Lokmat Sakhi >Food > शेवग्याच्या पानांना म्हटलं जातं सुपरफूड, पण 'या' ४ समस्या असलेल्यांनी चुकूनही खाऊ नये

शेवग्याच्या पानांना म्हटलं जातं सुपरफूड, पण 'या' ४ समस्या असलेल्यांनी चुकूनही खाऊ नये

Who Should Not Eat Moring Leaf: अनेक फायदे असूनही शेवग्याच्या पानांची भाजी काही लोकांसाठी नुकसानकारक ठरू शकते. अशात हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं की, कोणत्या समस्या असल्यावर या पानांची भाजी खाऊ नये.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 16:59 IST2025-06-23T16:57:13+5:302025-06-23T16:59:45+5:30

Who Should Not Eat Moring Leaf: अनेक फायदे असूनही शेवग्याच्या पानांची भाजी काही लोकांसाठी नुकसानकारक ठरू शकते. अशात हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं की, कोणत्या समस्या असल्यावर या पानांची भाजी खाऊ नये.

Who should not eat moring leaves and reason | शेवग्याच्या पानांना म्हटलं जातं सुपरफूड, पण 'या' ४ समस्या असलेल्यांनी चुकूनही खाऊ नये

शेवग्याच्या पानांना म्हटलं जातं सुपरफूड, पण 'या' ४ समस्या असलेल्यांनी चुकूनही खाऊ नये

Who Should Not Eat Moring Leaf: शेवग्याच्या पानांचा सुपरफूड मानलं जातं. कारण यात अनेक पोषक तत्व असतात, जे आरोग्यासंबंधी एक नाही तर अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात. शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटामिन सी, व्हिटामिन ए, कॅल्शिअम, आयर्न आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. या पानांची भाजी नियमित खाल्ल्यानं इम्यूनिटी वाढते, सूज कमी होते आणि एनर्जी सुद्धा वाढते. इतके फायदे असूनही या पानांची भाजी काही लोकांसाठी नुकसानकारक ठरू शकते. अशात हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं की, कोणत्या समस्या असल्यावर या पानांची भाजी खाऊ नये.

१) हृदयरोग

शेवग्याच्या पानांमध्ये ब्लड प्रेशर कमी करणारे गुण असतात. ही पानं हाय ब्लड प्रेशर असलेल्यांसाठी फायदेशीर ठरतात. पण जे लोक आधीच हृदयासंबंधी औषधं घेत असतील, त्यांचं ब्लड प्रेशर या भाजीमुळे अधिक कमी होऊ शकतं. ज्यामुळे कमजोरी, चक्कर किंवा बेशुद्ध पडणे अशा समस्या होऊ शकतात. सोबतच हृदयरोग असलेल्यांना पोटॅशिअमची लेव्हल मेन्टेन ठेवणं गरजेचं असतं आणि शेवग्यामध्ये पोटॅशिअम जास्त असतं.

२) लिव्हर डिजीज

शेवग्यामध्ये असे काही तत्व असतात, जे लिव्हर डिटॉक्स करण्यास मदत करतात. पण जर आधीच कुणाला हेपेटायटिस, फॅटी लिव्हर किंवा सिरोसिस यांसारख्या समस्या असतील तर त्यांनी जास्त प्रमाणात शेवगा खाऊ नये. यानं लिव्हरवर अधिक दबाव पडू शकतो. यानं लिव्हर एंझाइम्स असंतुलित होतात आणि औषधांचा प्रभावही कमी होतो.

३) डायबिटीस

शेवग्याची पानं ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास फायदेशीर असतात. पण जे लोक डायबिटीसचं औषध घेत आहेत, त्यांची ब्लड शुगर या पानांमुळे खूप जास्त कमी होऊ शकते. ज्यामळे हायपोग्लायसीमियाचा धोका वाढतो. त्यामुळे डायबिटीसच्या रूग्णांनी शेवगा खाण्याआधी ब्लड शुगर लेव्हल चेक आणि डॉक्टरांचाही सल्ला घ्या.

४) गर्भधारणा

गर्भवती महिलांना शेवग्याची पानं खाणं टाळलं पाहिजे. काही रिसर्चमधून समोर आलं आहे की, शेवग्याची मूळं आणि सालीमुळे यूटेराइन कॉन्ट्रॅक्शन (uterine contractions) वाढू शकतं. ज्यामुळे मिसकॅरेज किंवा प्री-मेच्योर लेबरचा धोका असतो. त्यामुळे ही पानं खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

Web Title: Who should not eat moring leaves and reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.