भारतीय घरांमध्ये जेवणाच्या ताटात चपाती रोज खाल्ली जाते. चपातीशिवाय जेवणाचे ताट देखील अपूर्ण वाटते. गव्हाची, मैद्याची किंवा मिक्स धान्याचा वापर करुन चपाती बनवता येते.(soft chapati tips) पण अनेक घरांमध्ये वारंवार एकच तक्रार सतत ऐकायला मिळते ती म्हणजे चपाती नीट फुगत नाही, तव्यावर टाकताच करपते, कडक होते, खाल्ल्यानंतर पोट जड वाटते.(chapati making tricks) बाहेर हॉटेलमध्ये मिळणारी चपाती मऊ, टम्म फुगलेली आणि कापसासारखी मऊ असते पण घरी का होत नाही असा प्रश्न अनेक गृहिणींचा असतो. चपाती परफेक्ट न होण्यामागे अनेक छोट्या चुका असतात.(soft roti at home) ज्यामुळे चपाती कडक, वातड होते. चपाती तव्यावर टाकण्यापूर्वी आणि भाजताना कोणती काळजी घ्यायला हवी जाणून घेऊया.
किलोभर गाजराचे करा कापसाहून मऊ गुलाबजाम, १५ मिनिटांत होतील, तोंडात टाकताच विरघळतील - चवीलाही मस्त
1. चपाती तव्याला चिकटू नये म्हणून आपल्याला १ चमचा तेल, १ चमचा मीठ, स्वच्छ कापड आणि शिंपडण्यासाठी थोडे पाणी लागेल. चपाती लाटणं जितके सोपे काम आहे तितकेच कौशल्याचं. पीठ मळण्यापासून तव्याचे तापमान तपासणे. अनेकदा आपण पीठ घट्ट किंवा सैल मळतो. कधी कधी घाईत चपाती तव्यावर टाकतो. कधी कधी तवा खूपच गरम किंवा गार असतो. ज्यामुळे चपाती करपते किंवा फुगत नाही.
2. चपाती करपू नये यासाठी आपल्याला तवा सगळ्यात आधी गॅसवर ठेवावा लागेल. तवा गरम झाल्यानंतर त्यावर १ चमचा तेल आणि मीठ घाला. यामुळे तवा व्यवस्थित गरम होईल.
3. आता एका कापडाची घडी घालून संपूर्ण तव्यावरील मिश्रण पसरवून घ्या. १ मिनिटानंतर तव्यावरील सर्व घाण निघून जाईल. ज्यामुळे तवा स्वच्छ आणि गुळगुळीत होईल.
4. यानंतर तव्यावर थोडे पाणी शिंपडा आणि त्याच कापडाने तवा पूर्णपणे घासून स्वच्छ करा. यामुळे तवा पूर्णपणे स्वच्छ होतो. चपाती तव्यावर टाकल्यानंतर मंद आचेवर गॅस ठेवा. चपाती हळूहळू फुगल्यानंतर कडांना दाब द्या. ज्यामुळे ती व्यवस्थित शिजेल. दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजल्यानंतर तेल लावा. असं केल्याने आपली चपाती करपणारही नाही ना जळणार.
