White Powder On Grapes : द्राक्ष खाणं घरातील सगळ्याच सदस्यांना आवडतं. खासकरून तापमान वाढीनंतर तर द्राक्ष भरपूर खाल्ली जातात. बरेच लोक बाजारातून द्राक्ष आणली न धुताच खाऊ लागतात. पण आपण पाहिलं असेल की, द्राक्षांवर हलका पांढरा थर किंवा पावडरसारखं काहीतरी दिसतं. जास्तीत जास्त लोक याला सामान्य धूळ समजून याकडे दुर्लक्ष करतात. पण असं करणं महागात पडू शकतं. कारण द्राक्षांवर दिसणारा हा पांढरा थर अनेकदा कीटनाशके किंवा रसायनांचा असू शकतो. त्यामुळे द्राक्ष खाण्याआधी चांगले स्वच्छ केले पाहिजे.
द्राक्षांवरील पांढरा थर कशाचा?
द्राक्षांवर जो पांढरा थर दिसतो, त्याला बरेच लोक नॅचरल वॅक्स म्हणतात. हा थर फळांना खराब होण्यापासून वाचवतो. पण बाजारापर्यंत पोहोचण्यादरम्यान द्राक्षांवर कीटकनाशकं किंवा धूळ - माती जमा होऊ शकते. त्यामुळे हे समजणं अवघड जातं की, जो थर दिसतोय तो नॅचरल आहे की रसायनांचा.
द्राक्ष न धुता खाल्ल्यास नुकसान
जर आपण कंटाळा करून द्राक्ष न धुताच खाल्लीत तर पोटासंबंधी समस्या होऊ शकतात. काही लोकांना पोटदुखी, उलटी, जुलाब किंवा अॅलर्जीची समस्या होऊ शकते. लहान मुलं आणि वृद्धांवर याचा प्रभाव लवकर दिसतो. त्यामुळे एक्सपर्ट सल्ला देतात की, बाजारातून आणलेली द्राक्ष न धुता थेट खाऊ नये.
द्राक्ष स्वच्छ करण्याची सोपी पद्धत
द्राक्ष स्वच्छ करण्यासाठी एका भांड्यात स्वच्छ पाणी घ्या आणि त्यात ती १० ते १५ मिनिटे ठेवा. हवं तर पाण्यात थोडं मीठ घाला किंवा बेकिंग सोडा घाला. या दोन्ही गोष्टींनी द्राक्षांवरील पांढरा थर किंवा रसायनं निघून जातील. लहान मुलांना द्यायची असतील सावध राहणं खूप गरजेचं असतं.
एक्सपर्ट सांगतात की, केवळ द्राक्षेच नाही तर कोणतीही फळं आधी चांगली धुवावीत आणि नंतर खावीत. फळं धुतल्याने त्यांवरील धूळ-माती, बॅक्टेरिया आणि रसायनं निघून जातात.
