lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > हरबरे उकडलेले उरलेले पाणी फेकून देता ? ‘असा’ करा वापर, प्रोटीनचा खजिना - सुधारेल तब्येत...

हरबरे उकडलेले उरलेले पाणी फेकून देता ? ‘असा’ करा वापर, प्रोटीनचा खजिना - सुधारेल तब्येत...

Boiled Chana Water Benefits : Kala Chana: Health Benefits : हरबरे उकडले की उरलेले पाणी अजिबात फेकू नका, स्वयंपाकाची पाहा खास युक्ती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2023 10:59 PM2023-10-27T22:59:32+5:302023-10-27T23:14:12+5:30

Boiled Chana Water Benefits : Kala Chana: Health Benefits : हरबरे उकडले की उरलेले पाणी अजिबात फेकू नका, स्वयंपाकाची पाहा खास युक्ती...

What's the effect of consuming the water that is used for boiling black chickpeas | हरबरे उकडलेले उरलेले पाणी फेकून देता ? ‘असा’ करा वापर, प्रोटीनचा खजिना - सुधारेल तब्येत...

हरबरे उकडलेले उरलेले पाणी फेकून देता ? ‘असा’ करा वापर, प्रोटीनचा खजिना - सुधारेल तब्येत...

चणे खाणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय (Is it good to drink chickpea boiled water?) फायदेशीर मानले जाते. आपण शक्यतो हे चणे उकडवून त्याची सुकी भाजी किंवा आमटी करतो. चण्याची भाजी व आमटी असे पदार्थ आपल्याकडे आवडीने खाल्ले जातात. आपण चणे वेगवेगळ्या प्रकारे खातो. काहीजण चणे भाजून खातात तर काहीजण उकळवून किंवा मोड आलेले चणे खाणे पसंत करतात. चणे भिजवून खाण्याचेही अनेक फायदे आहेत. कारण चण्यामध्ये प्रोटीन, फायबर, एनर्जी, लोह, कॅल्शियम आणि सोडियमसारखे अनेक पोषकतत्व असून आपण नियमित स्वरूपात चणे खाल्ल्यास आरोग्यासाठी लाभदायक ठरू शकतात(What is the use of boiled chana water?).

या चण्यांचा वापर करुन आपण भाजी, चाट, आमटी, कोशिंबीर असे अनेक पदार्थ बनवतो. हे पदार्थ बनवण्याआधी आपण चणे आधी हलकेच उकळवून घेतो. जेणेकरून ते मऊ होऊन खाण्यास सोपे जाते, परंतु आपण चणे उकळण्यासाठी वापरलेले पाणी नंतर फेकून देतो. परंतु खरंतर जितके चणे खाणे पौष्टिक मानले जाते, तितकेच ते उकळवून घेतलेले पाणी सुद्धा आरोग्यासाठी अतिशय चांगले मानले जाते. रोज भिजवलेले चणे खाल्ल्यास त्याचे आपल्या शरीराला  बरेच फायदे मिळतात. भिजवलेले चणे खाल्ल्याने (Boiled Chana Water Benefits) तब्येत कायम निरोगी राहते. याशिवाय भिजवलेल्या चण्यांचे पाणी प्यायल्यानेही तब्येतीला पुरेपूर फायदे मिळतात. चणे उकळवून घेतलेले पाणी फेकून देण्याऐवजी या पाण्याचा वापर आपण नेमका कसा करु शकतो ते पाहूयात(What's the effect of consuming the water that is used for boiling black chickpeas).

चणे उकळवून घेतलेले पाणी फेकून न देता त्याचा वापर कसा करावा ? 

१. ग्रेव्ही किंवा सूप बनवण्यासाठी :- चणे उकळवून घेतलेले पाणी फेकून न देता आपण त्याचा वापर इतर भाज्यांच्या ग्रेव्ही किंवा सूप बनवण्यासाठी वापरु शकतो. असे असले तरीही या पाण्याचा वापर केल्याने याचा कोणत्याही प्रकारे भाजीच्या चवीवर परिणाम होत नाही, उलट त्याचे पोषण आणखी वाढते. जर आपण चण्याची आमटी बनवत असाल तर आमटीमध्ये या पाण्याचा वापर जरुर करावा. 

२. कणिक मळण्यासाठी :- या पाण्याचा वापर करुन आपण रोजचे चपातीचे कणिक देखील मळू शकता. प्रथिने आणि लोहाने समृद्ध असलेल्या या पाण्याने पीठ मळून घेतल्याने चपाती देखील चवदार आणि पौष्टिक बनते.

ना बटाटे उकडण्याची गरज - ना सारणाची भानगड, फक्त १० मिनिटांत करा गरमागरम आलू पराठे...

मेथीची भाजी कडवट होते ? ९ गोष्टी - मेथीची भाजी होईल एकदम चमचमीत - कडू अजिबात लागणार नाही...

३. भात किंवा पुलाव बनवण्यासाठी :- चणे उकळवून घेतलेले पाणी वापरण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. याचा वापर आपण तांदूळ किंवा पुलाव शिजवण्यासाठी देखील करू शकता. हे पाणी भात किंवा पुलावलाही वेगळा रंग व चव देण्यास मदत करते. 

४. डाळी बनवताना :- चणे उकळवून घेतल्यानंतर जे पाणी उरते त्याचा वापर करुन आपण डाळ बनवू शकता. या पाण्याचा वापर केल्यामुळे डाळ अधिक पौष्टिक होईल. डाळीचे पोषण मूल्य वाढवण्यासाठी आपण त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या देखील घालू शकता.

साखर नको म्हणून गूळ खाता ? पण तुम्ही खाता आहात तो गूळ योग्य आहे का ?

Web Title: What's the effect of consuming the water that is used for boiling black chickpeas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.