सध्या थंंडीचे गारेगार दिवस सुरू आहेत. जवळपास सगळीकडेच थंडीचा कडाका वाढला आहे. अगदी स्वेटर घालून, शाल पांघरुणही अंगातली थंडी जात नाही. अशावेळी वारंवार आठवण येते ती आलं घालून केलेल्या कडक, गरमागरम चहाची.. त्यामुळे या दिवसांत चहाप्रेमींचं चहा पिण्याचं प्रमाण बरंच वाढतं. गोठवून टाकणाऱ्या गारव्यात मिळालेला आल्याचा सुगंध असणारा वाफाळता कडक चहा म्हणजे निव्वळ सूख..(Adrak Ki Chai Recipe) पण बऱ्याचदा आलं घालूनही चहाला म्हणावी तशी चव आणि सुगंध येत नाही. असं होण्याचं कारण म्हणजे चहामध्ये आलं घालण्याची चुकलेली वेळ (what is the correct method and timing for adding ginger in tea?). म्हणूनच चहा करताना त्यात आलं कधी आणि कसं घालावं ते पाहा..(perfect method of making ginger tea)
चहामध्ये आलं घालण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती?
चहा करताना सगळ्यात आधी तर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवा. आता थंड पाण्याला थोडा गरमपणा येऊ लागला की त्यात अगदी बारीक किसणीने किसलेलं आलं घाला.
अस्सल साऊथ इंडियन चवीचा सांबार करण्याची सोपी रेसिपी! 'हा' खास पदार्थ घाला, सांबार होईल झकास..
किंवा खलबत्त्यामध्ये कुटलेलं आलंही तुम्ही घालू शकता. आल्याची पेस्ट जेवढी बारीक होईल तेवढा चहाला सुगंध जास्त येईल. त्यामुळे जाड किसनीने आलं किसू नये. आल्यासाठी नेहमी अगदी बारीक छिद्र असणारीच किसनी वापरावी.
आता पाण्यामध्ये आलं खळखळून उकळू द्या. यामुळे आल्याचा सुगंध आणि रंग दोन्हीही चहाला अगदी परफेक्ट येईल. जेव्हा आल्याचा पिवळट रंग पाण्याला येईल तेव्हा त्या पाण्यामध्ये चहा पावडर आणि हवी असल्यास साखर घाला. या पाण्याला उकळी आल्यानंतर ते गाळणीने गाळून कपामध्ये ओता.
चहाचं पाणी कपात गाळल्यानंतर लगेचच त्यामध्ये गरमागरम उकळतं दूध घाला. एकदा कपातलं मिश्रण हलवून घेतलं की आल्याचा सुगंध असणारा फक्कड चहा तयार.. या रेसिपीने एकदा आल्याचा चहा ट्राय करून पाहा.
