Lokmat Sakhi >Food > मूठभर मूग-मूठभर उडीद-हिवाळ्यात खा पौष्टिक कुरकुरीत भजी! थंडीसाठी खास बेत-पाहा रेसिपी...

मूठभर मूग-मूठभर उडीद-हिवाळ्यात खा पौष्टिक कुरकुरीत भजी! थंडीसाठी खास बेत-पाहा रेसिपी...

Yellow Moong & Urad Dal Pakoda : Moong & urad dal mix crispy pakoda : yellow moong and urad dal pakoda recipe : मूग-उडीदाच्या डाळीची खमंग, कुरकुरीत भजी करण्याची रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2024 18:49 IST2024-12-18T18:48:27+5:302024-12-18T18:49:39+5:30

Yellow Moong & Urad Dal Pakoda : Moong & urad dal mix crispy pakoda : yellow moong and urad dal pakoda recipe : मूग-उडीदाच्या डाळीची खमंग, कुरकुरीत भजी करण्याची रेसिपी...

yellow moong and urad dal pakoda recipe Moong & urad dal mix crispy pakoda Yellow Moong & Urad Dal Pakoda | मूठभर मूग-मूठभर उडीद-हिवाळ्यात खा पौष्टिक कुरकुरीत भजी! थंडीसाठी खास बेत-पाहा रेसिपी...

मूठभर मूग-मूठभर उडीद-हिवाळ्यात खा पौष्टिक कुरकुरीत भजी! थंडीसाठी खास बेत-पाहा रेसिपी...

थंडीच्या दिवसांत आपल्याला वारंवार भूक लागते. वातावरणातील गारठ्याने अशा भुकेच्या वेळी काहीतरी चटपटीत आणि गरमागरम खावेसे वाटते. थंडीच्या दिवसांत वाफाळता चहा आणि त्यासोबत गरमागरम कुरकुरीत भजी (Yellow Moong & Urad Dal Pakoda) असा बेत किमान एकदा तरी होतोच. आपण भजीचे वेगवेगळे प्रकार अगदी (Moong & urad dal mix crispy pakoda) आवडीने खातो. यातही मूग आणि उडीद डाळीची भजी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीची. मुगाच्या डाळीचे वडे, डोसा, खिचडी असे अनेक पदार्थ घरामध्ये खाल्ले जातात, परंतु यात मूग आणि उडीद डाळीची भजी म्हणजे तोंडाला पाणी आणणारा खास पदार्थ(yellow moong and urad dal pakoda recipe).

थंडीच्या दिवसांत वातावरणातील गारठा वाढत गेला की मग गरमागरम भजी करण्याची फर्माइश आपोआपच येते. अशा परिस्थितीत, दरवेळी बेसनाची भजी करण्यापेक्षा चवीत थोडा बदल आणि पोटाला आराम म्हणून मूग - उडीदाच्या डाळीची भजी करून पाहा. ज्यांना बेसन पचत नाही, त्यांच्यासाठी मूग - उडीदाच्या डाळीची भजी हा एक मस्त पर्याय आहे. याशिवाय या डाळींमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन्सही असतात. त्यामुळे यंदाच्या गुलाबी थंडीत मूग - उडीदाच्या डाळीची खमंग, कुरकुरीत भजी नक्की ट्राय करूनच पाहा. मूग - उडीदाच्या डाळीची भजी करण्याची रेसिपी पाहूयात.

साहित्य :- 

१. पिवळी मूग डाळ - १ कप (भिजवून घेतलेली)
२. पांढरी उडीद डाळ - १ कप (भिजवून घेतलेली)
३. हिरव्या मिरच्या - ४ ते ५ मिरच्या 
४. आलं - छोटा तुकडा 
५. लसूण - ४ ते ६ पाकळ्या 
६. जिरे - १ टेबलस्पून 
७. कोथिंबीर - १/२ कप  
८. मीठ - चवीनुसार  

पातळ आवरणाची भरपूर पदर सुटलेली खुसखुशीत मटार करंजी, हिवाळ्यात करायलाच हवा असा चमचमीत बेत...


थंडीच्या दिवसांत चहा करताना वापरा ८ सिक्रेट पदार्थ, चहाचा स्वाद वाढेल-आरोग्यासही फायदेशीर...

कृती :- 

१. सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली पांढरी उडीद डाळ घेऊन त्याची व्यवस्थित पातळ पेस्ट होईल अशी बारीक वाटून घ्यावी. 
२. त्यानंतर पिवळी मूग डाळ मिक्सरमध्ये वाटून घ्यावी. 
३. आता एका मोठ्या बाऊलमध्ये वाटून घेतलेली पांढरी उडीद डाळ व पिवळी मूग डाळ या दोन्हींची पेस्ट एकत्रित करून घ्यावी. 
४. मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या, आल्याचा छोटा तुकडा, लसूण पाकळ्या, जिरे घेऊन ते वाटून त्याची जाडसर भरड करून घ्यावी.

वयाच्या ६६ व्या वर्षीही राहाच्या आजीचा फिटनेस एकदम भारी, ग्लोइंग स्किन- तब्येतीसाठी खातात 'खास' पदार्थ...

 
५. आता डाळींच्या पेस्ट एकत्रित केलेल्या बाऊलमध्ये हिरव्या मिरचीची पेस्ट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाजीचे बॅटर तयार करून घ्यावे. 
६. सगळ्यात शेवटी या तयार बॅटरमध्ये चवीनुसार मीठ घालावे. आता चमच्याने बॅटर व्यवस्थित हलवून एकजीव करून घ्यावे. 
७. एका कढईत तेल गरम करून त्यात या बॅटरचे लहान गोल आकाराचे गोळे सोडून खरपूस भज्या तळून घ्याव्यात. 

मूग-उडीद डाळीची गरमागरम भजी खाण्यासाठी तयार आहे. सॉस, हिरवी चटणी किंवा खजुराच्या चटणी सोबत ही भजी खाण्यासाठी अधिकच टेस्टी लागते.

 

Web Title: yellow moong and urad dal pakoda recipe Moong & urad dal mix crispy pakoda Yellow Moong & Urad Dal Pakoda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.