Join us

शेवग्याच्या शेंगांचं सूप प्यायल्यानं शरीराला काय फायदे मिळतात? वाचाल तर रोज प्याल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 11:08 IST

Drumstick Soup benefits : शेवग्याच्या शेंगांचं सूप कधी प्यायलात का? जर तुम्ही कधी प्यायले नसाल आणि त्याचे फायदे माहीत नसतील तर आज आम्ही तुम्हाला तेच सांगणार आहोत.

Drumstick Soup benefits :  शेवग्याच्या शेंगांची भाजी भरपूर लोक खूप आवडीनं खातात. शेवग्याचं झाड एक सुपरफूड मानलं जातं. कारण यात अनेक औषधी गुण असतात. शेवग्याच्या शेंगाच नाही तर पानं, फुलं देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. शेवग्याच्या शेंगाची, पानांची किंवा फुलांची भाजी तुम्ही अनेकदा खाल्ली असेल, पण शेवग्याच्या शेंगांचं सूप कधी प्यायलात का? जर तुम्ही कधी प्यायले नसाल आणि त्याचे फायदे माहीत नसतील तर आज आम्ही तुम्हाला तेच सांगणार आहोत. डायटिशिअन श्वेता पांचाल यांनी शेवग्याच्या शेंगांचं सूप कसं बनवायचं याचा एक व्हिडीओ इन्स्टावर शेअर केला आहे.

शेवग्याच्या शेंगांचं सूप पिण्याचे फायदे

- शेवग्याच्या शेंगांचं सूप शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी आणि आतड्या साफ करण्यासाठी ओळखल्या जातात. याने लिव्हर, किडन्या आतून स्वच्छ होतील. त्यासाठी शेवग्याच्या शेंगांच सूप तुम्ही नेहमी प्यायला हवं.

- शेवग्याच्या शेंगांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं. ज्यामुळे शरीराचा इन्फेक्शनपासून आणि वेगवेगळ्या आजारांपासून बचाव होतो. तसेच याच्या मदतीनं शरीरात पांढऱ्या रक्तपेशीही वाढतात. ज्यामुळे सर्दी, खोकला, ताप अशा समस्याही होत नाहीत.

- नियमित शेवग्याच्या शेंगाचं सूप प्यायल्याने शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात. शरीरात पोषक तत्व कमी झाल्यावर या सूपने ती कमी भरून निघते. यातील बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन सी मुळे इम्यूनिटी बूस्ट होते. ज्यामुळे तुम्ही नेहमी आजारी पडणार नाही.

- यात अॅंटी-इन्फ्लेमटरी गुण असतात ज्यामुळे शरीरातील सूज कमी होण्यास मदत मिळते. तसेच याने सांधेदुखी आणि ऑस्टियोपोरोसिस सारख्या समस्याही दूर करण्यास मदत मिळते. यातील कॅल्शिअममुळे हाडे मजबूत होतात.

- शेवग्याच्या शेंगांमुळे पचनक्रिया चांगली होते. ज्यामुळे वजन कमी करण्यात मदत मिळते. उपाशीपोटी शेवग्याच्या शेंगांचं सूप प्यायल्याने पोटाचं आरोग्य चांगलं राहतं. 

- शेवग्याच्या शेंगांमुळे बॅड कोलेस्ट्रॉल लेव्हलही कमी होते. ज्यामुळे तुम्हाला हृदयरोगांचा धोका कमी होतो. 

कसं बनवाल शेवग्याच्या शेंगांचं सूप

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्स