आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांच्याच गार्डन किंवा गॅलरीमध्ये एखाद तरी छोटंसं गुलाबाचं रोप असतंच. या गुलाबाच्या रोपाला छान, सुंदर टवटवीत, भरगच्च फुल (organic fertilizer for rose plants) आली तरच त्या रोपाची शोभा वाढते. याउलट, जर गुलाबाच्या रोपाला फुल कमी आणि पानंचं जास्त असतील किंवा फुलंच येत नसतील तर त्या रोपाचे सौंदर्य कमी होते. आपण सगळेच गुलाबाच्या (home remedies for rose plant flowering) रोपाला मस्त लालचुटुक गुलाबाची फुल येतील म्हणून मोठ्या हौसेने रोप लावतो. गुलाबाचं रोप लावलं की त्यावर सुंदर फुलं यावीत असं प्रत्येकालाच वाटतं. पण अनेकदा फुलं न येता फक्त पानंच जास्त येतात आणि रोप दाट दिसतं. अनेकजणांनी अशी तक्रार असते की, गुलाबाचे रोप लावले की त्याला फुलंच येत नाहीत(3 Magical Fertilizer For Increase Rose Plant Growth & Get More Big Size Flower).
गुलाबाच्या रोपाला फुल न येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. मातीतील पोषक तत्त्वांची कमतरता, अपुरा सूर्यप्रकाश किंवा चुकीच्या पद्धतीने पाणी घालणे यांसारख्या अनेक कारणांमुळे गुलाबाच्या रोपाला फुलंच येत नाहीत. परंतु आपण यासाठी उपाय म्हणून महागडी खतं किंवा केमिकल्सयुक्त फवारणी करण्यापेक्षा काही घरगुती सोपे उपाय करु शकतो. आपल्या स्वयंपाक घरातील नेहमीच्या वापरातील ३ पदार्थ जर कुंडीतील मातीत मिसळले तर, रोपाला पुन्हा एकदा सुंदर आणि मोठ्या कळ्या व फुल (how to increase rose plant flowers naturally) येऊ लागतील. घरच्या घरी उपलब्ध असलेले काही पदार्थ मातीत मिसळले तर गुलाबाच्या रोपाला योग्य पोषण मिळतं आणि फुलांची संख्या देखील वाढते. आपल्या स्वयंपाक घरातील खास ३ पदार्थ गुलाबाच्या रोपाला आवश्यक पोषण देतील आणि त्याची वाढ अधिक चांगली करतील, आणि रोपाला भरगच्च फुल येण्यास देखील मदत होईल.
गुलाबाच्या रोपाला फुलंच येत नाही मग करा हे ३ उपाय...
१. वापरलेली चहा पावडर :- आपल्या स्वयंपाक घरात दररोज चहा तयार केल्यानंतर आपण वापरलेली चहा पावडर चक्क फेकून देतो. परंतु ही वापरलेली चहा पावडरच गुलाबाच्या रोपासाठी एक उत्तम खत (fertilizer) आहे. चहापावडरमध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते, जे गुलाबाच्या रोपाच्या वाढीसाठी आणि फुलांसाठी खूप महत्त्वाचे असते. चहा पावडर कुंडीतील मातीला थोडे आम्लयुक्त बनवते, जे गुलाबाच्या रोपांला फुल येण्यासाठी खूप आवश्यक असते. वापरलेली चहा पावडर चांगल्या प्रकारे धुवून वाळवून घ्या. धुताना चहापावडरमध्ये दूध आणि साखरेचा अंश अजिबात राहणार नाही याची खात्री करा. हे दोन्ही घटक रोपांमध्ये बुरशीचा धोका वाढवू शकतात. चहा पावडर धुवून वाळवल्यानंतर ती थेट रोपांच्या मातीमध्ये मिसळा किंवा पाण्यात मिसळून टाका. प्रत्येक १५ दिवसांनी एकदा याचा वापर करा.
२. हळद :- हळद फक्त जेवणाची चवच वाढवत नाही, तर ती रोपांसाठीही खूप फायदेशीर असते. कारण हळदीमध्ये अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे गुलाबाच्या रोपाला रोगांपासून आणि कीड लागण्यापासून वाचवतात. हळद रोपाला निरोगी ठेवते, ज्यामुळे त्याला फुले येण्यास मदत होते. याचबरोबर, एक लिटर पाण्यात अर्धा चमचा हळद पावडर मिसळा. आता हे पाणी रोपांच्या मुळांमध्ये टाका. सोबतच, आपण थोडी हळद देखील थेट मातीतही मिसळू शकता, पण त्याआधी मातीची मशागत नक्की करा. हळदीचा वापर तुम्ही गुलाबाच्या रोपासाठी महिन्यातून एकदा करू शकता. या उपायामुळे रोप फुलांनी बहरुन जाईल.
३. केळीची सालं :- केळ्याच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम, फॉस्फरस आणि कॅल्शियम असते, जे फुलांचा आकार वाढवण्यास मदत करते. केळ्याच्या सालींचे लहान तुकडे करून त्यांना उन्हात वाळवून मग त्या सुकलेल्या साली मिक्सरमध्ये वाटून त्याची पावडर बनवू शकता. ही पावडर रोपाच्या मातीत मिसळा. आपण थेट सालं देखील रोपाच्या मुळांमध्येही टाकू शकता. याचा वापर महिन्यातून एकदा करा.