गरमागरम कांदे पोहे हा मराठी लोकांचा अतिशय आवडीचा पदार्थ. कित्येक घरांमध्ये तर आठवड्यातून एकदा तरी गरमागरम पोहे केलेच जातात. कधी त्या पोह्यांमध्ये बटाटा असतो तर कधी टाेमॅटो आणि कडधान्येही असतात.. करायला सोपा आणि कमीतकमी वेळेत होणारा तो एक उत्तम पदार्थ आहे. पण अनेकजणींच्या बाबतीत मात्र असं हाेतं की त्यांनी केलेले पाेहे खूपच कोरडे होतात. ते खाताना घशात अडकल्यासारखे होतात (Why Does Pohe Turn Out Dry?). त्यामुळे दह्याची जोड घेेतल्याशिवाय पोह्याचा एक घासही खाता येत नाही. असं जर तुमच्या बाबतीत होत असेल तर पोह्यांचा ओलसरपणा टिकवून ठेवण्यासाठी पुढे सांगितलेल्या काही गोष्टी करून पाहा..(3 cooking tips for perfect moist pohe)
पोहे कोरडे होऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यावी?
१. पोहे छान ओलसर व्हावेत म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट ही लक्षात ठेवा की पोहे नेहमी भरपूर पाणी घेऊन भिजवा. अगदी पोहे भिजवताना ते चाळणीत घेऊन व्यवस्थित धुतले तरी चालतील. यानंतर त्यांच्यातलं पाणी पुर्णपणे निथळून जाऊ द्या.
डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स वाढण्यामागची ३ आयुर्वेदिक कारणं आणि सोपे उपाय- काळी वर्तुळं कमी होतील
ते चाळणीतच थोडे पसरवून घ्या आणि मग पोहे करण्यासाठी कांदे आणि इतर पदार्थ चिरायला सुरुवात करा. पोहे चांगले भिजले गेले की ते कोरडे होत नाहीत.
२. दुसरी गोष्ट म्हणजे पोहे करण्यासाठी आपण जेव्हा फोडणी करून त्यात कांदा परतण्यासाठी घालतो तेव्हा त्यात लिंबाचा रसही पिळा. लिंबाच्या रसामुळे पोहे कढईत टाकताच थोडे ओलसर होेतात आणि शिवाय त्यांना लिंबामुळे छान आंबूस चवही येते.
३. सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे कांदा परतून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही कढईत पोहे घालता तेव्हा ते चांगले हलवून घ्या. त्याचवेळी त्याच्यात मीठ घाला आणि झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्या.
ढोकळा फुगतच नाही, चिकट- चपटा होतो? २ टिप्स- ढोकळा टम्म फुगून कापसासारखा मऊ होईल
वाफ आल्यानंतर पोह्यांवर पुन्हा एक पाण्याचा शिबका मारा आणि ते थोडे ओलसर करून घ्या. त्यात किंचित साखर घाला आणि पुन्हा झाकण ठेवून वाफ येऊ द्या. पोहे मस्त ओलसर होतील.