Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > भारतात अनेक राज्यांत भात आंबवून खाण्याची प्रथा! पोईता भात ते पाझमकांजी, शिळ्या भाताचे चकीत करणारे फायदे

भारतात अनेक राज्यांत भात आंबवून खाण्याची प्रथा! पोईता भात ते पाझमकांजी, शिळ्या भाताचे चकीत करणारे फायदे

Fermented Rice Benefits :आंबवलेला भात मायक्रोफ्लोराने समृद्ध असतो, जो शरीरात प्रीबायोटिकसारखं काम करतो. चला तर मग, त्याचे फायदे आणि सेवनाची योग्य पद्धत जाणून घेऊया.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 19:21 IST2026-01-26T12:04:59+5:302026-01-27T19:21:47+5:30

Fermented Rice Benefits :आंबवलेला भात मायक्रोफ्लोराने समृद्ध असतो, जो शरीरात प्रीबायोटिकसारखं काम करतो. चला तर मग, त्याचे फायदे आणि सेवनाची योग्य पद्धत जाणून घेऊया.

What happens when you eat fermented rice know benefits | भारतात अनेक राज्यांत भात आंबवून खाण्याची प्रथा! पोईता भात ते पाझमकांजी, शिळ्या भाताचे चकीत करणारे फायदे

भारतात अनेक राज्यांत भात आंबवून खाण्याची प्रथा! पोईता भात ते पाझमकांजी, शिळ्या भाताचे चकीत करणारे फायदे

Fermented Rice Benefits : आंबवलेला भात खूप आधीपासून भारतीय आहाराचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये तो वेगवेगळ्या नावांनी आणि पद्धतींनी खाल्ला जातो. जसं की बंगालमधील पोइला भात, केरळमधील पझमकंजी, आसामचा पोइता भात, ओडिशाचा गिल भात आणि आंध्र प्रदेशातील चड्डानम. हा केवळ पारंपरिक पदार्थ नाही, तर आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत फायदेशीर मानला जातो. आंबवलेला भात मायक्रोफ्लोराने समृद्ध असतो, जो शरीरात प्रीबायोटिकसारखं काम करतो. चला तर मग, त्याचे फायदे आणि सेवनाची योग्य पद्धत जाणून घेऊया.

भरपूर पोषक तत्व

आंबवण्याच्या प्रक्रियेदरम्यान भातामध्ये अनेक फायदेशीर घटक तयार होतात. जसे की अँटीऑक्सिडंट्स, अँटीमायक्रोबियल तत्व, व्हिाटामिन E, फिनॉलिक घटक, फ्लेव्होनॉइड्स, लिनोलिक अ‍ॅसिड आणि अँथोसायनिन. हे घटक कोलेस्ट्रॉल कमी करण्यास, आतड्यांची कार्यक्षमता सुधारण्यास आणि जुलाबासारख्या समस्या टाळण्यास मदत करतात.

आंबवलेला भात अधिक आरोग्यदायी का?

फर्मेंटेशनमुळे कॅल्शियम, आयर्न आणि मॅग्नेशियमसारख्या खनिजांची उपलब्धता वाढते. संशोधनानुसार, भात १२ तास आंबवल्यास त्यातील आयर्नचे प्रमाण सामान्य शिजवलेल्या भाताच्या तुलनेत तब्बल २१ पट वाढते. त्यामुळेच आंबवलेला भात अत्यंत पौष्टिक मानला जातो.

आंबवलेल्या भाताचे फायदे

नियमितपणे आंबवलेला भात खाल्ल्यास थकवा कमी होतो, कारण यात व्हिटामिन B12 चांगल्या प्रमाणात असतं. हा प्रोबायोटिक्सने भरलेला असल्याने आतड्यांमधील चांगल्या जिवाणूंची वाढ होते आणि गॅस, आम्लपित्त व इतर पचनाच्या तक्रारी दूर होतात. कमी झोप किंवा जास्त मानसिक थकवा जाणवणाऱ्यांसाठी हा एक नैसर्गिक ऊर्जा वाढवणारा पदार्थ आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पोटाच्या संसर्गापासून संरक्षण मिळते आणि त्वचा व केसांसाठीही तो फायदेशीर ठरतो.

आंबवलेला भात कसा तयार करावा?

आदल्या दिवशी शिजवलेला भात घ्या आणि तो मातीच्या भांड्यात किंवा कंटेनरमध्ये ठेवा. भात पूर्ण बुडेल इतपत पाणी घाला आणि झाकण ठेवून रूमच्या तापमानावर रात्रभर ठेवा. दुसऱ्या दिवशी भात किंचित आंबट आणि मऊ झालेला असेल. त्यात चवीनुसार मीठ घालून नीट मॅश करा. नंतर त्यात ताक किंवा थोडंसं दही घालून व्यवस्थित मिसळा. आता आंबवलेला भात खाण्यास तयार आहे. तो नाश्त्यासाठी किंवा हलक्या जेवणासाठी घेऊ शकता.

Web Title : खमीरयुक्त चावल: फायदे, तैयारी और यह आपके लिए क्यों अच्छा है

Web Summary : खमीरयुक्त चावल, पोषक तत्वों और प्रोबायोटिक्स से भरपूर, पाचन में सहायता करता है, प्रतिरक्षा को बढ़ाता है और ऊर्जा प्रदान करता है। यह खनिज उपलब्धता को बढ़ाता है और पके हुए चावल को रात भर भिगोकर तैयार करना आसान है। नियमित सेवन थकान कम करता है और पेट के स्वास्थ्य का समर्थन करता है।

Web Title : Fermented Rice: Benefits, Preparation, and Why It's Good for You

Web Summary : Fermented rice, rich in nutrients and probiotics, aids digestion, boosts immunity, and provides sustained energy. It enhances mineral availability and is simple to prepare by soaking cooked rice overnight. Regular consumption reduces fatigue and supports gut health.