China Luxury Tea: चहा पिणं ही अनेकांचा सवय आहे. काही लोकांना तर चहा इतका आवडतो की, ते कधीही चहाला नाही म्हणू शकत नाहीत. तर काही लोक दिवसातून किमान दोनदा चहा पितात. बाहेर एक कप चहा साधारणपणे १० ते १५ रूपयांना मिळतो. चहा पावडर साधारण ५० ते १०० रूपयांना पावभर मिळत असेल किंवा थोडी अधिक किंमत असेल. पण कधी आपण अशा चहाबाबत ऐकलंय का, ज्याची किंमत सोन्यापेक्षाही जास्त आहे. जगात एक अशी चहा पावडर आहे ज्याच्या २० ग्रॅमची किंमत एका आलिशान फ्लॅट किंवा लक्झरी कार इतकी असते. आम्ही आपल्याला सांगतोय, चीनमधील 'दा होंग पाओ' चहा. आपल्याला वाचून विश्वास बसणार नाही की, दा होंग पाओ चहा पावडरची किंमत सोन्याच्या तुलनेत ३० पटीने जास्त आहे. या चहामध्ये इतकं काय आहे की, इतकी किंमत आहे ते पाहुयात.
२० ग्रॅम चहा १८ लाख रुपये!
२००२ साली China मध्ये झालेल्या एका लिलावात एका श्रीमंत व्यक्तीने फक्त २० ग्रॅम ‘दा होंग पाओ’ चहासाठी तब्बल १,८०,००० युआन म्हणजेच जवळपास १८ ते २० लाख रुपये मोजले होते. त्या हिशोबाने या चहाच्या एका कपाची किंमतच जवळपास १० लाख रुपये येते.
इतका महाग का आहे हा चहा?
या चहाच्या प्रचंड किमतीमागचं मुख्य कारण म्हणजे त्याची दुर्मिळता. अस्सल ‘दा होंग पाओ’ चहा Wuyishan पर्वतरांगांमध्ये असलेल्या काही खास ‘मदर ट्री’ म्हणजेच जुन्या झाडांपासून मिळतो. जगात अशी झाडं फारच कमी उरली आहेत. ही झाडं सरकारी मालमत्ता असून त्यांची कडेकोट सुरक्षा केली जात असे. या झाडांपासून वर्षाला फक्त काहीशे ग्रॅम चहाच तयार होतो, जो प्रामुख्याने उच्च अधिकाऱ्यांसाठी राखून ठेवला जातो. असा समज आहे की हा चहा प्यायल्याने काही आजारांवरही फायदा होऊ शकतो.
‘दा होंग पाओ’ नावामागची गोष्ट
‘दा होंग पाओ’ म्हणजे “मोठा लाल झगा”. लोककथेनुसार, प्राचीन काळात एका चिनी सम्राटाच्या आईची तब्येत या चहामुळे सुधारली. आनंद व्यक्त करण्यासाठी सम्राटाने त्या चहाच्या झाडांना स्वतःचा लाल झगा अर्पण केला आणि तेव्हापासून या चहाला हे नाव पडले.
सामान्य लोकांसाठी पर्याय
जर तुम्हाला वाटत असेल की हा चहा चाखणं अशक्य आहे, तर थोडी दिलासा देणारी गोष्ट आहे. अस्सल ‘मदर ट्री’ चहा मिळणं जवळपास अशक्य आहे, पण त्याच झाडांच्या कलमांपासून (cuttings) तयार केलेल्या नवीन झाडांचा चहा बाजारात मिळतो. याची चांगली क्वालिटी सुमारे १०० डॉलर साधारण ८,००० रुपये प्रति किलो दराने मिळू शकते. मात्र, खरा ‘एंटीक’ आणि दुर्मिळ चहा खरेदी करणं हे फक्त अब्जाधीशांनाच परवडणारं आहे.
Web Summary : Da Hong Pao tea, costing lakhs per cup, is rare due to limited 'Mother Tree' production in China. Once, 20 grams fetched ₹18 lakhs! Emperors favored it for its supposed health benefits; now, clones offer affordable options.
Web Summary : दा होंग पाओ चाय, जिसकी कीमत लाखों रुपये प्रति कप है, चीन में 'मदर ट्री' उत्पादन सीमित होने के कारण दुर्लभ है। एक बार, 20 ग्राम की कीमत ₹18 लाख थी! सम्राटों ने इसे स्वास्थ्य लाभों के लिए पसंद किया; अब, क्लोन किफायती विकल्प प्रदान करते हैं।