Lokmat Sakhi >Food > झणझणीत तडका! भाजी आणि वरणाला हिंग-जिऱ्याची फोडणी दिल्याने काय होतं, तुम्हाला माहिती आहे का?

झणझणीत तडका! भाजी आणि वरणाला हिंग-जिऱ्याची फोडणी दिल्याने काय होतं, तुम्हाला माहिती आहे का?

भाज्या आणि डाळ बनवण्याची सुरुवातच हिंग आणि जिरे घालून फोडणीने होते. यामुळे जेवण आणखी स्वादिष्ट होतं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 18:06 IST2025-04-07T18:06:04+5:302025-04-07T18:06:27+5:30

भाज्या आणि डाळ बनवण्याची सुरुवातच हिंग आणि जिरे घालून फोडणीने होते. यामुळे जेवण आणखी स्वादिष्ट होतं.

what happens if you put hing jeera tadka in dal and sabji | झणझणीत तडका! भाजी आणि वरणाला हिंग-जिऱ्याची फोडणी दिल्याने काय होतं, तुम्हाला माहिती आहे का?

झणझणीत तडका! भाजी आणि वरणाला हिंग-जिऱ्याची फोडणी दिल्याने काय होतं, तुम्हाला माहिती आहे का?

घरामध्ये डाळ आणि भाजी बनवताना आपण हिंग आणि जिरे याचा वापर हमखास करतो. भाज्या आणि डाळ बनवण्याची सुरुवातच हिंग आणि जिरे घालून फोडणीने होते. यामुळे जेवण आणखी स्वादिष्ट होतं. पदार्थाची चव वाढण्यासोबतच याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. हिंग आणि जिरे दोन्ही औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत. डाएटिशियन नंदिनी यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

हिंग-जिऱ्याचा तडका दिल्याने काय होतं?

- डाळ आणि भाज्यांमध्ये वापरला जाणारा हिंग-जिऱ्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.

- या दोन्ही गोष्टी पचन सुधारण्यास मदत करतात आणि अन्नपचनाची प्रक्रिया सोपी होते.

- आयुर्वेदानुसार या दोन्ही गोष्टी औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत. हे एसिडिटी, ब्लोटिंग, गॅस आणि छातीतील जळजळ कमी करतात.

- हिंग आणि जिरे खाल्ल्याने मेटाबॉलिज्म सुधारतं आणि पोटाच्या समस्या कमी होतात.

- तडक्यामुळे फॅट बर्निंग प्रोसेस वेगाने होते. 

- या दोन्ही गोष्टींमध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

- जिरे मासिक पाळीशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत करतं आणि शरीरात हार्मोनल बॅलेन्स राखतं.

- जेवणात हिंग आणि जिरे घालल्याने ब्लड प्रेशर नियंत्रित राहण्यास मदत होते.

- हिंग आणि जिऱ्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे पोट साफ करण्यास मदत करतात. यामुळे शरीरात साचलेले विषारी पदार्थ देखील सहज बाहेर पडतात आणि शरीर डिटॉक्स होतं.


 

Web Title: what happens if you put hing jeera tadka in dal and sabji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.