Lokmat Sakhi >Food > शिट्टी होताच कुकरमधलं पाणी फसफसून बाहेर येतं? १ वाटी घेऊन करा 'हा' भन्नाट उपाय... 

शिट्टी होताच कुकरमधलं पाणी फसफसून बाहेर येतं? १ वाटी घेऊन करा 'हा' भन्नाट उपाय... 

Why Is Water Coming Out Of My Pressure Cooker?: शिट्टी होताच कुकरमधलं पाणी बाहेर येऊन सगळं कुकर खराब होत असेल तर हा एक सोपा उपाय लगेचच करून पाहा..(how to stop water coming out from pressure cooker whistle?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2025 15:22 IST2025-04-07T15:21:46+5:302025-04-07T15:22:48+5:30

Why Is Water Coming Out Of My Pressure Cooker?: शिट्टी होताच कुकरमधलं पाणी बाहेर येऊन सगळं कुकर खराब होत असेल तर हा एक सोपा उपाय लगेचच करून पाहा..(how to stop water coming out from pressure cooker whistle?)

Why Is Water Coming Out Of My Pressure Cooker?, how to stop water coming out from pressure cooker whistle | शिट्टी होताच कुकरमधलं पाणी फसफसून बाहेर येतं? १ वाटी घेऊन करा 'हा' भन्नाट उपाय... 

शिट्टी होताच कुकरमधलं पाणी फसफसून बाहेर येतं? १ वाटी घेऊन करा 'हा' भन्नाट उपाय... 

Highlightsकुकरचं झाकण लावण्यापुर्वी गॅसची फ्लेम मोठी ठेवा आणि आतल्या पदार्थाला चांगली उकळी येऊ द्या.

डाळ, खिचडी, भात, वेगवेगळ्या उसळी, पुरण असे वेगवेगळे पदार्थ करण्यासाठी आपण नेहमीच कुकर वापरतो. कुकरमुळे हे सगळे पदार्थ शिजण्याचं काम जास्त सोपं होतं हे अगदी खरं.. पण त्यासाठी कुकरने मात्र आपल्याला साथ द्यायला हवी.. म्हणजे काय तर बऱ्याच जणींचा अनुभव असा आहे की कुकरमुळे कोणताही पदार्थ अगदी झटपट शिजतो. त्यामुळे आपला वेळ वाचून काम सोपं होतं. पण तो पदार्थ शिजल्यानंतर कुकरची, गॅस शेगडीची आणि बऱ्याचदा ओट्याचीही अवस्था खूप वाईट झालेली असते आणि त्याची आवराआवरी करताना मात्र नाकी नऊ येतात. असं होण्याचं कारण म्हणजे कुकरची शिट्टी होताच आतल्या पदार्थांमधलं पाणी फसफसून बाहेर येतं (Why Is Water Coming Out Of My Pressure Cooker?).. हे टाळायचं असेल तर काय करता येऊ शकतं ते पाहा..(how to stop water coming out from pressure cooker whistle?)

 

शिट्टी होताच कुकरमधलं पाणी फसफसून बाहेर येत असेल तर...

कुकरमध्ये जो कोणता पदार्थ शिजत असेल त्याच्यातलं पाणी जर कुकरची शिट्टी होताच फसफसून बाहेर येत असेल तर असं होऊ नये, यासाठी काय उपाय करता येऊ शकताे, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ manjumittal.homehacks या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

१ मिनिटांत नारळ करवंटीच्या बाहेर येईल- कठीण वाटणारं काम हाेईल अगदी सोपं, करून पाहा

या व्हिडिओमध्ये असं सांगण्यात आलं आहे की तुम्ही डाळ, खिचडी, भात किंवा इतर जो कोणता पदार्थ करत असाल तो पदार्थ जेव्हा कुकरमध्ये शिजायला लावाल तेव्हा त्यामध्ये एक स्टीलची रिकामी वाटीसुद्धा घाला. त्या वाटीमुळे आतलं पाणी अजिबात बाहेर येणार नाही आणि कुकरचं झाकणसुद्धा खराब होणार नाही.


 

हे उपायही करून पाहा..

१. कुकरमधलं पाणी बाहेर येऊ नये यासाठी कुकरच्या शिट्टीच्या खालच्या भागात म्हणजे झाकणाच्या आतल्या बाजुने थोडं तेल लावावं.

उन्हाळ्यात दही खूप पातळ होतं? 'हा' पांढरा पदार्थ घाला- विकतपेक्षाही जास्त घट्ट दही होईल 

२. तुम्ही जो कोणता पदार्थ शिजवत असाल त्या पदार्थामध्ये थोडं तेल घाला. यामुळेही कुकरमधलं पाणी बाहेर येणार नाही.

३. कुकरचं झाकण लावण्यापुर्वी गॅसची फ्लेम मोठी ठेवा आणि आतल्या पदार्थाला चांगली उकळी येऊ द्या. त्यानंतर कुकरचं झाकण लावा आणि गॅसची फ्लेम मंद करून तो पदार्थ शिजवा. पाणी अजिबात बाहेर येणार नाही. 

 

Web Title: Why Is Water Coming Out Of My Pressure Cooker?, how to stop water coming out from pressure cooker whistle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.