हिरवीगार राहील. गार्डनिंग एक्सपर्ट मयूर मंदराह यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करत तुळशीच्या रोपाची काळजी कशी घ्यावी याच्या ५ टिप्स सांगितल्या आहेत(common Tulsi plant problems).

तुळशीचे रोप कायम टवटवीत आणि हिरवेगार राहावे यासाठी उपाय... 

१. पिंचिंग करणे विसरू नका :- तुळशीच्या रोपाला जेव्हा मंजिरी म्हणजेच बियांचा भाग येतो, तेव्हा तो तोडणे खूप गरजेचे असते. जर आपण असे केले नाही, तर रोप आपली संपूर्ण ऊर्जा बिया बनवण्यासाठी खर्च करते, ज्यामुळे त्याची वाढ थांबते. म्हणून, महिन्यातून एकदा तुळशीच्या रोपाच्या वरच्या फांद्या हलक्याशा तोडा. असे केल्याने रोप अधिक फांद्या वाढवते आणि ते दाट होते. याचबरोबर, वेळोवेळी मंजिरीही काढून टाका.

गणपती बाप्पाला दुर्वा वाहताय की नुसतेच गवत? अस्सल दुर्वा ओळखण्याची भन्नाट ट्रिक - पूजा होईल मंगलमय... 

२. थेट सूर्यप्रकाशात ठेवण्याची चूक :- तुळशीला सूर्यप्रकाशाची गरज असते, पण जास्त वेळ थेट आणि कडक उन्हात ठेवल्यास पाने जळू शकतात. यासाठीच, तुळशीचे रोप हलक्याशा सावलीत ठेवावे. म्हणजेच, रोप अशा ठिकाणी ठेवावं जिथे त्याला सकाळी किंवा संध्याकाळी कोवळे ऊन मिळेल. दुपारच्या कडक उन्हापासून रोपाचे संरक्षण करणे आवश्यक आहे. सकाळचे २ ते ३ तास कोवळे ऊन तुळशीच्या रोपाला पुरेसे असते.

३. रोज पाणी देण्याची चूक :- तुळशीला रोज पाणी देण्याची चूक जवळजवळ आपण प्रत्येकजण करतो. जास्त पाण्यामुळे मुळे कुजतात आणि याच कारणामुळे रोप मरून जाते. तुळशीच्या रोपाला रोज पाणी देण्याऐवजी, जेव्हा माती कोरडी वाटेल तेव्हाच पाणी द्या. साधारणपणे, हिवाळ्यात आठवड्यातून १ ते २ वेळा आणि उन्हाळ्यात २ ते ३ वेळा पाणी देणे पुरेसे असते. नेहमी तेवढेच पाणी द्या जेवढे कुंडीच्या खालून बाहेर पडेल.

सणावारासाठी वाती करण्याच्या भन्नाट ६ ट्रिक्स! किचकट काम होईल फक्त मिनिटभरात - वाती दिसतील सुंदर - सुबक... 

४. तुळशीला खत न देण्याची चूक :- तुळशीला पुरेशा पाण्यासोबतच खत देणे देखील तितकेच आवश्यक असते. रोपाच्या चांगल्या वाढीसाठी त्याला योग्य वेळी योग्य खत देणे खूप महत्त्वाचे असते. महिन्यातून एकदा तुळशीच्या रोपात वर्मीकंपोस्ट (गांडूळ खत) किंवा शेणखत टाका. पानांना हिरवेगार आणि निरोगी ठेवण्यासाठी एप्सम सॉल्टची (Epsom salt) फवारणी करा. यासाठी एक लिटर पाण्यात अर्धा चमचा एप्सम सॉल्ट मिसळून द्रावण तयार करा आणि स्प्रे बॉटलमध्ये भरून पानांवर फवारणी करा.

५. कुंडीतील माती भुसभुशीत नसणे :- आपण ज्या मातीत तुळशीचे रोप लावतो ती माती कायम भुसभुशीत असावी. माती फारच कोरडी किंवा एकदम कडक नसावी. तुळशीच्या रोपाची कुंडीतील माती चहा पावडर प्रमाणेच भुरभुरीत असली पाहिजे. जर माती खूपच कोरडी, रुक्ष असेल तर मातीत गांडूळ खत न विसरता घालावं. यामुळे गांडूळ मातीला खाऊन, माती भुसभुशीत करण्यास मदत करतात.


Web Title: 5 mistakes that can kill Tulsi plant how to get new growth of holy basil mistakes that kill Tulsi plant Tulsi plant care mistakes common Tulsi plant problems reasons Tulsi plant not surviving Tulsi plant drying reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.