सणवार म्हटलं की पुरी आवर्जून खाल्ली जाते. पुऱ्या तेलकट होतात म्हणून बरेचजण पुरी खाणं टाळतात तर काहीजण डाएटवर असतात म्हणून पुऱ्या खातच नाहीत. पुरी करण्यासाठी कोणतं तेल वापरावं याबाबत डॉक्टरांनी खास सल्ला दिला आहे. (Why My Puri Is Oily) भाजी बनवण्यापासून डिप फ्राय करण्यापर्यंत प्रत्येक पदार्थासाठी वेगवेगळ्या प्रकारची तेल वापरली जातात. आजकाल वर्जिन ऑलिव्ह ऑईलची क्रेझ दिसून येत आहे. काहीजण पुरी तळण्यासाठीसुद्धा एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑईल वापरतात. पण या तेलाचा वापर फक्त ड्रेसिंग आणि सॅलेडसाठी केला जातो. ऑलिव्ह ऑईल हाय फ्लेमवर तापवल्यानं त्यातील पोषक तत्व नष्ट होतात. How To Reduce Oil From puri)
तज्ज्ञांच्यामते पुरी तळण्यासाठी शेंगण्याच्या तेलाचा वापर करायला हवा. शेंगदाण्याचे तेल हाय फ्लेमसाठी उत्तम असून हे तेल तापवल्यानं त्यातील पोषक तत्व नष्ट होत नाहीत. भाज्यांना फोडणी देण्यासाठी कच्च्या घाणीचं किंवा मोहोरीचं तेल उत्तम मानलं जातं. रिफाईंड तेल आणि पाम तेल घरात आणूच नका ते तब्येतीसाठी नुकसानकारक ठरतं.
पुऱ्यांनी जास्त तेल शोषून घेऊ नये म्हणून काय करायचं?
पुऱ्यांनी जास्त तेल पिऊ नये असं वाटत असेल तर काही सोप्या ट्रिक्स फॉलो कराव्या लागतील. सगळ्यात आधी कणीक मळून घ्या. जास्त सैल मळू नका त्यामुळे पुऱ्यांना तेल जास्त लागतं. पुरीचं कणीक हे थोडं घट्टच असावं. नंतर पुऱ्या लाटून थोडावेळ फ्रिजमध्ये ठेवा. १० ते १५ मिनिटांनी पुऱ्यांची प्लेट बाहेर काढून ठेवा २ मिनिटं थांबून नंतर पुरी तळायला घ्या. ही ट्रिक फॉलो केल्यास पुऱ्या जास्त मऊ बनतील.
पुऱ्या कडक होऊ नयेत म्हणून उपाय
पुरी तळल्यानंतर लगेत वातड होत अशी अनेकांची तक्रार असते. मऊ, फुललेल्या पुऱ्या करण्यासाठी एक खास ट्रिक फॉलो करा. सगळ्यात आधी पीठ मिळून त्यात थोडं तेल आणि दही मिसळा. नंतर हलक्या हातानं दही आणि तेल पिठात मिक्स करा. यामुळे सर्व पीठ एकजीव होईल. नंतर कोमट पाण्यानं पीठ मळा. मळल्यानंतर काहीवेळासाठी झाकून ठेवा. कमीत कमी १५ मिनिटांनंतर गोळे तोडून तेल लावून पुरी लाटून घ्या. या पद्धतीनं पुऱ्या मऊ, मुलायम राहतील.