सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे घराच्या बाहेर प्रचंड ऊन असते. या उन्हाच्या झळा जशा आपल्याला सहन होत नाहीत, तसंच काही रोपांचंही असतं. त्यांना तीव्र ऊन मुळीच नको असतं. कारण मुळात ही रोपं सावलीत वाढणारी असतात. त्या रोपांपैकीच एक आहे साँग ऑफ इंडिया हे रोपं. लांबुळकी पानं, त्या पानांची पिवळी कडा आणि आत हिरवागार रंग असं त्याचं छानसं रूप पाहताक्षणीच आपल्याला माेहून घेतं. या रोपाला कडक ऊन सहन होत नाही. जिथे त्याच्यावर थेट सुर्यप्रकाश येत नाही, त्याठिकाणी हे रोप छान वाढतं. त्यामुळे अनेकजण मोठ्या हौशीने ते रोप घरातल्या एखाद्या कोपऱ्यात आणून घर सुशोभित करण्यासाठी त्याचा वापर करतात (how to take care of song of India plant?). आता आपण या इनडोअर प्लांटची काळजी कशी घ्यायची आणि त्या रोपाचे नेमके काय फायदे असतात (5 Amazing Benefits Of Song of India Plant), याची माहिती घेऊया..
साँग ऑफ इंडिया या रोपाची काळजी कशी घ्यावी?
१. हे रोप नेहमी भरपूर सुर्यप्रकाश येईल परंतू सावली असेल अशा ठिकाणी ठेवावं.
२. जेव्हा कुंडीतल्या मातीचा वरचा थर कोरडा झालेला जाणवेल, तेव्हाच या रोपाला पाणी घालावं. जास्त पाणी घातल्यास या रोपाची मुळं कुजू शकतात.
काही केलं तरी डोसा तव्याला चिकटून करपतो? करा बर्फाची जादू- डोसे होतील पातळ, कुरकुरीत
३. या रोपासाठी जेव्हा तुम्ही माती भराल तेव्हा कुंडीच्या तळाशी काही दगड किंवा पेबल्स ठेवा. पाण्याचा योग्य निचरा होणारी माती या रोपाला हवी असते. तसेच माती खूप चिकट असू नये. भुसभुशीत माती असल्यास हे रोप चांगले वाढते.
४. नियमितपणे छाटणी करून तुम्ही या रोपाचा आकार तुम्हाला पाहिजे तेवढा मर्यादित ठेवू शकता.
साँग ऑफ इंडिया रोपाचे फायदे
१. हे रोप दिसायला खूप आकर्षक आहे. त्यामुळे साहजिकच तुमच्या घराची, बाल्कनीची शोभा वाढविण्यासाठी ते उपयुक्त ठरते.
२. आपल्या आजुबाजुची हवा शुद्ध ठेवण्यासाठी हे रोप मदत करते.
चीनमध्ये भलताच ट्रेण्ड! लहान मुलं करतात धुणी, भांडी, स्वयंपाक आणि आई- बाबा करतात आराम?
३. हवेतील आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी या रोपाची मदत होते.
४. साँग ऑफ इंडिया हे रोप बेन्झीन, फॉर्मलडिहाईड असे हवेतले दुषित कण शोषून घेते.
५. काही देशांमध्ये हे रोप गुडलक प्लांट म्हणून ओळखले जाते आणि त्याचे बरेचसे औैषधी गुणधर्मही आहेत, असे म्हणतात.