Join us

नारळाचं पाणी म्हणजे तब्येतीसाठी वरदान, पण ‘या’ कारणांनी तुम्हाला नारळपाणीही बाधू शकतं, होतो त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 16:29 IST

Coconut Water : काही लोकांसाठी नारळ पाणी पिणं नुकसानकारक ठरू शकतं. अशात तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की, कोणत्या समस्या असल्यावर तुम्ही नारळ पाणी पिणं टाळलं पाहिजे.

Coconut Water Side Effects : उन्हाळा सुरू झाला की, जास्तीत जास्त लोक शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी नारळाचं पाणी पितात. नारळाचं पाणी प्यायला तर गोड लागतंच, सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. उन्हाळा असो वा हिवाळा नारळाचं पाणी पिणं कधीही फायदेशीर असतं. यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, आयर्न, कॅल्शिअम, कॉपर, फॉस्फोरस, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमसारखे अनेक पोषक तत्व असतात, जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. इतके फायदे असूनही काही लोकांसाठी नारळ पाणी पिणं नुकसानकारक ठरू शकतं. अशात तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की, कोणत्या समस्या असल्यावर तुम्ही नारळ पाणी पिणं टाळलं पाहिजे.

कुणी पिऊ नये नारळ पाणी?

किडनीची समस्या

ज्या लोकांना किडनीसंबंधी काहीही समस्या असेल अशांनी नारळ पाणी पिणं टाळलं पाहिजे. नारळ पाण्यात पोटॅशिअमचं प्रमाण भरपूर असतं, ज्यामुळे किडनी फिल्टरचं काम योग्यपणे करू शकत नाही. त्यामुळे किडनीची समस्या असलेल्या लोकांनी नारळाचं पाणी पिणं टाळलं पाहिजे.  

हाय ब्लड शुगर

ज्यांना डायबिटीसची समस्या असते त्यांनी सुद्धा नारळाचं पाणी पिणं टाळलं पाहिजे. नारळाच्या पाण्याचं ग्लायसेमिक इंडेक्स हाय असतं आणि सोबतच यात कार्बोहायड्रेटही भरपूर असतात. अशात हे पाणी प्यायल्यास ब्लड शुगरचं प्रमाण वाढतं. त्यामुळे डायबिटीसच्या रूग्णांनी नारळ पिणं टाळण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

अ‍ॅलर्जी

काही लोकांना नारळ पाणी प्यायल्यास अ‍ॅलर्जीची समस्या होऊ शकते. जसे की, काहींना त्वचेवर खाज आणि रॅशेज येऊ शकतात. त्यामुळे नारळ पाणी प्यायल्यावर सूज किंवा इतर काही समस्या होत असेल तर त्यांनी पिऊ नये.

हाय ब्लड प्रेशर

हाय बीपीची समस्या आजकाल भरपूर लोकांना असते. ज्यांना ही समस्या असेल त्यांनी सुद्धा नारळ पाणी पिणं टाळलं पाहिजे. कारण नारळाच्या पाण्यात आढळणारं पोटॅशिअम हाय बीपीच्या औषधांसोबत मिक्स होऊ नुकसान पोहोचवू शकतं. 

सर्दी-पडसा

नारळ पाणी थंड असतं. अशात तुम्हाला जर सर्दी-पडसा असेल तर नारळाचं पाणी पिणं टाळलं पाहिजे. 

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्स