Join us

पावसाळ्यात दह्यासोबत काय खाणं टाळलं तर मिळतात दह्याचे फायदे, दही खाल्ल्यानं खोकलाही होणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 13:52 IST

Avoid These Food Combinations With Curd: पावसाळा सुरू झाल्यावर दही खाताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. जर ही काळजी घेतली नाही तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

Avoid These Food Combinations With Curd: जसा ऋतु बदलतो तसा आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्येही बदल करावा लागत असतो. उन्हाळ्यात दही आणि दह्याचे वेगवेगळे पदार्थ लोक भरपूर खातात. पण पावसाळा सुरू झाल्यावर दही खाताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. जर ही काळजी घेतली नाही तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या दिवसात दह्यासोबत काय खाऊ नये हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेणेकरून पावसाळ्यात तुमचं आरोग्य चांगलं रहावं.

पावसाळ्यात दह्यासोबत काय खाणं टाळावं?

आंबा आणि दही

बरेच दह्यासोबत आंबा खातात. पण असं अजिबात करू नये. एका रिपोर्टनुसार, आंबे उष्ण असतात आणि दही थंड असतं. आयुर्वेदानुसार, दोन्हीही विरूद्ध आहार आहेत. यामुळे डायजेशनमध्ये समस्या होते. याचा प्रभाव त्वचेवरही पडतो. तसेच या दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्याने शरीरात विषारी पदार्थ वाढतात.

दूध आणि दही

दुधासोबत दही खाल्ल्यानेही समस्या होऊ शकते. यामुळे हार्ट बर्न आणि पोटात ब्लोटिंग म्हणजे पोट फुगण्याची समस्या होते. तसेच शरीरात हाय फॅट आणि हाय प्रोटीनमुळेही आरोग्य बिघडतं.

बटर आणि दही

बटर लावलेल्या पराठ्यासोबत दही खाल्लं तर आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. कोणत्याही तेलकट पदार्थासोबत दही खाणं घातक ठरू शकतं. जर तुम्ही आलू पराठे, छोले-भटूऱ्यांसोबत दही खाल तुम्हाला दिवसा आळस जाणवेल. 

 

दही आणि कांदा

बरेच लोक कोशिंबीर बनवताना दही आणि कांदा एकत्र करतात. हे चवीला चांगलं लागतं. पण जर कांदा वेगळा खात असाल तर त्यासोबत दही खाणं योग्य नाही. दोन्ही विरूद्ध आहार आहे. यामुळे तुम्हाला एलर्जी, खाज, एग्जिमा, सोरोसिस होऊ शकतो.

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्स