Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > दिवाळीतली शेव, चिवडा, चकली खूप उरली? त्यांच्यापासून झटपट करा २ चमचमीत पदार्थ- घ्या रेसिपी

दिवाळीतली शेव, चिवडा, चकली खूप उरली? त्यांच्यापासून झटपट करा २ चमचमीत पदार्थ- घ्या रेसिपी

Cooking Tips: दिवाळीमध्ये केलेला चिवडा, शेव, चकली खाऊन खाऊन कंटाळला असाल तर आता तेच पदार्थ वापरून काही वेगळे चवदार पदार्थ कसे करायचे ते पाहा..(what to do with the leftover chivda, shev and chakali from Diwali faral?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2025 16:11 IST2025-10-27T16:10:07+5:302025-10-27T16:11:02+5:30

Cooking Tips: दिवाळीमध्ये केलेला चिवडा, शेव, चकली खाऊन खाऊन कंटाळला असाल तर आता तेच पदार्थ वापरून काही वेगळे चवदार पदार्थ कसे करायचे ते पाहा..(what to do with the leftover chivda, shev and chakali from Diwali faral?)

what to do with the leftover chivda, shev and chakali from Diwali faral, 3 amazing tasty recipe from leftover Diwali faral | दिवाळीतली शेव, चिवडा, चकली खूप उरली? त्यांच्यापासून झटपट करा २ चमचमीत पदार्थ- घ्या रेसिपी

दिवाळीतली शेव, चिवडा, चकली खूप उरली? त्यांच्यापासून झटपट करा २ चमचमीत पदार्थ- घ्या रेसिपी

Highlightsघरात शेव, चिवडा, चकली असे खूप पदार्थ जमा होतात. अशावेळी त्यांचं काय करावं हे कळत नाही.

बहुतांश घरांंमध्ये दिवाळीच्या २ ते ३ दिवस आधीच फराळाचे पदार्थ केले जातात किंवा विकत मागवले जातात. दिवाळीच्या दिवसांत आपण ते अगदी भरपेट खातो. त्यामुळे नंतर ते पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही. कित्येक जणांना तर ते सहनही होत नाहीत. अशातच नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडूनही फराळ येतोच. त्यामुळे घरात शेव, चिवडा, चकली असे खूप पदार्थ जमा होतात. अशावेळी त्यांचं काय करावं हे कळत नाही. यासाठीच या काही खास कुकींग टिप्स.. तुमच्या घरीही शेव, चिवडा, चकली असे पदार्थ खूप उरले असतील तर त्यांच्यापासून तुम्ही पुढील काही रेसिपी ट्राय करू शकता.(what to do with the leftover chivda, shev and chakali from Diwali faral)

उरलेल्या शेव, चिकडा, चकलीपासून होणारे चटपटीत पदार्थ

 

१. वेगवेगळ्या प्रकारच्या शेव तसेच पाेह्याचा चिवडा, मुरमुऱ्याचा चिवडा, मक्याचा चिवडा असे सगळे चिवड्यांचे प्रकार एका मोठ्या भांड्यात एकत्र करा. त्यात चकल्यांचे बारीक तुकडे करून घाला.

कमी वयात केस पांढरे आणि पातळ झाले? बघा उपाय- केसांच्या सगळ्याच तक्रारी संपून जातील

शेव हाताने थोडी कुस्करून घ्या. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घाला. सगळं एकदा छान हलवून घ्या. चटपटीत भेळ झाली तयार. संध्याकाळी स्नॅक्स म्हणून खायला हा पदार्थ मस्त आहे.

 

२. तुमच्याकडे जेवढे असतील तेवढे सगळ्या प्रकारचे चिवडा, शेव आणि चकल्या एकत्र करा. मिक्सरमध्ये घालून त्यांची बारीक पावडर करून घ्या. आता त्यामध्ये थोडी कणिक आणि थोडं ज्वारीचं पीठ घाला.

Split Hair: केस कोरडे पडून टोकाला दुभंगले? ग्लिसरीनमध्ये २ गोष्टी मिसळून केसांना लावा

चवीनुसार मीठ, तिखट, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर असं सगळं घालून पाणी घालून हे पीठ मळून घ्या. त्याचे छान चवदार थालीपीठ करता येईल. किंवा थालीपिठाऐवजी तुम्ही हे पीठ जर आणखी पातळ भिजवलं तर त्याचे मस्त धिरडे करून खाता येतील. 

 

Web Title : दिवाली के बचे स्नैक्स? भेल और थालीपीठ बनाएं इन व्यंजनों के साथ!

Web Summary : दिवाली के बचे हुए स्नैक्स को बर्बाद न करें! प्याज, टमाटर और धनिया के साथ झटपट भेल के लिए शेव, चिवड़ा और चकली मिलाएं। वैकल्पिक रूप से, स्नैक्स को पीसकर पाउडर बना लें, आटा और मसाले डालें और स्वादिष्ट थालीपीठ या ढिरडे बनाएं।

Web Title : Leftover Diwali Snacks? Make Bhel and Thalipeeth with These Recipes!

Web Summary : Don't waste leftover Diwali snacks! Mix shev, chivda, and chakli for a quick bhel with onions, tomatoes, and cilantro. Alternatively, grind the snacks into a powder, add flour and spices, and make delicious thalipeeth or dhirde.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.