What Is Jalebi's English Name: जिलेबीचं नाव जरी काढलं तरी कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. कारण हा एक गोड पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. लग्न समारंभ असो, वाढदिवस असो किंवा काही नसेल तरीही लो जिलेबी भरपूर खातात. अनेक ठिकाणी तर जिलेबी सकाळच्या नाश्त्यातील महत्वाचा भाग असते. भारतात सगळीकडे जिलेबी एक फेमस मिठाई आहे. जिलेबीचा कुरकुरीतपणा आणि गोडवा आत्मा तृप्त करणारा असतो. सगळेच जिलेबी खातात पण त्यांना जर विचारलं की, जिलेबीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात तर याचं उत्तर कुणाकडेच नसतं. तेच आज आपण पाहणार आहोत.
जिलेबी काय आहे?
आपणा सगळ्यांना माहीत आहे की, जिलेबी एक गोलगोल राऊंड असलेली एक मिठाई आहे. जिलेबी तयार करण्यासाठी बॅटर तयार केलं जातं आणि ते तेलात किंवा तूपात तळलं जातं. तळलेली जिलेबी साखरेच्या पाण्यात मुरवली जाते.
जिलेबीला इंग्रजीत काय म्हणतात?
जिलेबी, जलेबी अशी नावं आपण ऐकली असेलच, पण जिलेबीला इंग्रजीत काय म्हणतात याचा कधी विचार केलाय का? केला नसेल तर आज आपण तेच जाणून घेणार आहोत. जिलेबीला इंग्रजीत 'Sweet Pretzel' किंवा 'Coiled Funnel Cake' म्हटलं जातं. कारण ती कॉइलसारखी दिसते. काही लोक जिलेबीला 'Indian Syrup-Coated Dessert' असंही म्हणतात.
हिंदीत काय म्हणतात?
तसं तर भारतात जिलेबीला 'जलेबी' असं म्हटलं जातं. पण मुळात या शब्दाची उत्पत्ती "जलाबिया" या अरबी शब्दापासून झाली आहे. भारतीय प्राचीन तपशील पाहिला तर काही एक्सपर्ट याला 'कुंडलिका' किंवा 'जलवल्लिका' असंही म्हटलं जात असल्याचं सांगतात. ज्यातून जिलेबीचा रसदारपणा दिसून येतो.
जिलेबी मुळची कुठली?
भारतात सगळ्यात जास्त आवडीची असलेली जिलेबी मुळात इथली नाहीच. ती आलिये मध्य आशिया (Middle East) मधून. तसं जिलेबीला जलाबिया किंवा ज़ुलबिया नावानं ओळखलं जातं. भारतात आल्यावर यात काही बदल झालेत.