आपल्यापैकी बहुतेक जण दिवसाची सुरुवात गरमागरम चहाने करतात. कधीकधी कामाच्या गडबडीत चहा प्यायचा राहून जातो. तेव्हा थोड्या वेळाने आपण तो गरम करून पिऊ असा विचार करतो. पण तुम्हाला माहिती आहे का की ही सवय तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकते. शरीरासाठी हे अत्यंत घातक आहे.
दुधाची चहा जास्त वेळ ठेवणं धोकादायक आहे. उन्हाळ्यात चहा २ ते ३ तासांत खराब होऊ लागतो. खोलीच्या तापमानात बॅक्टेरिया वेगाने वाढतात आणि चहाचे पोषक घटक कमी होऊ लागतात. जर तुम्हाला वाटत असेल की पुन्हा गरम केल्यावर चांगला लागेल, तर तसं अजिबात नाही. वारंवार गरम केल्याने चहामधील टॅनिन एसिडिक बनू शकतं, ज्यामुळे एसिडिटी, गॅस आणि पचन समस्या वाढू शकतात.
ब्लॅक टी आणि ग्रीन टी किती वेळ टिकते?
ब्लॅक टी आणि ग्रीन टी थोडा जास्त काळ टिकू शकते. फ्रिजमध्ये ठेवल्यास, ते ६-८ तास चांगली राहते, परंतु लक्षात ठेवा की तुम्ही ते जितके जास्त काळ ठेवाल तितकी त्याची चव आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म कमी होतात.
खराब झालेला चहा कसा ओळखायचा?
- आंबट किंवा कडू चव
- चहामध्ये विचित्र वास किंवा थर तयार होणे.
- रंग बदलणे किंवा फेस येणे.
- पिताना घसा खवखवणे किंवा जळजळ होणे.
चहामुळे होणार नुकसान
पचनसंस्थेवर परिणाम
एसिडिटी, गॅस, बद्धकोष्ठता आणि फूड पॉइझनिंग देखील होऊ शकतं.
पोषण कमी होणं
अँटिऑक्सिडंट्स नष्ट होतात आणि पोषक तत्वे नष्ट होतात.
आतड्याच्या आरोग्यावर परिणाम
पुन्हा गरम केलेला चहा आतड्यांतील बॅक्टेरिया कमकुवत करू शकतो.
हे ठेवा लक्षात
- ताजा चहा बनवा आणि तो लगेच प्या.
- जर चहा शिल्लक राहिला असेल तर तो १-२ तासांच्या आत संपवा.
- वारंवार गरम करणं टाळा.
- गरज पडल्यास फ्रिजमध्ये ठेवा, परंतु ६-८ तासांपेक्षा जास्त काळ ठेवू नका.