Lokmat Sakhi >Food > अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा

अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा

कुकर वापरणे जितके फायदेशीर आहे तितकेच त्याचे अनेक तोटे देखील आहेत. छोटासा निष्काळजीपणा तुमच्यासाठी घातक ठरू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 17:02 IST2025-05-17T17:01:03+5:302025-05-17T17:02:24+5:30

कुकर वापरणे जितके फायदेशीर आहे तितकेच त्याचे अनेक तोटे देखील आहेत. छोटासा निष्काळजीपणा तुमच्यासाठी घातक ठरू शकतो.

why do pressure cookers explode know the reasons and solutions | अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा

अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा

प्रेशर कुकरमुळे स्वयंपाकघरातील बरंच काम सोपं होतं. यामुळे अन्न खूप लवकर शिजतं. वेळ आणि इंधन दोन्हीची बचत होते. मात्र प्रेशर कुकरचा वापर अत्यंत सावधगिरीने करावा लागतो. कारण वापरादरम्यान झालेली छोटीशी चूकही जीवघेणी ठरू शकते. कधीकधी स्वयंपाक करताना प्रेशर कुकरचा स्फोट झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. 

कुकर वापरणं जितकं फायदेशीर आहे तितकेच त्याचे अनेक तोटे देखील आहेत. छोटासा निष्काळजीपणा तुमच्यासाठी घातक ठरू शकतो. प्रेशर कुकरचा स्फोट होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. बऱ्याचदा लोक अनेक वर्षे एकच कुकर वापरतात आणि त्याच्या दुरुस्तीकडे अजिबात लक्ष देत नाहीत. त्यामुळे प्रेशर कुकर फुटण्याची शक्यता जास्त असते.

प्रेशर कुकरचा स्फोट का होतो?

प्रत्येक कुकरच्या झाकणावर एक सेफ्टी व्हॉल्व्ह असतो. या सेफ्टी व्हॉल्व्हचं काम म्हणजे शिट्टी न झाल्यास कुकरमध्ये अडकलेली वाफ बाहेर काढणं आणि त्याचा स्फोट होण्यापासून रोखणं. सेफ्टी व्हॉल्व्ह खराब झाल्यास ते त्याचं काम योग्यरित्या करू शकत नाहीत. बऱ्याचदा, वर्षानुवर्षे तोच कुकर वापरल्यानंतर तो खराब होतो. कुकर खराब होताच त्याचा स्फोट होण्याची शक्यता वाढते.

कुकरचा सेफ्टी व्हॉल्व्ह कधी बदलावा?

कुकरच्या झाकणाचा  सेफ्टी व्हॉल्व्ह फक्त १२ महिने योग्यरित्या काम करतात. १२ महिन्यांनंतर तो जवळजवळ खराब होतो. माहितीच्या अभावामुळे, अनेक महिला खराब झालेल्या सेफ्टी व्हॉल्व्हचा वापर करतात. वर्षातून एकदा सेफ्टी व्हॉल्व्ह बदला. यामुळे फुटण्याची शक्यता कमी होते. तसेच कुकरचा स्फोट होण्याची इतर अनेक कारणं असू शकतात.

'या' कारणांमुळे देखील फुटू शकतो कुकर

जर तुम्ही कुकर जास्त भरला. तर अन्न नीट शिजत नाही फुटण्याचा धोका देखील वाढतो. स्वयंपाक करताना कुकरमध्ये पाणी नसल्यास तो फुटू शकतो. अशा परिस्थितीत, योग्य प्रमाणात पाणी टाकल्यानंतरच कुकर वापरा. गॅस बंद केल्यानंतरही कुकरमध्ये बराच वेळ वाफ राहते. अशा परिस्थितीत तो जोरात उघडल्यास दाब वाढतो आणि कुकर फुटू शकतो. नेहमी शिट्टीच्या मदतीने आधी वाफ बाहेर जाऊ द्या.

Web Title: why do pressure cookers explode know the reasons and solutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.