Long vs Round Papaya: तब्येत चांगली ठेवायची असेल तर पौष्टिक आहार आणि वेगवेगळी फळं नियमित खाणं गरजेचं असतं. फळांचा विषय निघाला की, पपई टाळता येत नाही. कारण पपईमधून शरीराला भरपूर पोषक तत्व मिळतात. पपई जीवनसत्त्वे आणि फायबरने भरलेली असल्याने आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पपईचे शरीराला खूप फायदे मिळतात. जसे की, पोट साफ राहतं. व्हिटामिन A भरपूर असल्यामुळे ती डोळ्यांच्या आरोग्यासाठीही चांगली असते. गोड आणि पिकलेली पपई खायलाही खूप चविष्ट लागते. मात्र अनेकदा लोकांना चांगली पपई ओळखता येत नाही. बाजारात साधारणपणे दोन प्रकारच्या पपया मिळतात लांबट आणि गोल. त्यामुळे कोणती पपई घ्यावी हे समजत नाही. दुकानदाराला विचारलं तर तो दोन्ही गोड असल्याचं सांगतो. पण गोड पपई कशी ओळखायची यासाठी काही सोपे टिप्स जाणून घेऊया.
लांब की गोल, कोणती पपई जास्त गोड?
बाजारात गोल आणि लांबट दोन्ही प्रकारच्या पपया सहज मिळतात. त्यापैकी गोल पपई साधारणपणे जास्त गोड असते. गोल पपईमध्ये बिया कमी असतात. तर लांबट पपईला 'पूसा जायंट' ही जात म्हणतात. ही पपई वर्षभर सहज उपलब्ध असते. मात्र या पपईत बिया जास्त असतात आणि गोल पपईच्या तुलनेत ती थोडी कमी गोड व कमी रसाळ असते.
गोड पपई कशी ओळखावी?
जर तुम्ही गोल पपई घेण्याचं ठरवलं असेल, तर ती नीट पिकलेली आहे की नाही हे ओळखणंही महत्त्वाचं आहे. पपईवर हिरवट ते नारिंगी रंगाच्या छटा दिसल्या पाहिजेत. याचा अर्थ पपई नैसर्गिकरीत्या पिकली आहे. पपईची बाहेरील साल गुळगुळीत आणि ताजी दिसली पाहिजे. पपई खरेदी करताना ती हलक्या हाताने दाबून पाहा. थोडी मऊ वाटली तर ती रसाळ आणि गोड असण्याची शक्यता जास्त असते.
पपई खाण्याचे फायदे
दररोज पपई खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होते. ही लो-कॅलरी फळ असल्यामुळे लवकर पोट भरतं आणि पचन सुधारतं. पपई खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते. पपईमध्ये भरपूर फायबर आणि पपेन एन्झाइम असतं, जे पचन सुधारतं आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करतं. तसेच पपईमध्ये व्हिटामिन C मुबलक प्रमाणात असतं, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं आणि इन्फेक्शनपासून संरक्षण करतं. याशिवाय पपईमध्ये व्हिटामिन A आणि इतर खनिजंही असतात, जे मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत करतात.
Web Summary : Choose sweeter papayas using this simple trick. Round papayas are generally sweeter with fewer seeds. Look for orange hues, smooth skin, and slight softness. Papaya aids digestion, boosts immunity, and helps in weight loss.
Web Summary : इस आसान ट्रिक से मीठे पपीते चुनें। गोल पपीते आम तौर पर कम बीजों के साथ मीठे होते हैं। नारंगी रंग, चिकनी त्वचा और थोड़ी नरमी देखें। पपीता पाचन में मदद करता है, प्रतिरक्षा बढ़ाता है और वजन घटाने में सहायक है।