Drink Water After Eating Fruits: फळं खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं, हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण बरेच लोक फळं खाण्याची योग्य पद्धत न जाणल्याने त्यातील पोषक घटकांचा शरीराला पूर्ण फायदा मिळत नाही. जसं जेवणानंतर लगेच पाणी प्यायचं नसतं, तसंच काही फळं खाल्ल्यानंतरही पाणी प्यायचं नसतं. कारण याने पचनासंबंधी काही गंभीर समस्या उद्भवू शकतात.
काय होतात समस्या?
फळांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटामिन्स, मिनरल्स आणि आयर्न असतात. पण फळं खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास पोटातील pH लेव्हल बिघडते, ज्यामुळे खालील त्रास होऊ शकतो:
अॅसिडिटी किंवा अॅसिड रिफ्लक्स
अपचन
पोटदुखी
उलटी किंवा मळमळ
फळांतील फ्रुक्टोज आणि नैसर्गिक साखर पचनासाठी चांगली असते, पण ती पचन प्रक्रियेत अडथळा आणते जेव्हा लगेच पाणी प्यायले जाते.
कधी प्यावं पाणी?
फळं खाल्ल्याच्या अर्धा तास आधी किंवा अर्ध्या तासानंतर पाणी प्यावे. ज्याप्रमाणे जेवण केल्यावर लगेच पाणी प्यायल्याने पचन तंत्र बिघडतं. तसंच फळं खाल्ल्यानंतर पोटासंबंधी समस्या होऊ शकतात. सोबतच अॅसिड बर्न, अॅसिड रिफ्लक्ससारख्या समस्या होऊ शकतात.
कोणत्या फळांवर पिऊ नये पाणी?
पेरू - बरेच लोक पेरू खाल्ल्यानंतर पाणी पितात. पण पेरू खाल्ल्यावर लगेच पाणी प्यायलात तर असं केल्याने तुमची पचन बिघडू शकतं. त्यामुळे पेरू खाल्ल्यावर अजिबात पाणी पिऊ नका
केळी - केळी खाल्ल्यावर सुद्धा पाणी प्याल तर हे नुकसानकारक ठरतं. याने पचनसंबंधी समस्या तर होतेच, सोबतच याने सर्दी-खोकला होण्याचीही शक्यता जास्त असते.
पेर - पेर खाल्ल्यावर लगेच पाणी पिणं टाळलं पाहिजे. याचं कारण याने तुम्हाला सर्दी-खोकला होऊ शकतो. त्यामुळे पेर खाल्ल्यावर लगेच पाणी न पिता थोड्या वेळाने प्यावं.
सफरचंद - इतर फळांसारखंच सफरचंद खाल्ल्यावरही पाणी पिणं टाळलं पाहिजे. सफरचंदाने आरोग्याला अनेक फायदे होतात. पण हे खाल्ल्यावर लगेच पाणी प्याल तर त्यातील आवश्यक तत्व शरीराला योग्यपणे मिळू शकत नाहीत.
डाळिंब - डाळिंबामध्येही अनेक पोषक तत्व असतात. यात आयरन इतरही अनेक महत्वाचं तत्व असतात ज्याने शरीराला खूप फायदे मिळतात. पण डाळिंब खाल्ल्यावर लगेच पाणी प्याल तर हे नुकसानकारक ठरू शकतं. याने शरीराला पोषक तत्व मिळत नाहीत.
Web Summary : Drinking water immediately after eating fruits can disrupt digestion, causing acidity, indigestion, and stomach pain. Avoid water for 30 minutes before and after consuming fruits like guava, banana, pear, apple, and pomegranate to prevent health issues.
Web Summary : फल खाने के तुरंत बाद पानी पीने से पाचन क्रिया बिगड़ सकती है, जिससे एसिडिटी, अपच और पेट दर्द हो सकता है। अमरूद, केला, नाशपाती, सेब और अनार जैसे फल खाने से 30 मिनट पहले और बाद तक पानी पीने से बचें।