lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > पावसाळ्यात फक्त सात दिवस मिळणारी शेवळाची रानभाजी खा ,असं ऋजुता दिवेकर सांगतात ते का?  

पावसाळ्यात फक्त सात दिवस मिळणारी शेवळाची रानभाजी खा ,असं ऋजुता दिवेकर सांगतात ते का?  

महाराष्ट्रीयन संस्कृतीच्या वैशिष्ट्यांपैकी एक असलेली ही शेवळाची भाजी. ही भाजी डोंगराळ भागात दाट जंगलात येते. गुणांनी पौष्टिक असलेली ही रानभाजी केवळ सात ते दहा दिवसच उपलब्ध असते. शेवळाची आमटीसारखी भाजी करुन ती भात किंवा भाकरीसोबत खाल्ली जाते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 06:17 PM2021-06-24T18:17:24+5:302021-06-24T18:24:04+5:30

महाराष्ट्रीयन संस्कृतीच्या वैशिष्ट्यांपैकी एक असलेली ही शेवळाची भाजी. ही भाजी डोंगराळ भागात दाट जंगलात येते. गुणांनी पौष्टिक असलेली ही रानभाजी केवळ सात ते दहा दिवसच उपलब्ध असते. शेवळाची आमटीसारखी भाजी करुन ती भात किंवा भाकरीसोबत खाल्ली जाते.

Why does Rujuta Divekar say to eat Sheval wild vegetable which available only for seven days in the rainy season? | पावसाळ्यात फक्त सात दिवस मिळणारी शेवळाची रानभाजी खा ,असं ऋजुता दिवेकर सांगतात ते का?  

पावसाळ्यात फक्त सात दिवस मिळणारी शेवळाची रानभाजी खा ,असं ऋजुता दिवेकर सांगतात ते का?  

Highlights शेवळाची भाजी पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.ड जीवनसत्त्वं असलेल्या भाज्या खूप कमी आहेत. त्यातली एक शेवळाची भाजी आहे.स्त्रियांच्या आरोग्यासाठी ही भाजी महत्त्वाची मानली जाते.

पावसाळा सुरु झाला की रानभाज्यांचे वेध लागतात. दाट जंगलात आपोआप उगवणार्‍या, सर्वत्र उपलब्ध न होणार्‍या या भाज्या म्हणजे चवीची मेजवानी असतात. एका र्मयादित कालवधीत उपलब्ध होणार्‍या या रानभाज्या म्हणजे पोषक गुणांची खाण असतात. प्रसिध्द आहार तज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी अशाच एका रानभाजीची माहिती सोशल मीडियावर प्रसिध्द केली आहे. ती भाजी म्हणजे शेवळाची भाजी. त्याला जंगली सुरण असंही म्हणतात. खास मराठी लोकांच्या आहारात पावसाळ्यातल्या या शेवळाच्या भाजीला मोठं महत्त्व आहे. शेवळाच्या भाजीला इंग्रजीमधे ड्रॅगन स्टॉक याम असं म्हणतात.
महाराष्ट्रीयन संस्कृतीच्या वैशिष्ट्यांपैकी एक असलेली ही शेवळाची भाजी. ही भाजी डोंगराळ भागात दाट जंगलात येते. त्याची शेती करता येत नाही.ही भाजी एका देठासारखी दिसते. महाराष्ट्रातल्या गावाकडच्या बाजारात ही भाजी मिळते. गुणांनी पौष्टिक असलेली ही रानभाजी केवळ सात ते दहा दिवसच उपलब्ध असते. शेवळाची आमटीसारखी भाजी करुन ती भात किंवा भाकरीसोबत खाल्ली जाते.

शेवळाची भाजी का खावी?

या रानभाजीत आतड्यातील हानिकारक जीवाणू नष्ट करण्याची क्षमता असते. ही भाजी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. या भाजीत तंतूमय घटक जास्त असल्याने वजन कमी करण्यासाठी ही भाजी लाभदायक आहे. शेवळाची भाजी पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. या भाजीमुळे आतड्यातील चांगल्या जीवाणूंची संख्या वाढते. शेवळामधे जीवनसत्त्वं, अँण्टिऑक्सिडण्टस आणि खनिजं असतात. यात ब12 आणि ड जीवनसत्त्वं मोठ्या प्रमाणात असतात. ड जीवनसत्त्वं असलेल्या भाज्या खूप कमी आहेत. त्यातली एक शेवळाची भाजी आहे. स्त्रियांच्या आरोग्यासाठी ही भाजी महत्त्वाची मानली जाते.

शेवळाची भाजी कशी करावी?

शेवळाची भाजी करण्यासाठी शेवळाची एक जुडी, कांदे, लसूण, लाल मिरची, मीठ, तेल, मोहरी, हिंग, गरम मसाला, हळद, खोवलेलं ओलं नारळ एवढं जिन्नस लागतं. शेवळाची भाजी करताना देठाचा खालचा भाग काढून टाकावा आणि केवळ वरचा भागच घ्यावा. शेवाळ बारीक चिरुन मग फोडणीला घालावी. कुकरमधे शिजवावी.

Web Title: Why does Rujuta Divekar say to eat Sheval wild vegetable which available only for seven days in the rainy season?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.