Lokmat Sakhi >Food > Modak Special Recipe : बाप्पाच्या नैवेद्याला करा १० दिवस टिकणारे गव्हाच्या पिठाचे मोदक, चवीला मस्त...

Modak Special Recipe : बाप्पाच्या नैवेद्याला करा १० दिवस टिकणारे गव्हाच्या पिठाचे मोदक, चवीला मस्त...

Wheat Flour Modak Recipe : Instant Atta Modak Recipe : How To Make Wheat Flour Modak At Home : पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या पिठाचे मोदक कसे करायचे याची साधीसोपी रेसिपी पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2025 16:39 IST2025-08-18T16:22:38+5:302025-08-18T16:39:50+5:30

Wheat Flour Modak Recipe : Instant Atta Modak Recipe : How To Make Wheat Flour Modak At Home : पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या पिठाचे मोदक कसे करायचे याची साधीसोपी रेसिपी पाहा...

Wheat Flour Modak Recipe Instant Atta Modak Recipe How To Make Wheat Flour Modak At Home | Modak Special Recipe : बाप्पाच्या नैवेद्याला करा १० दिवस टिकणारे गव्हाच्या पिठाचे मोदक, चवीला मस्त...

Modak Special Recipe : बाप्पाच्या नैवेद्याला करा १० दिवस टिकणारे गव्हाच्या पिठाचे मोदक, चवीला मस्त...

गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागताच घराघरात उत्साहाचं वातावरण तयार होतं. गणेशोत्सवात बाप्पाला रोज वेगवेगळे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवले जातात, पण मोदकांशिवाय गणपती (Wheat Flour Modak Recipe) बाप्पाचा नैवेद्य पूर्णच होऊ (How To Make Wheat Flour Modak At Home) शकत नाही. गणेशोत्सव म्हटलं की मोदकांचा गोडवा आपसूक आठवतोच. उकडीचे मोदक, तळणीचे मोदक, चॉकलेट मोदक अशा अनेक प्रकारचे मोदक घरोघरी खास बाप्पासाठी तयार केले जातात(Instant Atta Modak Recipe).

उकडीचे गरमागरम मोदक खायला जितके स्वादिष्ट लागतात तितकेच ते जास्त दिवस टिकत नाहीत आणि करायला देखील फार वेळ खर्ची करावा लागतो. परंतु बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवायचा असेल तर असे मोदक हवे जे चविष्ट असूनही काही दिवस चांगले टिकतील. अनेकींना दररोज बाप्पाच्या प्रसादाला काय करावं असा देखील प्रश्न पडतोच.  अशावेळी गव्हाच्या पिठाचे मोदक हा सर्वोत्तम पदार्थ आहे. गव्हाच्या पिठाचे मोदक फक्त पौष्टिक आणि चविष्ट नसून १० ते १५ दिवस सहज चांगले टिकतात. हे मोदक चवीला उत्कृष्ट लागतातच, पण ते करायलाही सोपे असतात. पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या पिठाचे मोदक कसे करायचे, याची सोपी रेसिपी पहा  जेणेकरून मोदक अधिकच चविष्ट होतील.

साहित्य :- 

१. गव्हाचे पीठ - २ कप 
२. साजूक तूप - १ कप 
३. सुक्या खोबऱ्याचा किस - १/२ कप 
४. गूळ - १ कप (किसलेला गूळ)
५. वेलची पूड - १/२ टेबलस्पून 
६. साखर - १ टेबलस्पून 

सण - उत्सवाला तळण तर होणारच, कोणतं तेल तळण्यासाठी चांगलं? तेलकट खाऊनही बिघडणार नाही तब्येत...


घट्ट कवडी दही लावण्यासाठी मिरचीची एक ट्रिक, अधमुरं दही होईल मस्त! विरजणाचीही गरज नाही...

कृती :- 

१. एका मोठ्या कढईत गव्हाचे पीठ घेऊन ते मंद आचेवर व्यवस्थित खरपूस भाजून घ्यावे मग त्यात साजूक तूप घालूंन पीठ पुन्हा एकदा भाजून घ्यावे. 
२. गव्हाचे पीठ भाजून झाल्यांवर त्यात सुक्या खोबऱ्याचा किस घालावा. मग पुन्हा एकदा सगळे मिश्रण भाजून घ्यावे. 
३. सगळ्यात शेवटी गॅस बंद करून या मिश्रणात किसलेला गूळ घालावा. मग हाताने हलकेच दाब देत गूळ मिश्रणात व्यवस्थित मिसळून घ्यावा. 

गणपती आगमनाला करा, काकडीचा गोड धोंडस! अस्सल कोकणी पारंपरिक पदार्थ - चवं परफेक्ट आजीच्या हातची... 

४. एका मिक्सरच्या भांड्यात साखर आणि वेलची पूड घालूंन मिश्रण एकत्रित बारीक वाटून पूड तयार करून घ्यावी. 
५. मग याच मिक्सरच्या भांड्यात मोदकांचे तयार पीठ थोडे थोडे घालून ते बारीक वाटून घ्यावे. 
६. मिक्सरमध्ये वाटून घेतलेले पीठ एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यावे. या मिश्रणात थोडे गरम साजूक तूप मिसळून घ्यावे. 
७. आता हे तयार मिश्रण मोदकांच्या साच्यात भरुन गव्हाच्या पिठाचे मोदक तयार करून घ्यावेत. 

फारशी मेहेनत न घेता अगदी झटपट इन्स्टंट पद्धतीने १० ते १५ दिवस टिकतील असे गव्हाच्या पिठाचे मोदक खाण्यासाठी तयार आहेत.

Web Title: Wheat Flour Modak Recipe Instant Atta Modak Recipe How To Make Wheat Flour Modak At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.