भात हा आपल्या रोजच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. मात्र अनेकदा भात शिजवताना तो जास्त मऊ होतो, चिकट होतो किंवा खिचकाही होतो. जेवणात भात छान मोकळा, दाणेदार आणि हलका हवा असेल तर भात करतानाच काही गोष्टींची काळजी घेणे फार आवश्यक असते. (When does rice become sticky? See how to make soft rice , remember these tips while cooking )योग्य पद्धतीने केलेला भात चवीला उत्तम लागतो आणि दिसायलाही आकर्षक वाटतो.
भात मोकळा होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांदूळ नीट धुणे. तांदळावर असलेले अतिरिक्त पीठ (स्टार्च) निघून गेली नाही, तर भात चिकट होतो. त्यामुळे तांदूळ किमान दोन-तीन वेळा स्वच्छ पाण्यात धुवावेत. पाणी स्वच्छ दिसू लागले की समजावे की तांदूळ योग्यरीत्या धुतले गेले आहेत.
तांदूळ भिजवण्याचाही भाताच्या पोतावर परिणाम होतो. खूप वेळ तांदूळ भिजवले तर भात जास्त मऊ होण्याची शक्यता असते. साधारण १५–२० मिनिटे भिजवलेले तांदूळ पुरेसे असतात. काही प्रकारचे तांदूळ तर भिजवायची गरजही नसते. भिजवताना वेळेचा अतिरेक टाळावा. बरेचदा तांदूळ फक्त धुणेही पुरेसे होते.
भात करताना पाण्याचे प्रमाण योग्य असणे फार महत्त्वाचे आहे. जास्त पाणी घातले तर भात फुगून खिचका होतो, तर कमी पाणी असेल तर भात नीट शिजत नाही. त्यामुळे चिकट होतो. वापरल्या जाणाऱ्या तांदळाच्या प्रकारानुसार पाण्याचे प्रमाण बदलते, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. योग्य प्रमाणात पाणी घेतले तर भात दाणेदार होतो. भातात पाणी ओतल्यावर बोटाने तपासून पाहावे. बोटाच्या अर्ध्यापर्यंत येईल एवढे पाणी असावे.
भात उकळताना सतत ढवळणे टाळावे. भात शिजत असताना वारंवार ढवळल्याने दाणे तुटतात आणि स्टार्च बाहेर येतो, ज्यामुळे भात चिकट होतो. भात उकळत असताना झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजू द्यावा. कुकरला शिजवत असाल तर ढवळण्याचा प्रश्नच येत नाही.
कुकरला भात लावताना झाकण उघडाची घाई करु नका. झाकण वाफ गेल्यावर उघडते. त्याचे ते नीट उघडते. जबरदस्ती उघडले की भात नीट शिजत नाही आणि छान मोकळा होत नाही. भात शिजवण्यासाठी भांड्याची निवडही महत्त्वाची ठरते. जाड तळाचे भांडे किंवा कुकर वापरल्यास उष्णता समप्रमाणात पसरते आणि भात सारखा शिजतो. पातळ भांड्यात भात लवकर तळाला लागण्याची किंवा जास्त मऊ होण्याची शक्यता असते.
Web Summary : Achieve fluffy, non-sticky rice by rinsing grains thoroughly, soaking briefly (or not at all), using the correct water ratio, and avoiding frequent stirring. Cook with a heavy-bottomed pot or cooker for even heat distribution, ensuring perfectly cooked grains.
Web Summary : धोने, भिगोने (या नहीं), सही पानी अनुपात और बार-बार हिलाने से बचें। समान गर्मी के लिए भारी तले वाले बर्तन या कुकर में पकाएं, जिससे पूरी तरह से पके हुए चावल मिलें।