lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > घसा खवखवतो म्हणून अळूवडी करणंच टाळता? खाजरी पानं ओळखण्याची १ ट्रिक- खा अळूवडी बिंधास्त

घसा खवखवतो म्हणून अळूवडी करणंच टाळता? खाजरी पानं ओळखण्याची १ ट्रिक- खा अळूवडी बिंधास्त

Which Leaf is good to make Aluvadi, check out some tips : हिरव्या की काळ्या देठांची पानं? नक्की कोणत्या पानांची अळूवडी करावी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2024 12:18 PM2024-01-18T12:18:48+5:302024-01-18T12:19:48+5:30

Which Leaf is good to make Aluvadi, check out some tips : हिरव्या की काळ्या देठांची पानं? नक्की कोणत्या पानांची अळूवडी करावी?

Which Leaf is good to make Aluvadi, check out some tips | घसा खवखवतो म्हणून अळूवडी करणंच टाळता? खाजरी पानं ओळखण्याची १ ट्रिक- खा अळूवडी बिंधास्त

घसा खवखवतो म्हणून अळूवडी करणंच टाळता? खाजरी पानं ओळखण्याची १ ट्रिक- खा अळूवडी बिंधास्त

अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणजे अळूवडी (Aluvadi). कोणताही सण असो, बहुतांश घरात अळूवडी हमखास केली जाते. पावसाळा असो किंवा हिवाळा अळूची पानं बाजारात मिळतात. अळूचे अनेक पदार्थ केले जातात. अळूवडी, अळूचं फदफदं, अळूची भजी आपण खाल्लीच असेल. पण अळूच्या पानांचा वापर करून पदार्थ तयार करताना घशात बऱ्याचदा खवखव होते. त्यामुळे संपूर्ण पदार्थ वाया जातो.

अळूच्या पानांमध्ये कॅल्शियम ऑक्झिलेट रेफॉईड्स असते. त्यामुळे अळूची वडी किंवा भाजी खाल्ली की घसा खवखवतो (Cooking Tips). अळूचे पदार्थ तयार करताना घशात खाज उठू नये, यासह पानांची निवड करताना कोणत्या प्रकारची पानं विकत घ्यावी? अळूच्या पानांचा वापर करून पदार्थ तयार करताना कोणत्या टिप्स लक्षात ठेवाव्यात. पाहूयात(Which Leaf is good to make Aluvadi, check out some tips).

एक कांदा-२ सिमला मिरच्या, कधी खाल्ली नसेल इतकी चमचमीत चटणी, ५ मिनिटांत झटपट रेसिपी

अळूची पानं विकत घेताना कोणत्या पानांची निवड करावी?

- अळूच्या पानांमध्ये २ प्रकार असतात. एक हिरव्या देठाची अळूची पानं असतात. या पानांचे पदार्थ तयार करताना हाताला खाज आणि घशाला खवखव निर्माण होते. आपण हिरव्या देठाच्या अळूच्या पानांचा वापर भाजीसाठी करू शकता. जेव्हा आपण हिरव्या देठाच्या अळूच्या पानांचा वापर कराल तेव्हा, त्यात चिंच, आमसूल किंवा काही तरी आंबट पदार्थ घालून मिक्स करा.

लांबट जांभळ्या वांग्याचे करा खमंग कुरकुरीत काप फक्त ५ मिनिटांत, जेवताना तोंडाला येईल चव

- काळ्या देठाची अळूची पानं आपल्याला ठाऊकच असेल. या पानांमध्ये खाजरेपणा खूप कमी असतो. आपण याचा वापर वडी करण्यासाठी करू शकता. पण तरीही वडी तयार करताना बेसनाच्या बॅटरमध्ये आंबट पदार्थ किंवा चिंचेचा कोळ घालून मिक्स करा, यामुळे वडी उत्तम आणि कुरकुरीत तयार होतील. 

Web Title: Which Leaf is good to make Aluvadi, check out some tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.