Join us
Daily Top 2Weekly Top 5

कीवी की संत्री, कोणत्या फळातून आपल्याला जास्त मिळतं व्हिटामिन सी? इम्युनिटी कशाने अधिक वाढेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 10:46 IST

Kiwi Vs Orange : आज आपण व्हिटामिन-C चे दोन मोठे चॅम्पियन्स समोर-समोर आणत आहोत. म्हणजे यांपैकी कोणत्या फळात जास्त व्हिटामिन सी असतं हे पाहणार आहोत.

Kiwi Vs Orange : जेव्हा सर्दी-खोकला पळवण्याची किंवा शरीराची इम्युनिटी ‘सुपरचार्ज’ करण्याची वेळ येते, तेव्हा आपल्या डोक्यात सर्वात आधी एकाच फळाचं नाव येतं ते म्हणजे संत्री. हे आंबट-गोड फळ अनेक वर्षांपासून व्हिटामिन-Cचा ‘पोस्टर बॉय’ मानलं जातं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की हिरवट-तपकिरी साल असलेलं छोटंसं कीवी या स्पर्धेत संत्र्यालाही मागे टाकू शकतं? आज आपण व्हिटामिन-C चे दोन मोठे चॅम्पियन्स समोर-समोर आणत आहोत. म्हणजे यांपैकी कोणत्या फळात जास्त व्हिटामिन सी असतं हे पाहणार आहोत.

संत्री

संत्री हे जगभरात सर्वाधिक खाल्लं जाणारं आणि आवडीचं आंबट फळ आहे. मध्यम आकाराच्या एका संत्र्यात साधारण 70–80 मिली ग्रॅम व्हिटामिन-C मिळतं. यामध्ये अँटी-ऑक्सीडंट्स आणि फायबरही भरपूर असतं, ज्यामुळे ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. नियमितपणे संत्री खाल्ल्याने ब्लड सर्कुलेशन सुरळीत होतं, त्यामुळे त्वचा निरोगी राहते.

कीवी

आता पाहुया हिरवट-तपकिरी रंगाच्या छोट्या पण शक्तीशाली कीवीबाबत. आकाराने लहान असलं तरी व्हिटामिन-Cच्या बाबतीत हे संत्र्यापेक्षा खूप पुढे आहे. एका कीवीमध्ये सुमारे 90–100 मिली ग्रॅम व्हिटामिन-C असतं. म्हणजेच संत्र्यापेक्षा जवळपास 1.5 पट जास्त! याशिवाय, कीवीमध्ये फायबर, पोटॅशियम आणि अँटी-ऑक्सीडंट्सही भरपूर असतात.

इम्युनिटीसाठी कोणतं फळ जास्त फायद्याचं?

आकड्यांवर नजर टाकली, तर कीवीमध्ये संत्र्यापेक्षा जास्त व्हिटामिन-C असतं. त्यामुळे जर तुमचं उद्दीष्ट लवकर व्हिटामिन-C ची भरपाई करणं किंवा इम्युनिटी लगेच बूस्ट करणं असेल, तर कीवी उत्तम पर्याय आहे. खासकरून डेंगूसारख्या आजारांमध्ये कीवीचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.

दोन्ही फळे महत्त्वाची

कीवीमध्ये व्हिटामिन-C जास्त आहे, पण याचा अर्थ असा नाही की संत्र्याचं महत्त्व कमी आहे. संत्रे हे आपल्या सहज उपलब्धतेमुळे आणि इतर पोषक घटकांमुळे अजूनही अत्यंत उपयुक्त फळ आहे. इम्युनिटी लगेच वाढवायची असेल तर कीवी जरूर खा. संत्री सिझनेबल फळ असल्याने ते नियमित खाणंही तितकंच फायदेशीर आहे. संपूर्ण आरोग्य सुधारण्यासाठी दोन्ही फळे आहारात असली, तरच उत्तम परिणाम मिळतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Kiwi or Orange: Which fruit boosts Vitamin C and immunity more?

Web Summary : Kiwi boasts more Vitamin C than oranges, crucial for boosting immunity, especially during illnesses like dengue. While kiwi packs a punch, oranges, readily available, remain beneficial. Both fruits contribute to overall health.
टॅग्स :अन्नहेल्थ टिप्स